समस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर

वाचकहो नमस्कार,
ब्लॉगवर नियमितपणे आपण अनेक प्रश्न विचारात असता. त्या प्रश्नांना आम्ही जमेल तशी यथाशक्ती उत्तरे देतो. प्रश्नांचा ओघ वाढल्याने त्यासाठी स्वतंत्र सदर सुरु करत आहे ज्याने सर्व प्रश्न एका जागी एकसंध राहतील.

आपल्यालाही मराठ्यांच्या इतिहासासंबंधी काही प्रश्न आहेत का ? असल्यास या सदरात आपण ते विचारू शकाल.

– धन्यवाद –


श्री रवी जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाने सदर सुरु करतो.

श्री रवी जाधव यांचा प्रश्न –

संभाजी महाराज कधी तारापुर भागात आले होते का? मी तारापुर जवळच राहतो…किल्ल्या पासून दहा पावलांन वर आमची शाळा आहे.. रा. ही. सावे विद्यालय..
Itke vrsha tithe shikun amhi bhautek vela killya chya magchya bajune jaycho baghayla kai ahe te.. kadhi madhe jata nahi al amhala…te kahitari karara ne dilele ahe mhantat to killa purvi pasun ajun hi to killa jyana dila hota tyanchya dekh rekhi khali ahe..private property ch jhali as mhanav lagel karan to nehami bandach asto..mala nit mahiti nahi…pan lahana cha motha jhalo pan kadhi madhe kai ahe te baghta nahi ala mhanun… Mala asa prashna padlay ki sambhaji maharaj kadhi hya bhagat ale hote ka? Kelve-mahim,tarapur,daman, vasai hya Portuguesanchya bhagat? Chimaji appa ale hote pan sambhaji maharaj???

Mobile varun marathi type karayla khup vel lagat hota mhanun English madhech type karun bolo sorry…mi hach prashna Facebook var pan takla hota pan kahi uttar nahi milal mhanun ithe punha..

शंभूराजे आणि तारापूर

आपण उल्लेख केलेला परिसर उत्तर फिरंगाण आहे.

या भागात खुद्द संभाजी राजे आले होते का?

याचे उत्तर आहे होय ! – १५-४-१६८३ रोजी संभाजी महाराजांनी स्वतः १००० घोडदळ आणि २००० पायदळ घेऊन तारापूरवर हल्ला केला आणि किल्ल्याबाहेरील शहर जाळले. मराठ्यांच्या इतर तुकड्यांनी दमण पासून वसई पर्यंत काही छोट्या बंदरावर हल्ले केले. २ पोर्तुगीज पाद्री देखील कैद केले होते. तारापूरच्या पोर्तुगीज वखारीचा अधिकारी मॅन्युअल अल्वारेस याने मराठ्यांना प्रतिकार केला आणि गोव्यालाही वृत्त पाठवले. गोवेकरांनी मराठ्यांचा गोव्यातील वकील येसाजी गंभीरराव याला अटक केली. पुढे मराठ्यांनी पोर्तुगीझांना येणारे धान्य अडवले आणि रसद मारली ज्यामुळे त्यांनी माघार घेऊन येसाजीला सोडून दिले. पुढे हे संबंध वाईट होत गेले आणि १६८४ दरम्यान संभाजी राजांची मोहीम दक्षिण फिरंगाणात झाली.  ज्याला आज आपण गोवा मोहीम किंवा व्हडलें राजीक म्हणतो. संभाजी महाराजांच्या फक्त हालचाली वाचायच्या असल्यास श्री. शिवदे यांचे ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा या पुस्तकातील जोड प्रकरणातील कालपट हा धडा वाचावा. परंतु या मोहिमेत तारापूर काही मराठ्यांच्या ताब्यात आला नाही असे दिसते कारण मोहीम गोव्याच्या दिशेने फिरली आणि पुढे मुअज्जमच कोकणात उतरला. १६७० ते १७२८ पर्यंत तारापूर किल्ला आणि प्रदेश पोर्तुगेज अंमलाखाली होता हे निश्चित नोंदींवरून समजते. चिमाजी अप्पांनी हा प्रदेश पुढे स्वतंत्र केला. भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

10 Responses to समस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर

 1. Shvaji Maharajanchya padari 700 pathananchi fauj hoti hi mahiti khari aahe kay?

  Like

 2. Ravi Jadhav says:

  Uttar firangan var jar abhyas karavayacha asel tar konti pustake tumhi suchval? 😃

  Like

 3. shashioak says:

  नमस्कार, काही काळापु्वी शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंना मोहिम सुरु व्हायच्या कदाचित आधी एक पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी आपण राजपूत असूनही मोगलांची चाकरी का करता आहात आणि अन्य बाबींचा उल्लेख केला होता. म्हणतात त्या पत्राचा इंग्रजी तर्जुमा देखील उपलब्ध आहे. यावर प्रकाश टाकावा ही विनंती.

  Like

 4. Ratnesh Kini says:

  तारापूर किल्ल्यावर गेले 5 वर्षे झाले संशोधन करतोय, दरम्यान बऱ्याच गोष्टी नव्याने कळाल्या आहेत. 5 वर्षांपासून दरवर्षी न चुकता विजय दिवस देखील साजरा होतो. काही प्रश्न असल्यास फेसबुक वर व्यक्तिगत विचारावे… तसेच वर दिलेली तारीख चुकीची असून तो महिना फेब्रुवारी होता हे निदर्शनास आणून देतो.

  Like

  • आपण करत असलेल्या कामाबद्दल शुभेच्छा. आपण फेब्रुवारी महिना होता असे म्हणालात, त्याला आपण कुठला पुरावा वापरत आहात ? फेब्रुवारीचा उल्लेख आम्हालाही २ शंभूचरित्रात आढळला परंतु डॉ. कमल गोखले यांनी पोर्तुगीज पत्राचा आधार घेऊन या मोहिमेविषयी वक्तव्य केले आहे. त्या पत्रावर १५ एप्रिल तारीख आहे. भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

   Like

 5. Ravi Jadhav says:

  दुर्गाबाई आणि संभाजी महाराज यांचे भगिनी अखेर पर्यंत मुघलांच्या कैदेत होते का?
  का त्यांची नंतर सुटका झाली?

  Like

  • ते अखेर पर्यंत मुघल कैदेतच होते. दुर्गाबाई यांच्यावर अहमदनगरच्या किल्लेदाराने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला अशी एक नोंद मिळते त्याकरिता त्याला पुढे शिक्षा करण्यात आली होती व दुर्गाबाई यांची बहादूरगडावर रवानगी करण्यात आली. त्यापुढे त्यांचा काहीही सुगावा कागदपत्रात लागत नाही.

   Like

 6. Ravi Jadhav says:

  Ithech ek asheri gad sudha ahe mi jaun aloy tithe… Sambhaji maharaj ani asheri search karat astana vachanyat al hot ki to killa tyani ghetla hota.
  tya baddal kahi mahiti milel ka?
  Karan tya baddal jast mahiti nahi milat kuthe..
  Tumhi mhantlya pramane ha bhag uttar firangan ahe hya bhagat marathyanchi halchali chimaji appan pasun disun yete.. Tya agodarch jast kuthe vachnyat yet nahi.. Mhanje shivaji maharaj, sambhaji maharaj hyanchya kala pasun ch..hya bhaga varcha marathyanchya itihasa varche konte pustake ahe ka??

  Like

  • १६८३ मध्ये अशेरीवर मराठ्यांनी हल्ला केल्याची नोंद पोर्तुगीज कागदपत्रात आहे पण खुद्द शंभूराजे असल्याचा उल्लेख नाही. शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या काळात उत्तर कोकण भागात काही स्वाऱ्या झाल्या आहेत ज्या त्यांच्या चरित्रात नमूद आहेत. आपण कमल गोखले यांचे शिवपुत्र संभाजी, डॉ. शिवदे यांचे ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा आणि श्री. विजयराव देशमुख यांचे शककर्ते शिवराय वाचा त्यात संक्षिप्त माहिती मिळेल. श्री. मेहेंदळे यांचे संपूर्ण शिवचरित्र प्रकाशित झाल्यावर त्यातही ही माहिती उपलब्ध होईल. सध्या तळटिपेत नोंदी आहेत ज्या कदाचित पुढे विस्तृत होतील.

   Like

 7. Ravi Jadhav says:

  Khup anand jhala aikun ki sambhaji maharaj ithe ale hote..
  Ithe kadachit konala mahit nasel he.. Fakt chimaji appa ale hote itkach mahiti ahe..
  Sambhaji maharaj jatine bharpur mohimet hajar ahet as diste
  Tumchya blog la mi 2 varsh jhale astil bhet det asto
  Khup samadhan vatla prashna ch uttar milal mhanun.. Nahitar google var search karun pahije tevdhi mahiti nahi bhetat ata ek nischit sthan bhetle prashna vicharnya sathi.
  Dhanyavad pranav ji…

  Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: