शिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर
मार्च 18, 2016 यावर आपले मत नोंदवा
१६७१ साली कोकणातील दाभोळ इथे नारळ स्वस्तात विकले जात होते. ज्यामुळे आसपासच्या परिसरात नारळाच्या व्यापारावर परिणाम होत होता. शिवाजी राजांच्या हे लक्षात येताच त्यांनी मामले प्रभावळीचे सुभेदार तुकोराम यांना नारळाच्या विक्रीबाबत दक्षता घ्यावी ह्याबद्दल हे पत्र लिहिले आहे. शिवाजी राजांचा आत्मविश्वास आणि व्यापार नीती पत्रात स्पष्ट दिसून येते. मशहुरल हजरत मायन्याचे २४ सप्टेंबर १६७१ रोजी लिहिलेले हे पत्र शिवाजी राजांच्या राज्याभिषेक पूर्वीच्या पत्रात दिसणाऱ्या जुन्या मायन्यांपैकीचे एक आहे. शिवशाहीच्या त्रिशुळाने जिंकलेला कोकणच्या प्रदेशात स्थिर झाल्यानंतर, मराठ्यांचा आत्मविश्वास चांगलाच बळावला असावा. त्याचा परिणाम अश्या पत्रांतून रूंदावणाऱ्या व्यापारी हेतूतून आणि एक केंद्रशासित सत्ता आणि व्यवस्थापन व्हावे ह्या नीतीतून दिसतो. स्वराज्य चौफेर वाढत असताना देखील केंद्रशासित रहावे तेव्हा कुडाळच्या नरहरी आनंदराव सुभेदाराला देखील डिसेंबर १६७१ मध्ये असाच एक जबर जकातीचा हुकुम महाराजांनी पोर्तुगीज मीठावर लावावा असे लिहिलेले दिसून येते. ते पत्र आपण पुढच्या काळात पाहूया. तूर्त मर्यादा.
मूळ संदर्भ – मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ जुना – लेखांक २६
शब्दार्थ –
गीर्दवारी = गिर्दावरी – जमवा-जमव
कमनिर्खे = कमी निरखे – कमी भावात

तुकोराम सुभेदार यांना शिवाजीराजांचे पत्र