श्री शिवभारत
ऑक्टोबर 24, 2015 7 प्रतिक्रिया
शिवभारत अथवा अनुपुरण अथवा सुर्यवंश नावाचा हा ग्रंथ शिवचरित्राच्या अभ्यासाकरिता अत्यंत महत्वपूर्ण आहे. रचयिता कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर हा शिवसमकालीन असून राजापूर येथे झालेल्या एका महत्वाच्या धर्मपरिषदेत गागाभट्टसह इतर प्रमुख पंडितात कविन्द्रांच्या नावाचा उल्लेख आहे. आग्रा भेटी दरम्यानही कवींद्र उपस्थित असल्याची नोंद आहे. ग्रंथात कालानुरूप शेवटची आलेली ऐतिहासिक नोंद म्हणजे सिद्दी जौहरचा मृत्यू म्हणजे आज उपलब्ध असलेला ग्रंथ हा त्या घटनेच्या आस पास पूर्ण झाला. पूर्ण म्हणताना अयोग्य ठरेल कारण ग्रंथ अपूर्ण आहे असे दिसते. ३१ अध्याय पूर्ण असून ३२व्या अध्यायात ९ श्लोक आहेत. पुढील ग्रंथ पूर्ण झाला की अपूर्ण राहिला की रचनाकर्त्याचा जीवनकाळ संपला हे पुराव्या अभावे सांगणे अवघड आहे. तर असा हा सर्वोपयोगी ग्रंथ आज इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे. सर्वांकरिता सादर.
|| श्रीशिवभारत || – समकालीन – कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर
ekunach mahiti mala khup aavadali.
Dhanyavad. Ashich mahaiti det raha.
LikeLike
This website is best for understand our history
LikeLike
Thanks.
LikeLike
सर मला शिवभारत अनुवादित स्वरूपात pdf मध्ये मिळेल का
LikeLike
Please click on the link in the article. It gives you the pdf.
LikeLike
शिवभारत pdf file आहे का मराठी किंवा हिंदी भाषेत
LikeLike
आपण ज्या पेजवर कमेंट केली आहे तिथेच लिंकवर क्लिक केल्यास आपल्याला pdf फाईल डाउनलोड करता येईल.
LikeLike