
यस्याश्वा तस्य राज्यं ।
मध्ययुगीन इतिहासात घोड्यांना अनन्य साधारण महत्व होते. घोड्यांची निगा राखणे, उत्तम जातिवंत घोडी खरेदी करणे हा रोजच्या राजकारणातील एक अविभाज्य घटक होता. खुद्द शिवाजी राजे आपल्या घोड्यांच्या पागेत जाऊन रोज एक श्लोक म्हणत असत असे ९१ कलमी बखरीत नोंद केलेले आहे. –
यस्याश्वा तस्य राज्यं ।
यस्याश्वा तस्य मेदिनी ।
यस्याश्वा तस्य सौख्यं ।
यस्याश्वा तस्य सामराज्यं ।।
एकदा सरसेनापती हंबीरराव यांनी कनकगिरीच्या पाळेगाराकडून काही शिंगर विकत घेतली होती. वळीवाच्या पावसात ती भिजली. महाराजांना ही बातमी समजताच त्यांनी मुजुमदार अनाजी मलकरे आणि हंबीरराव यांची चांगलीच फजिती केली होती. मुजुमदारांना १२५ होन जमा करायला सांगितले आणि पुढे याच शिंगरांची काळजी घ्यावी आणि त्यावर पागेचा डाग द्यावा म्हणून त्यांनी हुकूमही केला होता.
पानिपतच्या लढाईपूर्वी तमासा नावाच्या संसर्गजन्य रोगाने १० हजार घोडी मृत्युमुखी पडली होती. आजच्या प्रस्तुत नोंदी ह्या पेशवे काळातील यादी असून त्यातून घोड्यांच्या तसेच इतर जनावरांच्या आजारावर कसा इलाज केला जात असे याचे उल्लेख आहेत. उंट माती खाऊ लागल्यास काय करावे, गाई, घोड्याचे पाय मोडल्यास त्याचा इलाज, म्हशीच्या शिंगांचा औषधी उपयोग अश्या अनेक चमत्कारिक नोंदी तुळशीबागवाले दफ्तरात सापडल्या.

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद
राजकीय इतिहासाच्या चर्चेत या व्यावहारिक नोंदी इतिहासात कुठेतरी हरवून जातात. त्याच लोकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न.
Like this:
Like Loading...