थोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक
फेब्रुवारी 12, 2017 यावर आपले मत नोंदवा
आपल्या २० वर्षांच्या वादळी कारकिर्दीत थोरल्या बाजीराव साहेबांनी काही अचाट धैर्य केली. त्यातील एक होते थेट दिल्लीवर चढाई करणे. १७३७ साली सादतखानावर केलेली ही चढाई इतिहास प्रसिद्ध आहे. ह्या स्वारी बद्दल थेट राउंनीच अप्पांना पत्र लिहून कळवले होते. हे पत्र त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्वपूर्ण ठरावे असेच आहे. पत्रातील एक वाक्य तर कायम स्मरणात रहावे असे आहे, त्यावरून त्या काळातील राजकारणावर भरपूर प्रकाश पडतो – “दिल्ली महास्थळ, अमर्याद केल्यास राजकारणाचा दोर तुटतो”.
इतिहास प्रेमींच्या अभ्यासाकरिता सदर पत्र संपूर्ण उपलब्ध करत आहोत. पत्र जरा लांबलचक आहे परंतु अत्यंत महत्वाचे आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे मुद्दाम अधोरेखित केले आहेत. वाचकांनी हे पत्र जरुर वाचावे.

थोरल्या बाजीरावांचे चिमाजी अप्पांना पत्र