शिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण
मे 10, 2016 2 प्रतिक्रिया
|| शिवभूषण निनादजी बेडेकर – एक आठवण ||
कविता – निर्धार – कविवर्य कुसुमाग्रज
व्याख्याते – गुरुवर्य शिवभूषण श्री निनादजी बेडेकर
आदरणीय काका,
आज १ वर्ष झाले, तुम्ही आम्हाला सोडून गेलात. आमच्या कुतुहलाचे रुपांतर तुम्ही अभ्यासात करवून घेतले. इतिहासातले जे काय तोडके मोडके बारकावे समजले ते केवळ तुम्ही वाट दाखवलीत म्हणून. सह्याद्रीतील दऱ्या- खोऱ्यातील वाऱ्याला तुम्ही आमच्या साक्षीने बोलते केले. प्रत्येक पैलूचे रहस्य उलगडून दाखवले. तुम्ही दिलेला हा ठेवा आम्ही जतन करणार आहोत. सत्याची कास आम्ही सोडणार नाही आणि तुम्ही दाखवलेल्या रस्त्याने आम्ही चालत राहू .…..
एक नक्की, या वाटचालीतील प्रत्येक पाऊलावर आम्हाला तुमची नेहमीच आठवण येइल.
– विनम्र विद्यार्थी –
प्रणव – विशाल – उमेश
श्री निनाद बेडेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांना सादर नमन…
शशिकांत ओक
LikeLike
_^_
LikeLike