गडाच्या माचीवर ….


|| श्रीगजवदनवरद ||

भूमिका

नमस्कार वाचकहो ,

इतिहास … म्हणजे पाचवा वेद , ज्ञानाचा अखंड स्रोत !

महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला नेहमीच खुणावत आलाय त्यात मध्ययुग म्हणजे ‘स्व’त्वाच्या जाणीवेची आणि मग पराक्रमाची एक उत्तुंग ध्वजा, अश्या या गौरवशाली इतिहासातील सत्य उकलण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न .

इतिहासातील एखाद्या घटनेबद्दल बद्दल शंका अथवा त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याची जिज्ञासा ही प्रत्येक इतिहासप्रेमीला असते. त्यातूनच त्याला सत्याचा मागोवा घेण्याचा ध्यास लागतो. या प्रवासादरम्यान अभ्यासक अधिकाधिक माहिती मिळवू लागतो, पुरावे तपासू लागतो. त्यात त्याला पुराव्यांचे महत्व आणि प्रकार कळतात. त्यातला समकालीन, अस्सल आणि निष्पक्ष (एकतर्फी नसणारा) पुरावा मिळाला की अभ्यासकाची जिज्ञासा शांत होते. कारण त्याला हवे असलेले उत्तर आता मिळालेले असते. आमचाही प्रवास असाच सुरु झाला होता आणि अव्याहत सुरु आहे. तेव्हा पुराव्यांना अपार महत्व आहे. ते मिळवण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी हवी. इतिहास संशोधन ही फार मोठी गोष्ट आहे. उचलला टाक आणि खरडले मत इतके ते सोपे नाही. इतिहास संशोधन हे तर फार दूर पण ज्यांना इतिहासाचा नुसता अभ्यास करण्याची प्रामाणिक इच्छा असेल त्यांनी प्रा.ग.ह.खरे लिखित संशोधकाचा मित्र आणि श्री. वा सी बेंद्रे लिखित ‘साधन चिकित्सा‘ ही पुस्तके प्रथम वाचावी आणि अभ्यासाचा श्री गणेश करावा. 

हा लेखन प्रपंच मांडण्यामागचा हेतू, कारण आणि कळकळ इतकीच की एखादी घटना सत्य मानायला आपल्याकडे पुरावा / संदर्भ / साधने / Contemporary Evidences काय आहेत हे समजावे. त्यांचे महत्व समजावे आणि त्यातून सत्य समोर यावे. 

अनेक वाचक जेव्हा एखाद्या कादंबरीला सत्य समजून  वाद घालू लागतात तेव्हा अगोदर त्यांना समजवावेसे वाटते, आणि तरीही भावनांच्या आहारी जाऊन जर कुणी पुरावे डावलू लागले तर कीव येते कारण आता अभ्यासकाचा इतिहासातील सत्य जाणण्याचा हेतू कुठेतरी खूप मागे राहून गेलेला असतो. 

आपले उदंड प्रेम आणि प्रतिसाद लाभत आहे याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

नम्र निवेदन –

 • ह्या ब्लॉगवर नोंदीत असणाऱ्या १७५२ पूर्वीच्या सर्व इंग्रजी तारखा ह्या जुलियन कॅलेंडर (जुन्या पद्धती) प्रमाणे  आहेत. जिथे ग्रेगोरीअन कॅलेंडर प्रमाणे तारीख अपेक्षित आहे तिथे तसे खास लिहिले जाईल. १७५२ नंतरच्या घटनांसाठी दिलेल्या तारखा ग्रेगोरिअन (नविन पद्धती) प्रमाणे आहेत. शक नोंदी राज्याभिषेक शक किंवा विशेष उल्लेख नसल्यास शालिवाहन शकातील आहेत.
 • ब्लॉगला भेट द्या, वाचा, ज्ञान वाढवा, आपल्या प्रतिक्रिया द्या, इतरांना सांगा, RSS Feeds घ्या परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकांची पूर्व लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. संकेत स्थळावरील सर्व साहित्य, लेख, छायाचित्रे, नकाशे, मोडी पत्रे, लिप्यंतरे ह्यांचे हक्क राखीव आहेत. केवळ आमचा नामोनिर्देश करून ते वापरू नयेत. लेखक / प्रकाशकांच्या परवानगी शिवाय ते वापरता येणार नाहीत. तसे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई आपल्यावर होऊ शकते.
 • लेखांमधील चित्रे, नकाशे व फोटो ह्यांचे संपूर्ण हक्क राखीव आहेत – इतिहास अभ्यासक, चित्रकार व फोटोग्राफर ह्यांचे ते आहेत व मैत्रीखातर त्यांनी ते आम्हाला वापरण्याची अनुमती दिली आहे.
 • लेखातील माहिती संदर्भात कोणतीही शंका किंवा कोणतीही सूचना असेल, तर त्या लेखाच्या लेखकाशी कृपया खालील e-mail id वर संपर्क साधावा. Facebook, Quora, Pintrest, Twitter अशा कोणत्याही Social Networking Website ‘सार्वजनिक’ कट्ट्यावर विचारू नये – दखल घेतली जाणार नाही, परंतु email id वर email करून किंवा प्रत्यक्ष संपर्क करून शंका विचारल्यास त्याचे योग्य ते निरसन केले जाईल.
 • संपर्क : padmadurg@gmail.com

बहुत काय लिहिणे ?   तरी आपण सुज्ञ आहात.

गूढ, रम्य इतिहासातील आपल्या प्रवासास अनेकविध शुभेच्छा. आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल पुनःश्च आभार !!

दुरितांचे तिमिर जावो | विश्व ‘स्वधर्मसूर्ये’ पाहो | जो जे वांच्छील तो ते लाहो | प्राणिजात ||

अमुचे अगत्य असो द्यावे !

 – सेवेसी विज्ञापना    –

Pranav     VishalUmesh Mudra Sanskrut

|| सेवेचे ठायी तत्पर  प्रणव – विशाल – उमेश निरंतर ||

©

Unauthorized use and/or duplication of any material on this blog / website without a written permission from this site’s author and/or owner is strictly prohibited. Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to the concerned Author at- https://raigad.wordpress.com and http://www.marathahistory.com with appropriate and specific direction to the original content.

142 Responses to गडाच्या माचीवर ….

 1. Prithviraj Thakur says:

  मीसुद्धा शिवचरित्राचा एक विद्यार्थी आहे. मला पर्णालपर्वत ग्रहणाख्यान हवे आहे. ते प्रिंट स्वरूपात किंवा ई बुक स्वरूपात कुठे मिळू शकेल का? कृपया कळवावे.
  -पृथ्वीराज ठाकूर

  Like

 2. chandan thakoor says:

  dear pranav this is chandan thakoor I need to contact you how do i do that other than this platform

  Like

 3. sandeep parab says:

  johar mitrano, apala blog varial prashna ani tyachi uttare vachun anada jahala . apanas arjavani ashiki baramavalatil Deshmukhan baddal thodi mahiti milela kai v tyana sabodanyant yenarya birudavalicha khara arth kai udanarth gambhirao deshmukh ,haibatrao deshmukh ,Dhamale deshmukh, zunzarao deshmukha , hambhirao deshmukh.

  Like

  • धन्यवाद, आपले स्वागत आहे!
   ह्या उपाध्या आणि बिरुदावली पिढीजात चालत आली आहे. काहींबद्दल माहिती मिळते जसे शिळीमकर मंडळींना हिंमतबहाद्दर उपाधी आदिलशाहने प्रथम दिली. संताजी घोरपडे यांना ममल्कत-ए-मदार म्हणजे ‘राज्याचा आधारस्तंभ’ हा खिताब होता. परंतु सगळ्यांच्याच बद्दल अशी माहिती उपलब्ध नाही.

   Like

 4. Ajay says:

  नेतोजी पालकरांची मुद्रा फारसी आहे हि सर्वज्ञात आहे. पण हि अस्सल अथवा या मुद्रेचा पाठ (भाषांतरासाहित मिळाला तर फारच छान) कुठे पाहण्यास मिळेल का?

  धन्यवाद

  अजय

  Liked by 2 people

  • दुर्दैवाने पाठ उपलब्ध नाही. मुद्रा भारत इतिहास संशोधक मंडळात आहे. ती कुठे प्रकाशित झाली आहे का याची माहिती मिळवून कळवतो. धन्यवाद.

   Like

   • अजय says:

    बहुदा ताराबाईकालीन कागदपत्रे खंड १ मध्ये असावा असे मेहेंदळे सरांकडून कळले. माझ्याकडे नवीन आवृत्ती आहे बहुदा जुन्या आवृत्तीत असावा.

    धन्यवाद

    अजय

    Like

   • जुना खंड तपासला, त्यात नेतोजी पालकरांनी काही पत्रं आहेत पण त्यावर केवळ फारसी षटकोनी शिक्का एवढेच नमूद केलेले आहेत. शिक्क्यातील मजकूर दिलेला नाही. धन्यवाद !

    Like

 5. Satyajeet says:

  Dear person, I was listening to Shivbhushan shri Ninadrao’s audios about various aspects of Shivaji Maharaj. In one session he has explained some sir names like chitnis = chiithi vis, parasnis = those who used to write letters in parasi. Can you please explain the job function/role of sir name Potnis?

  Like

 6. प्रशांत धुमाळ says:

  सर आपले जुने लेख जे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विषई होते ते मला आता ह्या ठिकाणी वाचायला उपलब्ध होत नाहीत
  जस की पावनखिंड, कृष्णजी भास्कर हे जे जुने लेख आहेत ते कसे वाचायचे ते समजत नाही
  कृपया मार्गदर्शन करा

  Like

  • लेखांचे कॉपीराईट राफ्टर प्रकाशनाने घेतले आहेत. तसेच काही फुकटचंबू लोकांनी आमचेच लेख चोरून वर आम्हालाच कारवाईच्या नोटीसा पाठवल्या आहेत. तेव्हा इथून पुढे समग्र लेख ब्लॉगवर दिसतील की नाही याची शंका आहे. आपल्याला ते लेख विस्तृत स्वरुपात आमच्या ‘इतिहासाच्या पाऊलखुणा‘ या लेखसंग्रहात वाचायला मिळतील.

   Like

   • प्रशांत धुमाळ says:

    सर खुप सुन्दर लेख आणि आभ्यासपूर्ण माहिती वाचायला मिळत होती
    रोज काही ना काही निविन वाचून माहिती मधे भर पडत होती
    पण काही मुर्ख लोकां मुळे आमच्या सारख्या वाचकांची गैरसोय होते आहे
    सर आमची दखल घ्या आणि नवे नवे लेख लिहित रहा आणि आम्हाला वाचना साठी उपलंध करुण दया ही विनंती

    Like

   • होय, आमच्याकडून शक्य तितके सगळे करूच ! धन्यवाद.

    Like

 7. Aniruddha Mukadam says:

  bahut uttam….likhan vachun param santosh jahala…fara divsat aise chokhat likhan vachnat aale navhte.. itihasachi mothich seva aapan karat asa,he bare dhyani ghene. aapli karavi ti sarfraji thodich aahe. pestar hi aishech saraswati-vinod karit rahane aishi vinanti…

  Like

 8. Aniruddha Mukadam says:

  bahut uttam likhan….. vachon param samadhan jahale…itihasachi seva bahutchi karit ahat. thorlya chhatrapati maharaj sahebanchya paayi aapli hi seva nakkich ruju hoil he bare mani dharne… pestar hi aishech likhan karit jane hi vinanti.

  Like

 9. Badrinath S says:

  जुनी प्रकरणं वाचायची आहेत पण ब्लॉग वर लिंक गायब आहेत , महाराजांचे गोवा ,बारदेस , खांदेरी उंदेरी, किल्ले रामशेज वैगैरे ?

  Like

 10. Shubham Kshirsagar says:

  sambhaji maharajanche sharir va unchi ani vajan ya sandharbhat satya mahiti kay ahe te kalel ka?

  anek msg ashe firtay jyat 170 kg etc ahe

  Like

 11. abhay sawant says:

  Desh dharma par mitnewala.
  He chh. Sambhaji rajenche audio/ video song milel la?

  Like

 12. Onkar Prakash Joshte says:

  Nice collection of Maratha Empire. I loved it. Keep writing boys…..
  Jai Maharashtra.

  Like

 13. Nikhil says:

  Moropant Pingle hyancha kartrutvabaddal detail dya please,
  He was my ancestor

  Like

  • मोरोपंतांचे कर्तुत्व जबरदस्त आहे. कलम आणि तलवार अशी दुहेरी कामगिरी त्यांनी राबवून दाखवली आहे. एखाद्या विशिष्ट प्रसंगाबद्दल काही प्रश्न असल्यास जरूर विचारा. डॉ. सदाशिव शिवदे यांनी मोरोपंतांचे छोटेखानी चरित्र लिहिले आहे ते आपण जरूर वाचावे. भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

   Like

 14. Dadaso udugade patil says:

  भाऊ धन्यवाद, या ब्लोगची उत्पती केल्याबद्द्ल 🙂

  Like

 15. adhekane says:

  Marathyanchya Swaryanche Mukkam ani Studies in Aurangzeb’s reign he pustake PDF milu shaktil ka?

  Like

  • Umesh Joshi says:

   नमस्कार….
   मराठ्यांच्या स्वार्यांचे मुक्काम हे पुस्तक pdf उपलब्ध नाही….निदान आमच्याकडे तरी नाही….आमच्याकडे त्याची hard copy आहे. Studies in Aurangzeb’s reign हे पुस्तक देखील pdf उपलब्ध नाही…..निदान आमच्याकडे तरी नाही….. त्यामुळे ह्या पुस्तकाबादाल कल्पना नाही….
   धन्यवाद….

   Like

   • adhekane says:

    Dhanyawad Umeshji…!!! Studies in Aurangzeb’s Reign pustak milale. Dasbodh.com ahe. Marathyanchya Swaryanche Mukkam hard copy kuthe milu shakel?

    Like

   • उत्तम अजयजी. म स्वा मु सध्या Out of Print असून दुर्मिळ झाले आहे, आपण पुण्यात अथवा मुंबईत असल्यास काही व्यवस्था करता येऊ शकेल. इमेल वर संपर्क साधावा. धन्यवाद.

    Like

   • Ajay says:

    धन्यवाद प्रणवजी, मराठ्यांच्या स्वार्यांचे मुक्काम पुस्तक पण शिवदे सरांकडे मिळाले. Shivaji The Great Vol 1 Part 2 Dr. Bal Krishna pdf कुठे मिळू शकेल का? बाकीचे ३ हि भाग pdf उपलब्ध आहेत.

    धन्यवाद

    Like

   • You are welcome Ajay. We have only V1P1, V4 and V5.Would be great if you share V2,V3 with us.

    Like

 16. सुदाम एकनाथ खालकर says:

  शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळ त्यांची नावे व् गावे (आजचे तालुके ) सांगता का कृपया

  Like

  • Umesh Joshi says:

   शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ
   पंतप्रधान मोरोपंत पिंगळे
   अमात्य नारो नीलकंठ / रामचंद्र नीलकंठ
   मंत्री दत्ताजी त्रिंबक
   सचिव अण्णाजी दत्तो
   सुमंत त्रिंबकपंत
   सेनापती हंबीरराव मोहिते
   पंडितराव मोरेश्वर रघुनाथ
   न्यायाधीश निराजी रावजी

   Like

 17. देवेन्द्र देशमुख says:

  नमस्कार मित्रांनो…

  राजगुरुनगर जवळ असलेल्या भोरगिरी किल्ल्याच्या इतिहासाबद्दल काहि माहिती मिळू शकेल का?

  Like

 18. श्रीकांत जंगम says:

  नमस्कार, ,,,,
  खुप छान आणि न वाचलेले माहिती मिळाली,!

  आपल्या ब्लाॅगचा सभासद होण्याकरता काय करावे लागेल किंवा होता येईल का?

  Like

 19. विवेक विनय जोशी says:

  जबरदस्त ब्लॉग आहे. इतिहासाच्या अभ्यासासाठी मला याचा सभासद होता येईल का..??

  Like

 20. गौरव रणवीर सुर्यवंशी says:

  अप्रतिम मांडणी,
  संदर्भासहीत उत्कृष्ट ब्लॉग. ..!

  बहिरजी नाईक आणि शिवरायांचे गारदी अथवा गारद ह्याविषयी समकालीन माहिती मिळु शकेल का?

  Like

  • Umesh Joshi says:

   मनःपूर्वक धन्यवाद्.
   बहिर्जी नाईक तसेच छत्रपति शिवाजी राजे यांचे guards किंवा गारदी हा अतिशय interesting विषय आहे. त्यांच्या बद्दल इतिहासात फारच थोड़ी माहिती उपलब्ध आहे. तरी हातात घेतलेले लेख पूर्ण झाल्या नंतर ह्या विषयावर लेख लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करू. Blog ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद्.

   Like

 21. प्रशांत says:

  आपल्या तिघांचे करावे तेव्हडे कौतुक आणि अभिनंदन कमीच आहे.

  सुरेख माहिती, मुद्देसूद रचना आणि पुराव्या सहित लेखन हे सर्व अप्रतिमच आहे.

  पुढील लिखाणास ” मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन “.

  Like

 22. वैशाली विजय बांदिवडेकर says:

  बारा मावळ हा शब्दप्रयोग छत्रपती शिवाजी महाराजांवरील लिहिलेल्या सर्वच पुस्तकात आढळतो, ती बारा मावळ नेमकी कुठली त्यांची नावे जाणकारांनी माझ्या माहितीसाठी कृपया सांगावीत.

  Like

  • विशाल खुळे says:

   १) अंदर मावळ
   २) नाणे मावळ
   ३) पवन मावळ
   ४) घोटाण् मावळ
   ५) मोसे मावळ
   ६) मुठे मावळ
   ७) गुंजन मावळ
   ८) वेळवंड मावळ
   ९) कर्यात मावळ
   १०) जुने मावळ
   ११) हिरडस मावळ
   १२) शिरवळ मावळ

   Like

 23. Ketan Pansare says:

  सर भारत मध्ये ज्या दोन विचार धारा जन्माला आला याला कोणती गोष्ट कारणीभुत आहे ,कदाचित एखादी विदेशी शक्ती तर या मागे पुर्वी पासून असेल का ? तुमचा ब्लॉग वर खुपच छान माहीती मिळाली,, वि.दा.सावरकर आणी बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही महान व्यक्तीमत्व आमच्या गावात आलेले ,त्यांची प्रचंड छाप दिसते , त्यातुनच ”सावरकर आंबेडकर विचारमंच” स्थापन झाला आहे , मनात खुपच द्विग्द अवस्था निर्माण झाली आहे तर मार्गदर्शन केले तर खुप बर वाटेल

  Like

  • Umesh Joshi says:

   नमस्कार केतन जी
   आपणास blog वाचून आनंद झाला हे वाचून आम्हास बरे वाटले. आपल्या गावात ‘सावरकर आंबेडकर विचार मंच’ स्थापन झाला आहे हे वाचून आनंद जाहला. आपणास जरूर मार्गदर्शन करू, परन्तु आपणास नक्की कशाबद्दल मार्गदर्शन हवे आहे ते स्पष्ट झाले नहीं. आमच्या दिलेल्या email ID वर नक्की mail लिहावा. आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद !

   Like

 24. chandu shinde says:

  shivjayanti tithipramane ki tarkhepramane sajari karavi ya baddal aaple kay mat aahe

  Like

 25. Umesh Joshi says:

  धादांत खोटी post आहे.
  कृपया आपण ह्या blog एतर काहीही विचारायचे असेल तर mail करावा.

  Like

 26. रोहित पवार says:

  आम्ही म्हणू तो खरा इतिहास , या वृत्तीला छेद देणारा तुमची संदर्भासहित website सुंदर आहे, बरेच दिवस पुराव्यासहित संदर्भांच्या शोधात होतो , ते मिळालं.
  धन्यवाद विशाल , प्रणव , उमेश

  Like

 27. ravi jadhav says:

  tarapur chya fort baddal mahiti milu shakel.ka?

  Like

  • Umesh Joshi says:

   नमस्कार.
   तारापूर च्या fort (?) (आपणास किल्ला म्हणावयाचे आहे का?) हो तारापूर च्या किल्ल्या बद्दल माहिती नक्कीच मिळू शकेल.
   धन्यवाद.

   Like

 28. विनीत दाते says:

  नमस्कार उमेश, प्रणव, विशाल … खूप दिवसांनी एक उत्तम साईट मिळाली ज्यावर अभ्यासपूर्ण माहिती आहे …
  आपण खरेच खूप परिश्रम घेतले आहेत आणि अर्थातच घेत राहाल … आपल्या या शिवकार्याबद्दल सलाम आणि भावी लिखाणबद्दल शुभेच्या …

  Like

 29. Manoj says:

  आजकाल दंडुक्याच्या जोरावर आम्ही म्हणू तो इतिहास अशी एक नवीन प्रथा सुरु झाली आहे. त्यात पुरावे, अभ्यास यांना काही स्थान नाही. या पार्श्वभूमीवर तुमचा ब्लॉग आणि आधार शोधण्यासाठी तुम्ही घेतलेले कष्ट हे पाहून खूप आनंद झाला. इतिहासात अनेक ठिकाणी पुराव्यांच्या अभावामुळे तर्काचा आधार घ्यावा लागतो त्यामुळे असे अनेक अनुत्तरीत प्रश्न आहेत जिथे नवीन संशोधनास वाव आहे. म्हणूनच तुम्ही हाती घेतलेल्या कार्यास शुभेच्छा. अजून काही चांगले वाचण्यास मिळेल अशी अपेक्षा.

  Like

 30. chaitanya walukar says:

  Aary bramhn he mulche kontya deshtil aahet ?

  Like

  • Umesh Joshi says:

   चैतन्य साहेब कृपया सदर blog संबंधित काही शंका असल्या तर त्या इथे विचाराव्यात, ह्या उपर काही प्रश्न असतील तर आमच्या Email ID वर Mail करावा. आपणास अभ्यासपूर्वक उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल.
   Blog ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद,.
   उमेश प्रणव विशाल.

   Like

 31. Sameer says:

  मित्रांनो, अतिशय सुंदर ब्लॉग आहे. Quick reference guide म्हणून मला याचा चांगला उपयोग झाला. लिहित रहा.
  – समीर दिवेकर

  Like

 32. नंदकुमार पानसरे says:

  नमस्कार

  Like

 33. सुशील फुले says:

  मराठा रीयासातीत शिवाजी राजांच्या जन्मापासून ते पेशवाईच्या शेवट पर्यंतचा
  इतिहास आहे का?

  Like

  • विशाल खुळे says:

   ब्लोगला भेट दिल्याबद्दल प्रथम सुशीलजी आपले आभार

   हो सुशीलजी मराठी रियासती मध्ये मधे शिवकालापासून ते पेशवाई पर्यंतचा इतिहास आहे. याच सोबत मुसलमानी रियासत आणि ब्रिटीश रियासत या दोन्ही देखील उपलब्ध आहेत

   उमेश – प्रणव – विशाल

   Like

 34. Ulhas Athavale says:

  Barech divas navin lekhachi vaat pahat ahe. Apla blog khoop chhan ahe ani mazya baryach mitranshi v itarahi anekanshi mi to share kelela ahe.

  Ulhas Athavale.

  Like

  • विशाल खुळे says:

   उल्हासजी प्रथम तुम्हास धन्यवाद

   उल्हासजी उमेश , प्रणव, आणि मी स्वत आम्ही तिघेही आपल्या कामाचा व्याप सांभाळून हे शिवकार्य करत आहोत त्यामुळे थोडा उशीर होत आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. नवीन लेख हे लवकरच येतील.

   Like

 35. सचिन मुद्राळे says:

  http://www.royalark.net/India4/satara2.htm
  अनेक राजघराण्यांची detailed वंशावळ या website वर आहे , http://www.royalark.net

  Like

 36. sham jadhav says:

  Khup atishay chhan aahe……. asech aamhala mahiti det raha .

  Like

 37. mudrale says:

  मला facebook वर सापडलेले intresting page, इतिहासप्रेमी मित्रांबरोबर share करू इच्छितो

  https://www.facebook.com/TheRoyalMarathas

  सचिन मुद्राळे

  Like

 38. Chaitanya says:

  mala प्रा.ग.ह.खरे लिखित ‘संशोधकाचा मित्र’ hya pustkachi pdf milel ka aathva kuthe milel te suchwawe aapla aabhari Chaitanya

  Like

  • “संशोधकाचा मित्र” या पुस्तकाचे pdf आमच्याकडे उपलब्ध नाही पण हे पुस्तक आपल्याला भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे इथे मिळेल अथवा http://www.sahyadribooks.com या संकेतस्थळावर मिळू शकेल. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

   Like

   • Chaitanya says:

    thanks sir… aani mala senapati Prataprao gujar Seanpati Sataji ghorpade aani Hambrirao mohite yanchi chritre v kary vachayche aahe tevha sarvar utkrusht book sucwal….. karan aajwar mi kadmbari wacht aaloy v tyamule mi wel fukat ghatlay asch wataty ha pn mahiti barich milali

    Like

   • कादंबरीकार आपले सगळे कष्ट कल्पनाविलास फुलवण्यावर घालवतो त्यामुळे त्यात इतिहास आणि सत्य शोधायला जाणे ही वाचकांची चूक म्हणावी लागेल. हंबीरराव मोहिते यांच्यावर डॉ.शिवदे यांनी एक छोटेखानी चरित्र लिहिले आहे, संताजी घोरपडे व प्रतापराव गुजर यांच्यावरील महेश तेंडूलकर लिखित पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत जी ससंदर्भ आहेत परंतु तरीही यांच्यापेक्षा उत्तम माहितीचे दुय्यम साधन म्हणजे श.श्री.पुराणिक लिखित मराठ्यांचे स्वातंत्र्यसमर भाग १ व २ तसेच सेतू माधवराव पगडी लिखित मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध हे आहेत. मराठी रियासतीतून देखील उपयुक्त साधन परिचय होवून चांगला अभ्यास करता येईल व त्यात या सर्व सेनापतीनबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे.

    Like

   • chaitanya Walukar says:

    Mahiti dillyabaddal dhanywad. marati riyasat madhe Chhtrapati Sambhji Rajanvar vait tippani keli aahe ase wachnyat aalay v raje Budhbhusan lihit hote tyas vegveglya granthatun v nadan lokanchya nadi lagun fakt copy paste kelet ase lihile aahe… He khare aahe ka

    Like

   • Umesh Joshi says:

    नमस्कार चैतन्य…..
    marati riyasat madhe Chhtrapati Sambhji Rajanvar vait tippani keli aahe ase wachnyat aalay
    आपण वरील विधान केले आहे. मला आपणास विचारायचे आहे…आपण ते स्वतः वाचले आहे का??? आणि वाचले असेल तर कृपया रियासातीच्या कितव्या खंडात किती क्रमांकाच्या पानावर सदर उल्लेख आहे ते जर कळवले तर बरे होईल. नुसतच “वाचनात आले आहे” या विधानाच्या आधारावर रियासत शोधणे म्हणजे किती कठीण आहे हे आपण जाणताच.
    उत्तराची वाट पाहत आहोत. म्हणजे आपल्या शंका सोडवण्यास मदत करू शकू.
    धन्यवाद.

    Like

 39. vishnu shelke says:

  रामचन्द्र पतानी शिवाजी महाराजाविषयी लिहिलेले इतिहास वर्णन वाचून महाराजाचा पराक्रम किती थोर होता या कल्पननेच अगावर शहारे येतात. मराठ्याचा इतिहास हा असाच असख्य बलिदानाने घडला आहे.

  Like

  • ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यावाद विष्णुजी.मराठ्यांचा इतिहास हा शून्यातून ब्रम्हांडाची निर्मिती आहे. असेच भेट देत राहा. लोभ असावा .

   Like

   • chaitanya Walukar says:

    रामचन्द्र पतानी शिवाजी महाराजाविषयी लिहिलेले इतिहास वर्णन he konte varnan aahe mhanje pustak aahe ki ekhada lekh

    Like

   • चैतन्य, आपण विष्णूजींच्या कॉमेंटला उद्देशून विचारात असाल तर त्याचे उत्तर आहे आज्ञापत्र. आज्ञापत्रातील शिवाजी महाराजांचे वर्णन म्हणून आलेली बावडेकर पंत अमात्यांची काही वाक्य आम्ही आमच्या शिवकालाच्या परिचय पानावर दिली आहेत.

    Like

 40. vishnu shelke says:

  नेटवर खूप दिवसापासून अशाच प्रकारच्या साईटचा शोध करत होतो, आज खूप हर्ष झाला. यापुढे इतिहासाबद्दल हवी असलेली माहिती सहज उपलब्ध होईल. धन्यवाद!

  Like

 41. ulhasathavale says:

  दादाजी कोंडदेवांच्या निमित्ताने सुरुवात केली आहे. खूप छान. माझ्यासारख्या इतिहासप्रेमींसाठी हि पर्वणीच आहे. खूप खूप आभार.

  उल्हास आठवले.

  Like

 42. Dr Sachin Mudrale says:

  मी आपला blog अनेक दिवस वाचत आहे.

  या blog च्या माध्यमाने आपण फारच मौल्यवान कामगिरी करत आहात.

  मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट अशी की प्रत्येक लेखाचा approach

  हा अकॅडेमिक असतो.फारच पद्धतशीर असतो.

  आपल्या सर्व team ला अनेक शुभेच्छा.

  Dr सचिन मुद्राळे

  Like

  • धन्यवाद सचिन मुद्राळे

   असेच blog भेट देत राहा. शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

   प्रणव – विशाल – उमेश

   Like

   • फिरोज इनामदार says:

    मला येसाजी कंक यांच्या बद्द्य सविस्तर माहिती हवी होती, मला मदत करू शकाल का?

    Like

   • Umesh Joshi says:

    नमस्कार फिरोज
    blog ला भेट दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. सध्या काही लेखांवर आम्ही तिघे काम करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. ते लेख पूर्ण होऊन प्रकाशित झाले की येसाजी कंक यांच्याबद्दल माहितीपूर्ण लेख लिहिण्याचा विचार नक्की करू. आम्ही आपली नक्की मदत करू शकू. कृपया आमच्या e-mail वर संपर्क साधावा.
    धन्यवाद.
    उमेश प्रणव विशाल.

    Like

   • फिरोज इनामदार says:

    नमस्कार उमेश, प्रणव, विशाल
    धन्यवाद !!!

    Like

 43. chan mahiti dilya baddal dhanyvad kandatikhore.wordpress.com check kara

  Like

 44. Ram says:

  tumche kahi lekh vachale khupach prabhashali aani mahatvapurn mahiti milali ajun sakhol abhyas karave ase vatat aahe tasech kahi lekh mi aamchya facebook page var suddha takale aahet tyas chhan pratisad milala aahe

  Like

  • Umesh Joshi says:

   नमस्कार राम.
   आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. लोकांनी अशाचप्रकारे सखोल अभ्यास करावा असे आम्हासही वाटते. आपण जरूर सखोल अभ्यास करावा. आपल्याला आमच्या तिघांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास काही मदत लागल्यास आम्ही नक्कीच करू.
   तुम्ही आमचे काही लेख आपल्या facebook page वर टाकले आहेत आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे हे वाचून आनंद वाटला. परंतू त्या लेखांखाली मूळ लेखकाचे नाव तुम्ही टाकत असाल अशी अपेक्षा करतो.
   धन्यवाद.
   blog ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
   उमेश.

   Like

 45. siddhesh bhide says:

  आपले सर्वच लेख उत्तम आहेत,एक विनंती म्हणजे मराठ्यांसाठी सर्वात महत्वाचा असलेला पानिपत संग्रमाविषयी एखादा सविस्तर लेख लिहावा,तसेच पानिपत संग्रामातील महत्वाच्या व्यक्तिरेखा जसे सदाशिवराव भाऊ,विश्वासराव भाऊ,नजीब खान,दुराणी बादशाह या व्यक्तिरेखांवर प्रकाश टाकणारा एखादा लेख लिहिलात तर फार उपकार होतील,कारण या सर्व व्यक्तींबाबत फारच कमी माहिती उपलभ आहे आणि जी आहे ती बरीच चुकीची आहे.धन्यवाद.

  Like

  • Umesh Joshi says:

   नमस्कार सिद्धेश जी
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पानिपत सारख्या गहन विषयाला हात घालताना खूप अभ्यास करूनच तो लेख लिहावा लागेल. आपणास सांगू इच्छितो की पानिपत या विषयावर लेख लिहिण्याच्या दृष्टीने श्री.प्रणव महाजन यांचा अभ्यास सुरु आहे. तसेच पानिपत संग्रमामधील सदाशिव राव भाऊ, विश्वासराव, नजीब खान, अहमदशाह अब्दाली यांचा देखील अभ्यास सुरु आहे. त्यांच्यावरही अथवा त्यांचा उल्लेख असेलेल लेख जरूर लिहू. सदाशिव राव भाऊ यांच्या उदगीर मोहिमेचा लेख लौकरच प्रकाशित करू.
   परंतु मी विशाल किंवा प्रणव हे तिघेही आपापले नोकरी, व्यवसाय सांभाळून इतिहासाच्या प्रेमासाठी, आपल्यासारख्या वाचकांसाठी हे लेखन करीत आहोत. त्यामुळे कधी कधी वेळ मर्यादा सांगणे कठीण होऊन जाते. परंतु लवकरच आम्ही पानिपत तसेच तुम्ही उल्लेख केलेल्या, ज्यांची विशेष माहिती उपलब्ध नाही अशा व्यक्तींवरील लेख प्रकाशित करू.
   धन्यवाद.

   Like

   • siddhesh bhide says:

    धन्यवाद.मला याची कल्पना आहे कि आपण आपले रोजचे व्याप सांभाळून इतिहास संशोधनाचे काम करीत आहात.त्यामुळे घाई नाही पण असा प्रयत्न आपण चालवला आहे हे पाहून बरे वाटले.आपल्या नवीन लेखांची मी नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतो आणि आपला पानिपतावरील लेख तयार होईल तेव्हा तो पूर्ण अभ्य्सानिशी असेल यात मला शंकाच नाही.आपल्या पुढील कार्यास शुभेछा.

    Like

   • Umesh Joshi says:

    मनःपूर्वक धन्यवाद….!!
    लोभ असावा….

    Like

 46. निखिल रत्नाकर says:

  खूप छान blog आहे . बरीच नवीन माहिती वाचायला मिळाली .

  Like

 47. mahesh bedarkar says:

  खूप सुंदर माहिती आहे .. भरपूर माहिती मिळाली

  Like

  • आमच्या Blog ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद महेश !

   Like

   • Sandeep Pangare says:

    मित्रानो !!!
    खुप छान उपक्रम !!
    भरभरून माहिती दिली आहे.
    आई जगदम्बा तुम्हा सर्वाना अजुन भरपूर माहितीचा खजिना उपलब्ध करून देवो ही सदिच्छा.
    जय भवानी जय शिवराय

    Like

   • आमच्या Blog ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद संदीप.
    वाचकांचे असेच प्रेम मिळत राहो आणि इतिहासातील सत्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    Like

 48. Deepak says:

  great one amalya lekhatun far kahi shikanyajoge aahe ,
  apalanala he sarv itihas ulaghadun dilyabadhal dhanyawad

  Like

 49. Nikhil Paranjape says:

  Namaskar Mavlyanu,

  ha Ma.I.Sa Blog lihilya baddal tumha trikutache abhar manave tevdhe todech ahet.
  I really admire your purity of purpose and consistency of purpose.
  Varkad bheti whyawyat.

  Like

 50. Sudhir Dhamale says:

  Khup bhari, chhan kam karat ahat tumhi mandali………..great

  Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: