शिवभूषण निनादराव बेडेकर यांची भाषणे

|| शिवदशक ||

छत्रपती शिवाजी महाराज व शिवकालावर आधारित शिवभूषण श्री. निनादराव बेडेकर यांची लोकप्रिय भाषणे. 

१. श्रीशिवछत्रपती आणि सह्याद्री

२. श्रीशिवछत्रपती आणि समुद्र व आरमार

३. श्रीशिवछत्रपती आणि कवि राज भूषण 

४. श्रीशिवछत्रपती आणि त्यांचा पत्रव्यवहार 

५. श्रीशिवछत्रपती आणि रणसंग्राम

६. श्रीशिवछत्रपती आणि स्वधर्म

७. श्रीशिवछत्रपती आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य / Timeless Management Techniques of Shivaji the Great

८. श्रीशिवचरित्राचे महत्व

९. श्रीशिवछत्रपती आणि महाराष्ट्र धर्म

१०. श्रीशिवछत्रपती आणि भगवान श्रीकृष्ण

सदर भाषणे ही रत्नागिरी, तळेगाव, डोंबिवली, प्रतापगड, पुणे अश्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी झाली असून, खुद्द निनादरावांकडून गेल्या काही वर्षात मिळवण्यात आली होती.

शिवप्रेमी रसिकांकरिता, एकत्रितपणे उपलब्ध केलेली ही भाषणे म्हणजे एक ऐतिहासिक पर्वणी आहे.

– निनाद रावांच्या स्मृतीस वंदन करून इतिहास प्रेमींच्या सोयीकरिता सादर समर्पित –

गुरुपोर्णिमा २०१५

8 Responses to शिवभूषण निनादराव बेडेकर यांची भाषणे

 1. Nitin Joglekar says:

  चिंचवड ला जिजाऊ व्याख्यानमालेमधे कै. निनाद बेडेकर यांचे व्याख्यान झाले. याला १५-२० वर्षे झाली असतील. या व्याख्यानात ईस्ट इंडीया कंपनीच्या भारतातील अधिकार्यांनी त्यांच्या वरच्या अधिकार्यांना लिहलेली पत्रे यावर व्याख्यान झाले. त्यांनी तांबे धातू ईस्ट इंडिया कंपनीकडून खरेदी करताना ईस्ट इंडिया कंपनीला या व्यवहारात कसे नुकसान शिवाजी महाराजांनी पत्करायला लावले याबाबत या व्याख्यानात सांगीतले. याची ध्वनी फ़ित किंवा ही माहिती पुस्तक स्वरुपात कुठे माहित असेल तर मला joglekar.nitin@gmail.com वर कळवावे. यासाठी आधीच आभार.

  Like

 2. Gorakh शिंदे says:

  सर नमस्ते
  सरांची भाषणे यूट्यूबवर ऐकली ज्या शिवभारताचा कवी भूषण चा संदर्भ देतात ते नक्की कुठे भेटेल abc ला काही ठिकाणी चौकशी केली पण नाही भेटलं कृपया मला मदत्त करावी

  Like

 3. shashioak says:

  श्री प्रणव,
  आजच्या या पोस्ट मध्ये अनेक महत्त्वाच्या बाबींवर निष्णात इतिहास तज्ज्ञ डॉ निनाद बेडेकर यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि भाषणे स्फूर्तिदायक आहेत.
  कारखाना या सदरात उल्लेखित महत्वाच्या गोष्टींची निर्मिती करण्यात सर्वात जास्त प्रमाणात लागणार्‍या तलवारी आणि ढाली निर्माण करायचे कारखाने कुठे होते? त्यांना लागणार्‍या धातूच्या खाणी कुठे होत्या? आदि विषयावर कै निनाद बेडेकर सरांचे विचार ऐकायला किंवा वाचायला आवडेल.

  Like

  • श्री. ओक साहेब, भेट दिल्याबद्दल धन्यवाद ! दुर्दैवाने शस्त्रास्त्रांवर निनादरावांचे लेख अथवा भाषण आमच्या सध्या संग्रही नाही.
   परंतु त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या इथे देतो.
   १. मराठ्यांना पोलाद बनवण्याचे तंत्र अवगत होते.
   २. युक्तीकल्पतरू आणि लोहार्णव या ग्रंथात आपल्या पूर्वजांनी लोखंडापासून पोलाद बनवण्याची पद्धती नमूद केलेली आहे ती मराठे वापरीत असत.
   ३. दमास्कस स्टील प्रमाणे मराठ्यांचेही एक विशेष पोलाद होते.
   ४. मराठ्यांनी तलवारीच्या आकारात आणि मुठीत बदल केले.
   ५. आज गादीयुक्त मुठ असणारी आणि बोटांचे संरक्षण करणारी मुल्हेरी मुठ हा मराठ्यांचाच अविष्कार
   ६. बागलाणात शस्त्राचा कारखाना असावा असे त्यांचा अंदाज होता
   ७. मुघलांकडून भरपूर प्रमाणात लुटूनही शस्त्रे मिळवली जात असत.
   ८. अरबी व्यापारी परदेशी शस्त्रे आणि विख्यात घोडी कोकण मार्गाने आणून महाराष्ट्रात विकत असत.
   ९. ढाली तीन फुली, चार फुली आणि सहा फुली होत्या.
   १०. गेंड्याच्या कातडीचा आणि इतर कडक चर्माचा वापर ढाली बनवताना केला जात असे.

   प्रतापशस्त्रागार मध्ये अधिक माहिती मिळू शक्ते. पाहून कळवतो.

   Like

 4. महेश लातूरकर says:

  नमस्कार, तुम्ही जे कार्य आरंभिले आहे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच,,, असो ,, वरील भाषणे Download करता येतील काय ?

  Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: