अभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे”

” महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे ” हे वाक्य समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांसाठी पत्रात लिहले. मनात एक सहज विचार आला महाराष्ट्र शब्द शिवकाळात अजून कुठे मिळतोय का ते पाहूया.योगायोगाने आज शिवकाळातील सर्वात विश्वसनीय मानले जाणारे साधन म्हणजे “शिवभारत” यातील चौथ्या अध्याया मधे महाराष्ट्र हा उल्लेख आज वाचताना मिळाला तो  देत आहे.

image

3 Responses to अभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे”

 1. Pruthviraj says:

  इतिहासात महाराष्ट्र शब्दाचा जर शोध घेतच असाल तर शिवकालाच्याही अगोदर चारशे वर्षांपूर्वी म्हणजे बाराव्या शतकात चक्रधर स्वामींनी शिष्यांना महाराष्ट्र नावाच्या पवित्र भूमीची सीमा सांगीतली आहे (याचा अर्थ महाराष्ट्र शब्द बाराव्या शतकाच्याही बऱ्याच अधिपासून प्रचलित असावा)

  ‘साठी लक्ष देश महाराष्ट्र। तेथिचे शहाणे सुभटू। वेदशास्त्र चातुर्याची पेठू। भरैली तिये देशी।। ऐसे ते महाराष्ट्ररावे सुंदरू। वरी महाराष्ट्र भाषा चतुरू। तेही वसविले गंगावीरू। क्षेत्र त्र्यंबकू वेऱ्ही।। पश्चिमेस त्र्यंबकूपूर्व सागर वेऱ्ही द्वादश। योजने उभयगंगातीरी। ऐसे ते गंगातट महाराष्ट्री। वाजिसे पुण्यातन।। तिये गंगातीरी महंतु। तेथे सदा ईश्वरावतारू।।’ एवढे सांगून झाल्यावर महाराष्ट्रात कोणत्या खंडमंडळाचा (विभागाचा) समावेश होतो, हे श्री चक्रधर स्वामींनी सांगितले आहे.

  ‘देश म्हणजे खंडमंडळ। जैसे फलेठाणापासेनि दक्षिणेसी। मऱ्हाठी भाषा जेतुला ठाई वर्ते ते एक मंडळ। तयासि उत्तरे बालेघाटाचा सेवटची असे। ऐसे एक खंडमंडळ। मग उभय गंगातीर तेहि एक खंड मंडळ। आज तयापासेनि मेधकर (मेहेकर) घाट: ते एक मंडळ: तयापासोनि आवघे वराड: तेहि एक मंडळ। पर आघवीचि मिळोनि महाराष्ट्राची बोलिजे। किंचित किंचित भाषेचा पालट असे म्हणौनी खंडमंडळे म्हणावी।।’ सारांश, फलटणच्या दक्षिणेपासून आणि गोदावरीच्या दोन्ही तीरावरच्या प्रदेशापासून म्हणजे मराठवाडय़ापासून ते मेहेकर घाटापर्यंतचा नि वऱ्हाडचा सर्व मराठी भाषिक प्रदेश म्हणजे ‘महाराष्ट्र’

  संदर्भ : http://prahaar.in/७००-वर्षापूर्वी-चक्रधर-स/

  Like

 2. shashioak says:

  विशाल जी,
  सुंदर संदर्भ दिला आहेत. अदिलशाही ही तशी महाराष्ट्राबाहेरील. जसे आजचे विजापूर आहे तसे मानले, तर शिवभारतातील वर्णन मराठा सैन्याच्या नामचीन (महाराष्ट्र देशातील) सरदारांच्यापैकी जे अदिलशाहीतील विविध सरदार आणि शिलेदार यांच्या यादीत नाव देताना साहजिकच केलेला वाटतो. जसा कोणी महाराष्ट्रात राहणाऱ्याला मी महाराष्ट्रीय आहे असे फारसे म्हणावे लागणार नाही पण तो परप्रांतीयांच्या किंवा परदेशात गेला तर पटकन मी महाराष्ट्रीयन आहे म्हणेल…

  Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: