छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा?
जुलै 7, 2021 यावर आपले मत नोंदवा

नमस्कार अभ्यासक मंडळी,
आपल्यापैकी अनेक जण सार्वजनिक किंवा पर्सनल चॅट द्वारे शिवचरित्राच्या अभ्यासा करिता मार्गदर्शन हवे असे विचारता. अनेकदा आम्ही शक्य ते मार्गदर्शन करतो. साधन, संदर्भ, पुस्तकांची नावे सुचवतो आणि लागेल ती मदतही करतो. परंतु हे सर्व साचे बद्ध नसते. इतिहास अभ्यासाचा एक मुळ साचा आहे. त्यात प्रवेश करून अभ्यास सुरू करावा लागतो. आपल्याला शिवचरित्र अभ्यासाची सुरुवात करता यावी या करता आम्ही ६ वर्गांची कार्यशाळा आयोजित करत आहोत.
YouTube.com/MarathaHistory
प्रस्तुत
कार्यशाळा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा अभ्यास कसा सुरू करावा?
विषय –
- कार्यशाळेची पार्श्वभूमी आणि विषय परिचय – ७ ऑगस्ट २०२१
- शिवकालाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त साधने – ८ ऑगस्ट २०२१
- शिवकालीन कालगणना आणि पत्र वाचन – १४ ऑगस्ट २०२१
- शिवकालीन गाव गाडा, प्रशासन आणि व्यवस्थापन – १५ ऑगस्ट २०२१
- Case Studies – ऐतिहासिक प्रसंग आणि संदर्भ साधनातून दिसणारा इतिहास – २१ ऑगस्ट २०२१
- शिवकाळाचे अंतरंग – २२ ऑगस्ट २०२१
सहभाग – मंदार लवाटे, शिवराम कार्लेकर, राम वाघोले, ॐकार चावरे, उमेश जोशी, विशाल खुळे, योगेश गायकर, प्रणव महाजन आणि आपण सर्व
प्रत्येक सेशन ४५ मिनिटांचे. सर्व सेशन संध्याकाळी ८ वाजता होतील.
कार्यशाळा फी – रु. ३००/- मात्र.
रजिस्ट्रेशन फॉर्म – https://forms.gle/japHLWFLyb5kV8Qp9