गोविंदपंत बुंदेले – ‘आम्ही कान धरली शेळी आहो’

गोविंदपंत बुंदेले (मूळ आडनाव खेर) हे मराठ्यांचे उत्तरेतील एक मातबर सरदार होते. छत्रसालाकडून मिळालेल्या बुंदेलखंडातील राज्यावर सुमारे १७३३ दरम्यान त्यांची नियुक्ती झाली असावी. प्रस्तुत पत्र हे एका वेगळ्या अर्थाने इतिहासावर प्रकाश टाकणारे आहे. जातीवरून शिव्यांची लाखोली वाहणारे स्वयंघोषित इतिहासप्रेमी आज ब्राम्हण समाजाला टार्गेट करतात. पेशव्यांनी स्वराज्य बुडवले, मराठा सरदारांना ‘बामण’ पेशवाईत चांगले वागवले गेले नाही असे बिनबुडाचे आरोप करत हिंडतात. हे पत्र २३ सप्टेंबर १६५५ रोजी गोविंदपंत बुन्देल्यांनी नानासाहेब पेशव्यांना लिहिले आहे. उत्तरेतील हकीगत सांगणारे हे पत्र स्पष्ट आणि बोलके आहे. अभ्यासकांनी पत्र निट वाचावे. एका बोलक्या वाक्यात पत्राचा सारांश सांगायचा म्हणजे – “…बख्र-उल्ला खान नावाचा पातशाहीत नामी सरदार होता, त्याला परम संकटात जाऊन, परम उपाय करून (बुंदेले यांनी) बुडवला.… (खंत व्यक्त करताना गोविंदपंत लिहितात) मराठा सरदार हे कर्म करिता तर जमिनीवर न माता (मराठा सरदारांपैकी कुणी हे कार्य केले असते तर त्याला स्वामींनी आभाळात ठेवले असते /  खूप गौरव केला असता) आम्ही स्वामींचे ब्राम्हण आमची शिफारस कोण करणार? (गोंविंदपंत ब्राम्हण म्हणून त्यांच्या पराक्रमाकडे कानाडोळा झाला असे ते लिहितात / त्यांनी कुरा कोडा नावाचे अलाहबाद नजीकचे प्रांत हस्तगत केले होते) “. पुढे अब्दालीच्या तुकडीकडून हेच गोविंदपंत बुंदेले पानिपत संग्रामापूर्वी मारले गेले. अधिक काय लिहावे.

मूळ पत्र संदर्भ – मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३ (जुना) – लेखांक १३७

गोविंदपंत बुंदेले यांचे नानासाहेब पेशवे यांना लिहिलेले पत्र

गोविंदपंत बुंदेले यांचे पत्र

 

 

 

4 Responses to गोविंदपंत बुंदेले – ‘आम्ही कान धरली शेळी आहो’

  1. Shewale (Maratha) says:

    Today we all are hindu is due to only Shivaji Maharaj, Sambhaji Maharaj, Rajaram Maharaj, Tarabai and Peshwai (sequentially) , its useless to give credit to any caste, In Maratha history Maratha means from Maharashtra, not only 96k maratha,

    Like

  2. Pranav Patil says:

    आपण म्हणता ते बरोबर आहे. आज या महाराष्ट्रदेशी असे अनेक लोक आहेत. जे जातीयवाद पसरवतात , मुळात यांचा इतिहासाचा काडीचाही अभ्यास नसतो. पेशवाईत मराठा सरदारांवर अन्याय झाला , असे कोणताही जाणकार मराठा म्हणणार नाही आणि म्हणत नाही . मूर्खांच्या नांदी लागून आपण अधिक क्लेश करून घेऊ नये .
    आणि या जातीयवादी लोकांच्या वागण्यामुळे इतिहास दूर राहतो आणि भलतंच जातीयवादाच घाणेरडे विष पसरवलं जात. आपण यास थारा देऊ नये आणि यासाठी समस्त मराठा समाजास हि दूषण देऊ नये.

    Like

Leave a reply to प्रणव महाजन उत्तर रद्द करा.