शिवाजी राजे – साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा.
नोव्हेंबर 15, 2015 यावर आपले मत नोंदवा
स्वराज्यात शिवाजी महाराज साहूकार यांना किती महत्व देत याचा हा उल्लेख.
।। महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील सत्याचा संदर्भासहित मागोवा घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ।।
नोव्हेंबर 15, 2015 यावर आपले मत नोंदवा
स्वराज्यात शिवाजी महाराज साहूकार यांना किती महत्व देत याचा हा उल्लेख.
नोव्हेंबर 10, 2015 यावर आपले मत नोंदवा
नमस्कार वाचकहो !
ब्लॉगवरील लिखाणाचे हक्क राफ्टर पब्लिकेशनने घेतल्याचे आम्ही मागे कळवले होतेच. आपले प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावर आमची पुढची पायरी …
सादर करीत आहोत – राफ्टर पब्लिकेशन्स्ची दोन नवीन ऐतिहासिक पुस्तके..
“इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” (ऐतिहासिक लेखसंग्रह) :
“इतिहास” !! आज इतिहास म्हटलं की सर्वसामान्यांना नकोसा झालेला विषय. आधीच शाळेपासून सन-सनावळ्या आणि युद्धांमध्ये गुंतलेला इतिहास सध्या तर राजकारणी आणि जातियवादी लोकांमूळे जनसामान्यांना अक्षरशः नको वाटू लागला आहे. मग अशातच अनेकांचे फावते आणि इतिहास सोयीसाठी वापरला जातो. अनभिज्ञ तरुणांना न घडलेल्या गोष्टी सांगून पद्धतशीरपणे डिवचले जाते. यामूळेच हे सर्व रोखण्यासाठी काही तरुण अभ्यासकांनी आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा आणि मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा आपल्या लेखणीने संदर्भासह सजवण्याचा वसा घेतला आणि मग एक अमुल्य लेखसंग्रह सजला तोच “इतिहासाच्या पाऊलखुणा”. सदर लेखसंग्रहात आजपर्यंत मांडल्या गेलेल्या काही घटनांचीच एक वेगळी बाजू आपल्याला पहावयास मिळेल. काही घटना इतिहासकारांच्या ‘दृष्टीकोना’च्या बळी पडल्या, तर काही घटना ‘नजरचूकीने’ राहिलेल्या पुराव्यांवाचून मांडल्या गेल्या.अशा घटानांची संगती लावून, “इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” हा ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहीलेला लेखसंग्रह राफ्टर पब्लिकेशन्स दि. १९ डिसेंबर २०१५ रोजी आपल्यासमोर घेऊन येत आहे.
“पेशवाई” :
पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच ! कोकणातील श्रीवर्धन येथून घाटावर आलेल्या बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांच्या पुढच्या वंशजांनी स्वराज्यकार्यात आपले आयुष्य झोकून दिले. बाळाजीपंतांनंतर भट घराण्यातील चार पिढयांनी समर्थांच्या “शक्ती-युक्ती जये ठायी” प्रमाणे पराक्रमाला बुद्धीची जोड देत “सिंधू नदीच्या पैलतीरापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत सारा मुलुख स्वराज्यात यावा” हे शिवछत्रपतींचे स्वप्न अठराव्या शतकात पूर्ण केले. या पेशवाईचा एक संक्षिप्त आढावा म्हणजे “पेशवाई : महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान” !! कौस्तुभ कस्तुरे लिखित हे पुस्तक राफ्टर पब्लिकेशन्स लवकरच आपल्यासमोर घेऊन येत आहे.. या पुस्तकात शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून ते शेवटचे पेशवे बाजीराव रघुनाथ इंग्रजांना शरण गेले तोपर्यंतचा कालखंड आणि त्यातील पेशवाईशी निगडीत घटना चितारण्यात आल्या आहेत. हा ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहीलेला ग्रंथ राफ्टर पब्लिकेशन्स दि. १९ डिसेंबर २०१५ रोजी आपल्यासमोर घेऊन येत आहे.
तेव्हा कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी !
बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असु द्यावे.. धन्यवाद !
– लेखक, प्रकाशक आणि मित्रवर्ग –
नोव्हेंबर 1, 2015 3 प्रतिक्रिया
राज्य चालवत असताना वतन देन्या संबधी शिवाजी महाराजांचे धोरण किती कड़क होते हे खालील उतारा वाचून प्रत्यय येतो