शिवमहोत्सव २०१७ – असा घडला रायगड (प्रतिकृती)
मार्च 27, 2017 यावर आपले मत नोंदवा
जनसेवा समिती विले पारले, यांच्या त्रिदशकपुर्ती वर्षानिमित्त दिनांक १८ व १९ मार्च २०१७ रोजी विले पारले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या पटांगणावर “शिवमहोत्सव २०१७” चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रायगडाची अप्रतिम अशी ३५० छायाचित्रे लावण्यात आली होती. चार 3d चित्रे लावण्यात आली होती, तसेच इतिहास क्षेत्रातल्या मान्यवर मंडळी श्री. उदय कुलकर्णी आणि जेष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. परंतु या कार्यक्रमांच्या बरोबरीनेच सर्वात महत्वाचे आकर्षण ठरले ते म्हणजे “रायगडाची प्रतिकृती” ही प्रतिकृती बनवणारे संजय तळेकर आणि त्यांची टीम, यांचे मनःपूर्वक अभिनंदन.