अपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात?
जून 11, 2020 यावर आपले मत नोंदवा
छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात?
इतिहासाचा अभ्यास हा पत्रांवरून करावा. ही समकालीन पत्रे म्हणजे इतिहासाचा आरसा. पत्रावरून अभ्यास करताना बरीचशी अपरिचित माहिती समोर येते.
रोहीड खोऱ्याचे सर्जेराव जेधे यांना लिहिलेल्या या पत्रातून छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचा राजा किंवा जाणता राजा हे रूप प्रकर्षाने जाणवते. शत्रू मुळे आपली रयत धोक्यात आहे हे ओळखून महाराजांनी लिहिलेले हे पत्र आहे.
चला तर पाहू हे खूप महत्वाचं असं पत्र.