“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….”

दिनांक २० जुलै १८७९

मध्यरात्री वासुदेव बळवंत फडके यांनी घिंबी खुर्द सोडले. देवरनावडगी हे विजापूर जिल्ह्यातील एक गाव आहे. तेथे मुक्काम करण्याचा निर्णय फडके यांनी घेतला. तेथे जवळच्याच डोंगरात खोदलेल्या बुद्ध विहारात विश्रांती घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्यासोबत गोपाल मोरेश्वर साठे नावाचे विश्वासू सहकारी होते. त्यांच्यासोबत काही महत्वाची कागदपत्रे, थोडे पैसे, त्यांची आवडती तलवार आणि एक पिस्तुल होते. Major  Daniell त्यांच्या मागावर होता. फडके ३०/३५ मैलाचे अंतर कापून आले होते. खूप दमून गेले होते. त्यांनी दिवसभर काहीही खाल्ले नव्हते.  त्यांचे शरीर ज्वराने फणफणत होते. ओळख पटू नये म्हणून त्यांनी दक्षता घेतली होती. फेटा बांधला होता आणि त्या फेट्याचा लपेटा तोंडावरून घेतला होता. त्यामुळे  पाहणाऱ्याला  त्यांचा संपूर्ण चेहेरा दिसत नव्हता. Major Daniell, अब्दुल सय्यद हक़, Stephenson हे दबक्या पावलांनी विहारापाशी  आले. तिथे अनेक यात्रेकरू झोपले होते. वासुदेव बळवंत फडके यांना गाढ झोप लागली होती. कंदिलाच्या प्रकाशात ओळख पटताच निजलेल्या वासुदेव बळवंत फडके यांच्यावर झडप घातली आणि कैद करण्यात आले. २४ तासांनंतर फडके यांच्या अटकेची बातमी खरी आहे याची खात्री पटल्यावर मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास मुंबईच्या वृत्तपत्रांच्या पुण्याच्या वार्ताहारांनी आपल्या वृत्तपत्रांना भराभर तारा पाठवल्या…

Arrest of Wassudeo Bulwant Phadke

Poona- July 22

11.35 Pm

Our Poona correspondent telegraphs that the “Notorious” Wassudeo Bulwant Phadke was arrested by Major Daniell in the Kalladgi District between Belgaum and Kolhapure.

Wassudeo was in the course of flight and was traced from village and finally caught with one companion in the temple. Wassudeo had enlisted five hundred Arabs And Rohillas and advanced there jamadar Rs. 2000 promising  Rs. 3000 more to purchase horses. Paper found with him contain a proposed plan of operation and rules for his conduct and deportment while fighting. The news of his capture has created great excitement in Poona.

 

Vasudev B Phadke

वासुदेव बळवंत फडके यांना जागेपणी पकडणे अशक्य आहे याची जाणीव Major Daniell याला असावीच. त्यामुळे तोही बराच वेळ त्यांच्या मागावर असून त्यांना पकडण्याचे धारिष्ट्य दाखवू शकला नव्हता. वासुदेव बळवंत फडके यांच्यावर तो लक्ष ठेउनच होता. त्यांच्या मागावर होता. ते याच गावात विश्रांतीसाठी थांबतील हा त्याचा अंदाज खरा ठरला. शिवाय त्यांच्याबद्दल कोण्या फितुराने देखील माहिती दिली असल्याचे दिसते. नावं उपलब्ध नाहीत. कंदिलाच्या प्रकाशात ओळख पटवून घेतली तेव्हा वासुदेव बळवंत फडके दमून शांत झोपी गेले होते. समोर असलेल्या वासुदेव बळवंत फडके यांच्या दोनी बाजूला पाय ठेऊन. त्याच्यावर पिस्तुल रोखून, एक पाय त्यांच्या तलवारीवर ठेऊन दुसऱ्या हाताने गळा दाबून मोठ्या शौर्याने (?) पराक्रम गाजवून (?) major Daniell  याने ज्वराने थकून झोपलेल्या फडक्यांवर झडप घालून कैद केले. त्याची बातमी मुंबईच्या वृत्तपत्रांनी विजयी सुरात छापली.

इंग्रजांच्या नाकी नऊ आणून सळो कि पळो करणारे आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना मानाचा मुजरा.

(संदर्भ: वासुदेव बळवंत फडके चरित्र. पृष्ठ  २६०,२६१,२६३,२७१)

उमेश जोशी.

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: