समरांगण – शंभूराजांच्या काळातील बुऱ्हाणपुर मोहीम | Raid on Burhanpur : 1681

१६८१ साली मराठ्यांनी बुऱ्हाणपुरावर चाल करून मुघलांना चांगलाच हात दाखवला होता. मुघलांची शान असलेले बुऱ्हाणपुरसारखे शहर लुटून मराठ्यांनी त्यांना जणू आव्हान दिले होते.

राणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथी

मराठेशाहीचे स्वामिनिष्ठ शूरसेनानी राणोजी शिंदे यांची आज पुण्यतिथि. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र जयाजी शिंदे ह्यांनी स्मारक उभी करण्याची आज्ञा दिली त्या पत्रात कोटा इथून उत्तम कारागीर मागविण्यात आले होते. विनम्र अभिवादन.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा?

नमस्कार अभ्यासक मंडळी, 
आपल्यापैकी अनेक जण सार्वजनिक किंवा पर्सनल चॅट द्वारे शिवचरित्राच्या अभ्यासा करिता मार्गदर्शन हवे असे विचारता. अनेकदा आम्ही शक्य ते मार्गदर्शन करतो. साधन, संदर्भ, पुस्तकांची नावे सुचवतो आणि लागेल ती मदतही करतो. परंतु हे सर्व साचे बद्ध नसते. इतिहास अभ्यासाचा एक मुळ साचा आहे. त्यात प्रवेश करून अभ्यास सुरू करावा लागतो. आपल्याला शिवचरित्र अभ्यासाची सुरुवात करता यावी या करता आम्ही ६ वर्गांची कार्यशाळा आयोजित करत आहोत.

YouTube.com/MarathaHistory
प्रस्तुत
कार्यशाळा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा?

विषय –

  • कार्यशाळेची पार्श्वभूमी आणि विषय परिचय – ७ ऑगस्ट २०२१
  • शिवकालाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त साधने – ८ ऑगस्ट २०२१
  • शिवकालीन कालगणना आणि पत्र वाचन – १४ ऑगस्ट २०२१
  • शिवकालीन गाव गाडा, प्रशासन आणि व्यवस्थापन – १५ ऑगस्ट २०२१
  • Case Studies – ऐतिहासिक प्रसंग आणि संदर्भ साधनातून दिसणारा इतिहास – २१ ऑगस्ट २०२१
  • शिवकाळाचे अंतरंग – २२ ऑगस्ट २०२१

सहभाग – मंदार लवाटे, शिवराम कार्लेकर, राम वाघोले, ॐकार चावरे, उमेश जोशी, विशाल खुळे, योगेश गायकर, प्रणव महाजन आणि आपण सर्व

प्रत्येक सेशन ४५ मिनिटांचे.  सर्व सेशन संध्याकाळी ८ वाजता होतील.
कार्यशाळा फी – रु. ३००/- मात्र.

रजिस्ट्रेशन फॉर्म – https://forms.gle/japHLWFLyb5kV8Qp9

तलवार : अपरिचित इतिहास : भाग ४२ | Maratha Swords

विजयोन्मुख राष्ट्रांचा उदय होतो तो तलवारींच्या खणखणाटात. मराठा राज्यही त्याला अपवाद नाही. आज जरी तंत्रज्ञानाची कास धरून शस्त्र निर्मिती खुप पुढारली असली तरी आजही देशाचे सैनिकी संचलन होते तेव्हा दलाचा नेता हा तलवार धरूनच सलामी देतो. आज आपण जाणून घेऊया ह्याच तलवारीच्या इतिहासा विषयी.

%d bloggers like this: