गुढीपाडवा इतिहासाच्या पानातून

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा मंगल दिवस. हा दिवस मोठ्या अभिमानाने साजरा करण्यासारखा एक सण. परंतु त्या सणाला जातीय चौकटीत अडकवून त्याचा संबंध थेट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूशी जोडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहेत. तशा स्वरूपाचे निराधार बिन बुडाचे whatsapp msg देखील फिरवले जातात. परंतु सुज्ञ अभ्यासकाला हे माहित आहे कि गुढ्यांचा उल्लेख हा शिवकालाच्या आधीपासून आहे. ज्यांना याबद्दल शंका आहेत त्यांचे शंकानिरसन करून शंकेचे मळभट दूर करण्यासाठी आमचा हा एक प्रयत्न.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!!

शिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती)

जनसेवा समिती विले पारले, यांच्या त्रिदशकपुर्ती वर्षानिमित्त दिनांक १८ व १९ मार्च २०१७ रोजी विले पारले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या पटांगणावर “शिवमहोत्सव २०१७” चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रायगडाची अप्रतिम अशी ३५० छायाचित्रे लावण्यात आली होती. चार 3d चित्रे लावण्यात आली होती, तसेच इतिहास क्षेत्रातल्या मान्यवर मंडळी श्री. उदय कुलकर्णी आणि जेष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. परंतु या कार्यक्रमांच्या बरोबरीनेच सर्वात महत्वाचे आकर्षण ठरले ते म्हणजे “रायगडाची प्रतिकृती” ही प्रतिकृती बनवणारे संजय तळेकर आणि त्यांची टीम, यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

 

 

अपरिचित इतिहास भाग ९ संताजी घोरपडे यांचा पराक्रम

१६८९ हा काल म्हणजे हिंदवी स्वराज्यासाठी अतिशय धामधुमीचा काळ ठरला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांस औरंगजेबाने कैद करून त्यांची अतिशय क्रूर पणे हत्या केली. या धर्मवीर छत्रपतींच्या बलिदानाने अवघा महाराष्ट्र पेटून उठला. त्या मराठी झंझावातात एक पराक्रमी सरदार संताजी घोरपडे अग्रस्थानी होते. थेट औरंगजेबाच्या छावणीवर छापा घालून सोन्याचे कळस काढून आणण्याचा भीम पराक्रम करून संताजी घोरपडे यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला. हा मागोवा आहे त्याच पराक्रमाचा.

खुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन

गज़िउद्दिनखान फिरोजजंग

गज़िउद्दिनखान फिरोजजंग

 

रामशेजच्या किल्ल्यावर चालून येणारा गाझीउद्दिन खान बहादूर हा मराठ्यांच्या इतिहासाला चांगलाच परिचित आहे. ह्यानेच दिल्लीला पूर्वी मदरसा सुरु केला होता. रामशेजला मराठ्यांकडून धोंडे खाऊन त्रस्त झालेला हा सरदार पुढे हैदराबाद, अथणी, बंगलोर, असा फिरत फिरत साताऱ्याला नामजद झाला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी त्याची छावणी होती. साताऱ्याचा किल्ला घेण्याकरता तो दिवसेंदिवस पुढे सरकत होता. ह्या दरम्यान एक घटना घडली जी तत्कालीन मुघल इतिहासकार ईश्वरदास नागर याने नमूद करून ठेवली आहे.

ईश्वरदास लिहितो –

एक दिवस गज़िउद्दिन आपल्या तंबू मध्ये पोशाख चढवून बसला होता. त्याच्या हातात आरसा होता. आपले सुंदर रुपडे तो न्याहाळत होता. त्याच्या आजू बाजूला त्याचे खुशमस्करे होते जे त्याची स्तुती करत होते. स्तुती करताना त्यातील एक जण अनावधानाने म्हणाला –

सरदार आपले सौंदर्य आणि आपला पराक्रम इतका उजवा आहे की आपणच खरे सिंहासनाची शोभा आहात. आपणच ते सजवायला हवे (त्यावर बसून). त्यावर खान फ़क़्त ईश्वरइच्छा असेल तर तसे होईल इतकेच हसत म्हणाला.

तिथे त्याची आई देखील होती. तिने सारवासाराव करण्यासाठी – सिंहासन केवळ तैमुर वंशासाठी आहे आणि आपण त्याचे सेवक आहोत तेव्हा असे विचार करू नये असे प्रगटपणे सांगितले.

तिथे उभे असलेल्या एका हरकाऱ्याने हे ऐकले आणि बादशह औरंगजेबाला कळवले. औरंगजेबाला राग आला होता पण तूर्त त्याने तो गिळला. काही महिने गेले. एके दिवशी गज़िउद्दिन आजारी पडला. त्याचे डोके भयंकर दुखत होते. त्याच्या ह्या डोकेदुखीची बातमी औरंगजेबाला समजली. औरंगजेबचा खास हकीम फात खान याला पाचारण करण्यात आले. बादशाहने त्याला निरोप दिला की –

आमच्यावतीने आपण जाऊन गज़िउद्दिनची ख्याली खुशाली विचारावी आणि त्याचा योग्य तो इलाज करावा. त्याचे रूप तसेच राहो याची काळजी घ्यावी.

हकीम जे समजायचे ते समजला आणि गज़िउद्दिनच्या छावणीत पोचला. ख्याली खुशाली विचारून त्याने गज़िउद्दिनला औषध दिले. औषधाने गुण काही येईना म्हणून गज़िउद्दिन पुन्हा हकीमाची मदत मागू लागला. अखेर हकीमाने आपला डाव साधला.

गज़िउद्दिनखान फिरोजजंग याची कबर

गज़िउद्दिनखान फिरोजजंग याची कबर

अत्यंत क्रूरतेने त्याने गज़िउद्दिनच्या कपाळातील सगळे रक्त शोषून काढले. हा एकाच आपल्या डोकेदुखीवर जालीम उपाय आहे असे सांगून त्याने आपले काम सुरु ठेवले. ह्या उद्योगात गज़िउद्दिनची दृष्टी गेली आणि तो कायमचा अंधळा झाला. त्याची तब्येत ढासळू लागली. हकीम त्वरेने तिथून निसटला आणि बादशाहकडे आला. झाला वृत्तांत त्याने औरंगजेबाला सांगितला. पुढे औरंगजेबाने हेर पाठवून बातमीची खात्री करवून घेतली. खात्री पटल्यावर त्याने शाहजादा आझम याला पाठवून गज़िउद्दिनची मुद्दाम विचारपूस करवली आणि त्याचा मुलगा चीन किलीज खान याची बापाच्या जागी नियुक्ती केली. पुढे अंधत्व आलेला गज़िउद्दिन रोगराईत मारला गेला.

औरंगजेब किती धूर्त आणि खुनशी होता हे असल्या अनेक बारीक सारीक उदाहरणातून इतिहासातून डोकावते.

%d bloggers like this: