वीर खुदिराम बोस

खुदीराम बोस

 

भारतातील पहिल्या बॉंबचा यशस्वी रित्या प्रयोग करणारे पहिले क्रांतिकारक म्हणजे खुदिराम बोस.खुदिराम बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी बंगाल मधील मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी गावी झाला. त्र्यलोक्यनाथ बोस हे त्यांचे वडील. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीप्रियादेवी. खुदिराम यांना एक मोठी बहीण होती तिचे नाव अपरूपा. खुदिराम 10 वर्षाचे असताना त्यांचे आईवडील निजधामास गेले. यानंतर त्यांचा सांभाळ हा त्यांच्या बहिणीने केला. पुढील शिक्षणासाठी खुदिराम हे मिदनापूर येथे आले. जसे जसे वय वाढत होते तसे तसे क्रांतिकार्याची ओढ खुदिराम याना लागत गेली.

मिदनापूर येथे “युगांतर” या क्रांतिकारक गुप्त संस्थेचे ज्ञानेन्द्र नाथ बोस यांनी त्यांना क्रांतिकार्यत येण्यास सांगितले. 1905 साली ब्रिटिश व्हाइसरॉय लोर्स कर्झन याने बंगालच्या फाळणीला मान्यता दिली आहे अशी घोषणा केली. या निर्णयामुळे बरेच बंगाली तरुण त्वेषाने पेटून उठले. या फाळणीचा विरोध सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपिनचंद्र पाल, आणि लोकमान्य टिळक या सर्वांनी केला.

यानंतर मिदनापूर येथे 1906 साली स्वदेशीच्या आंदोलना वेळी एक शेतकी प्रदर्शन भरले होते यावेळी खुदिराम आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी पत्रके वाटली. सत्येंद्रनाथ यांच्या कडे युगांतर मिदनापूर चे नेतृत्व होते. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या धाडी मध्ये कसे बसे प्रयत्न करून खुदिराम यांनी तिथून पळ काढला,त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. यामुळे त्यांना आपले घरदार ओडावे लागले आणि ते एका विणकामच्या शाळेच्या वस्तीगृहवर जाऊन राहू लागले. पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी एक दिवशी अचानक छापा घातला आणि खुदिराम यांना अटक केली. 1906 एप्रिल मध्ये खुदिराम यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला.हा खटला मिदनापूर येथील सेशन कोर्टसमोर चालला. यातून 16 मे 1906 रोजी खुदिराम बोस निर्दोश सुटले.

बंगालच्या फाळणी विरोधी आंदोलनात बऱ्याच क्रांतिकार्यना क्रूर शिक्षा ठोठावण्यात आल्या. या शिक्षा देणाऱ्या मध्ये कलकत्त्याच्या चीफ मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड हा अग्रेसर होता. याच चीफ मॅजिस्ट्रेट ने नंतर युगांतर, नवशक्ती, संध्या,वसुमती, यांच्या संपादकांना कठोर शिक्षा दिल्या. याबद्दल ब्रिटिश सरकारने किंग्जफोर्डची मुझफ्फरपूर ला जज म्हणून बदली केली. आता क्रांतिकारकांचा निर्णय झाला होता बैठकीत किंग्जफोर्ड ला यमसदनी धडण्याचा निर्णय झाला होता. यानंतर खुदिराम कलक्त्यास येऊ लागले तिथे त्यांचे मामा सतीशचंद्र दत्त यांच्याकडे कॉर्पोरेशन ⅘ स्ट्रीट येथे उतरत असत. याचदरम्यान युगांतरच्या कलक्त्यामधील कार्यालयात गेले त्यावेळी त्यांना किंग्जफोर्ड बद्दल चा बेत समजला. याच वेळी त्यांची आणि प्रफुल्लकुमार चाकी यांची भेट झाली.

पुढचा बेत आखण्यासाठी सगळे क्रांतिकारी एकत्र जमलेल्या गुप्त बैठकीत किंग्जफोर्ड ला मारण्याची जबाबदारी कोण घेणार याचा निर्णय होणार होता. त्यासाठी सगळ्यांच्या नावाच्या चिठया टाकण्यात आल्या. यात पहिले नाव होते प्रफुल्लकुमार चाकीं आणि नरेंद्र गोस्वामी. पण अचानक नरेंद्र गोस्वामी ने हे काम करण्यास नकार दिला.त्यांच्या जागी मग खुदिराम बोस यांची निवड करण्यात आली. 23 एप्रिल 1908 रोजी दोघेही जण मुजफ्फरपूर ला येण्यासाठी निघाले.

किंग्जफोर्ड ला मारण्यासाठी बॉम्ब चा वापर होणार होता, पण भारतात बॉम्ब बनवण्याची कृती उपलब्ध नव्हती. यासाठी लंडनहून हेमचंद्र दास हे बॉम्ब बनवण्याची कृती घेऊन सेनापती बापट यांच्या सांगण्यावरून भारतात आले. सेनापती बापट यांनी एका रशियन मुलीच्या मदतीने मिळवलेली भाषांतर करून हि केउती मिळवली होती आणि या मागची प्रेरणा होती स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर. खुदिराम यांच्याजवळ असणारा बॉम्ब हा आता याच कृतीवरून बनवलेला होता.

24 एप्रिल रोजी खुदिराम आणि प्रफुल्लकुमार मुजफ्फरपूर येथे पोहचले.यानंतर किंग्जफोर्ड च्या संपूर्ण हालचालींची रेकी करण्यात आली. 30 एप्रिल रोजी दोघेही जण कामगिरीवर निघाले. थोड्याच वेळात ते किंग्जफोर्ड च्या बंगल्यासमोर येऊन उभे राहिले.रात्री साडेआठच्या वेळेस खुदिराम बॉम्ब घेऊन किंग्जफोर्ड च्या गाडीचे घोडे आणि समोरून येणाऱ्या गाडीचे घोडे यांच्यात साम्य दिसल्यावर त्या गाडीच्या दिशेने धावत सुटले. त्यांच्या पाठोपाठ प्रफुल्लकुमार हि निघाले.त्या वेळी अंधार असल्यामुळे गाडीच्या आतील बाजूस कोण आहे हे खुदिराम याना समजू शकले नाही. खुदिराम यांनी नेम धरून त्या गाडीवर तो बॉम्ब फेकला आणि स्फोट होऊन प्रचंड आवाज झाला. भारतातातील पहिला श्रीगणेशा मुजफ्फरपूर मध्ये झाला होता.पण स्फोट झालेल्या गाडीत किंग्जफोर्ड हा नव्हताच. यात स्त्रिया आणि दोन युरोपिअन जीव मारले गेले.

यानंतर खुदिराम बोस यांना अटक झाली त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. या खटल्या अंतर्गत 11 ऑगस्ट 1908 या दिवशी खुदिराम यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सकाळी 6 वाजता या दिवशी खुदिराम यांना फाशी देण्यात आली. आणि भारतमातेसाठी एक 19 वर्षाचा तरुण हसत हसत फासावर गेला.

संदर्भ – मृत्युंजयाचा आत्मयज्ञ – वि श्री जोशी

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: