▓ ब्लॉगच्या निमित्ताने थोडं आमच्याविषयी ▓
मला नक्की तारीख वार आठवत नाही, कि या मैत्रीला कधी सुरवात झाली. पण आम्ही मात्र मानतो ही मैत्री अंदाजे ३५०/३६० वर्ष जुनी असली पाहिजे म्हणजे अगदी शिवकालापासून…
प्रणव, विशाल आणि मी Orkut वर भेटलो काय, आमची मैत्री झाली काय, अगदी स्वप्नात किंवा एखाद्या चित्रपटात घडत ना अगदी तसच घडत गेलं. मला अजूनही आठवत मी आणि प्रणव एकमेकांना जेव्हा पहिल्यांदा इंटरनेट वर भेटलो तेव्हा एकमेकांना “अहो, जाहो !!” करत होतो. एकाच वयाचे आहोत असा समजल्यावर “अरे तुरे” वर आलो खरे पण त्यालाही १५ दिवस गेले. प्रणव आणि मी पुण्यात प्रथम भेटलो त्याला आता १०/१२ वर्ष झाली असतील सहज. पहिल्यांदा भेटलो तेव्हा विशालची भेट झाली नाही, पण माझ्या नंतरच्या पुणे भेटीच्यावेळी विशाल भेटला आणि ते सुद्धा चक्क “भारत इतिहास संशोधक मंडळाच्या” इमारतीजवळच ! गमतीचा भाग म्हणजे प्रणव आणि विशाल यांची देखील पहिली भेट ही भारत इतिहास संशोधक मंडळाच्या निमित्तानेच झाली हे मलाही नंतर समजले. ते दोघे तिथे माणकोजी दहातोंडे यांच्या शिक्षेसंबंधी इतकी चर्चा (!) करण्यात मग्न होते की त्यांची ती चर्चा पाहून त्यांना शांत करण्याकरिता ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगराव बलकवडे यांना धाव घ्यावी लागली. असो.

बोराट्याची नाळ
मग जवळच ज्यूस\कॉफी घेत बसलो, खूप गप्पा मारल्या, बराच वेळ गेला, अहो जाणारच…. ३५०/३६० वर्षांनी भेट होत होती. थट्टेचा भाग बाजूला पण मी, प्रणव आणि विशाल आमचं नेहमीच एकमत असायचं, आम्ही नक्कीच शिवाकालापासुनचे, पेशवेकालापासूनचे मित्र असणार, कदाचित महाराजांच्याच चाकरीत असू एकत्र. भालदार चोपदार आरोळ्या ठोकणारे ! संभाजी महाराजांचे सैनिक असू, किंवा बाजीराव पेशव्यांच्या झंझावाती फौजांमध्ये त्यांच्या सेवेत घोड दौड करणारे शिलेदार, बारगीर… किंवा गुप्त मसलतीतले हेर ही असु कदाचित… या नव्या (जुन्या) मित्रांना भेटून खूप बर वाटले.
आम्ही एकत्र जमलो की खूप कमी वेळा इतिहासाव्यतिरिक्त गप्पा होत असतं. किंबहुना नाहीच, आम्ही भेटलो की गड, किल्ले, ऐतिहासिक पुस्तक, चांगले संदर्भ ग्रंथ यावरच चर्चा होत असे. कितीही वेळ मिळाला तरी वेळ कमीच पडत असे. त्यावेळी प्रणव, विशाल पुण्यात चांगल्या ठिकाणी नोकरी करत होते. पुढे २०१२ मध्ये कामातल्या प्राविण्यामुळे प्रणवला अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. माझा स्वतःचा व्यवसाय. तिघांच्याही कामाचा पसारा पाहता आपली हातातली काम टाकून इतिहासाच्या मागे पळायच नाही किंवा तसा आग्रह देखील नाही करायचा… असा आमच्यात एक अलिखित करार झाला होता म्हणा ना… हो पण वेळ असेल तेव्हा मात्र आम्ही तासंतास या गुढ इतिहासाला बोलक करण्यात रमलेलो असतो.

रायगडावर उमेश
शिवराज्याभिषेक दिनाला रायगडावर काही वर्ष गेलो पण नंतर २००८ सालचा राज्याभिषेक जरा वेगळ्याप्रकारे प्रणवच्या घरी साजरा केला. म्हणजे अगदी एखाद्या अज्ञात शक्तीने घडवून आणावा असा तो प्रसंग होता, म्हणजे अगदी सकाळी ११ पर्यंत काहीच ठरलं नव्हत, मी पण मुंबई मधेच होतो. अचानक ठरलं, आणि मी माझे दोन मित्र राहुल पेठे, प्रियांक आम्ही पुण्याला गेलो, तिकडे विशाल प्रणव यांनी उत्तम व्यवस्था केली. विशाल आणि माझ्या भावाने महाराजांची एक मूर्ती आणली. मग यथासांग पूजा केली, माझ्याकडील शिवराई, प्रणव कडील राजगडावरील छानसे दोन दगड, महाराजांची मूर्ती याला पंचामृताचा अभिषेक घालून पूजा केली. सगळे मिळून १०/१२ जण होतो. महाराजांची सावरकरांनी लिहिलेली आरती म्हटली. मग महाराजांचे घोडदळ, आरमार, हेरखाते, असे लेख वाचन झाल, चर्चा केली. कार्यक्रम आटपून आम्ही रात्री १२ च्या आत मुंबई मध्ये पोचलो होतो. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. न ठरवता, अचानक आमच्या हातून झालेली महाराजांची सेवा म्हणजे एक अद्वितीय अनुभव होता. इथून आमची मैत्री जी अभेद्य झाली ती आजवर. पुढे २००९ साली पुण्यात राज्याभिषेक उत्सव थोडा मोठ्या प्रमाणावर अथश्री मध्ये भूषण, राहुल, स्नेहा, सुधीर या मित्रांच्या सहकार्याने झोकात पार पडला.

सिंहगडावर विशाल.
आम्ही एकत्र खूप भटकंती देखील केली, सिंहगड, कान्होजी जेधे देशमुखांची कारी, वढू, तुळापूर, रायगड, राजगड, लोहगड,रावेरखेडी येथील बाजीरावांची समाधी, पावनखिंड, समुद्री किल्ले तर किती सिंधूदुर्ग, विजयदुर्ग, हिम्मतगड अशा अनेक ठिकाणी भटकलो.
पहिल्यापासून जेष्ठ इतिहास तज्ञ डॉ. सदाशिव शिवदे, आणि श्री.निनाद बेडेकर यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले, दुर्मिळ पुस्तक, तसेच संदर्भ ग्रंथ यांनी आम्हला अभ्यासाकरिता वेळोवेळी दिले, त्यामुळे अशा जेष्ठ मार्गदर्शकांच्या सावलीत आमचा अभ्यास सुरु झाला आणि सुरु आहे.
इथे सांगावीशी एक आठवण म्हणजे पुण्यात एकदा रात्री ११ वाजता पाऊस पडत होता, वीज गेली होती, मिट्ट अंधार होता, अशा पावसाळी अंधाऱ्या रात्री मुंबई-सातारा महामार्गावर, मी आणि विशाल प्रवास करत होतो, काहीतरी चर्चा करायला प्रणवच्या घरी जात होतो. पाऊस पडत होता, थांबायचा नाव नव्हत, विशाल जपून दुचाकी चालवत होता, इतिहासाच्या वेडाने झपाटल्यासारखे आम्ही दोघे प्रणव कडे निघालो होतो, हा अनुभव खरच शब्दात सांगण कठीण आहे. कोण कुठला उमेश, कोण कुठला विशाल, केवळ एक मुद्दा आठवला, कुठलासा पुरावा गावला, तर त्याची चर्चा करायला (आमच्याजवळ मोबाईल फोन असूनही) वेड लागल्यासारखे प्रणव कडे निघालो होतो.
आम्ही तिघ वेगवेगळ्या मतांचे, वेगवेगळ्या आवडी-निवडी असूनही या इतिहासाच्या अभ्यासामुळे एकत्र घट्ट बांधले गेलो आहोत. वाद आमच्यातही होतात, पण आमचा एका गोष्टीवर विश्वास आहे ते म्हणजे मैत्री जितकी घट्ट,तितकिच ती समंजस हवी. वाद वगैरे होतीलच पण ते तिथेच सोडून देता आले पाहिजेत. त्यामुळे अभेद्य बुरुजासारखी आमची मैत्री उभी आहे.
प्रणव ने ब्लॉग लिहिण्यास सुरवात करू अशी कल्पना सुचवली, मी आणि विशाल ने ती उचलून धरली आणि कामाला लागलो.

रायगडावर प्रणव.
ब्लॉग च्या निमित्ताने लेख माला लिहिण्यास सुरवात केली आहे, शिवकाल, शंभुकाळ, पेशवेकाल, असे आणि इतर विभाग बनवून त्यावर अभ्यास पूर्ण लेख लिहिण्यास सुरवात केली आहे. या लेखांतून इतिहासाबद्दल जास्तीत जास्त व अप्रकाशित नवीन माहिती मिळवून काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा प्रामाणिक हेतू/प्रयत्न आहे. ज्ञान वाटल्याने वाढते अस म्हणतात, त्याचा अनुभव घेत होतो.
पुढे या प्रवासात पुढे आणखी काही सहप्रवासी येऊन मिळाले. कौस्तुभ कस्तुरे, रोहित पवार, योगेश गायकर आणि शिवराम कार्लेकर. खऱ्या अर्थी परिपूर्ण झाल्याचा अनुभव आला. सगळेच सगळ्याच क्षेत्रात जाणकार नसतात एकीची ताकत काय असते याचा अनुभव आला. २०११ मध्ये सुरु केलेल्या माझ्या प्रकाशन संस्थे तर्फे आमच्या ब्लॉगचं आणि आम्हाला या प्रवासात येऊन मिळालेल्या मित्रांच्या लेखांचं “इतिहासाच्या पाऊलखुणा” नावाचं पुस्तक केलं. आणि कौस्तुभचं “पेशवाई” हे पुस्तक प्रकाशित केलं. १६७४ पासून १८१८ पर्यंतचा सर्व कालखंड यात अंतर्भूत केला गेला आहे. वाचकांनी अभ्यासकांनी जाणकारांनी भरपूर कौतुक केलं. दोन्ही पुस्तकांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
वर नावं घेतलेल्या सर्वांचं वर्णन करायचं म्हणजे एक एक स्वतंत्र लेख होईल म्हणून इतकंच सांगतो कि सगळे अभ्यासू उत्तम वाचक आणि पुराव्यांअभावी एक ओळही लिहिणार नाहीत असेच होते. त्यामुळे आमचं गणित जमलं. आता आम्ही सर्वजण एकत्र अभ्यास करतो. चर्चा करतो. प्रसंगी मत मतांतरं येतात तेव्हा वादही घालतो. पण मी म्हणतो तेच खरं असा हट्ट कधीच कोणाचा नसतो. त्यामुळे वाद मागे सोडून पुढील प्रवास सुरु करतो. ही तर सुरवात आहे. अजून बरंच काम करावयाचे आहे. त्यासाठी जाणकार वाचक मार्गदर्शक यांचे आशीर्वाद हवेच आहेत.
दुःखाची एकच आठवण म्हणजे आमचे गुरु जेष्ठ इतिहास संशोधक श्री. निनादराव बेडेकर अर्थात आमचे लाडके निनाद काका १० मे २०१५ रोजी आम्हाला सोडून देवाघरी गेले. आम्ही अक्षरशः पोरके झालो. आमचा दीपस्तंभ हरवला. काकांजवळ घालवलेला एक एक क्षण आम्ही टीपकागद बनून त्यांनी दिलेलं ज्ञान टिपण्यात घालवला आहे. ते क्षण कधीही न विसरण्यासारखे. तरीही न डगमगता काकांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहण्याची शपथ घेऊन आम्ही मार्गस्थ झालो. प्रत्येक्षणी काका आम्हाला पाहत आहेत याची खात्री आहे. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी म्हणून काकांची मान सदैव अभिमानाने ताठ राहील याची नक्कीच काळजी घेऊ.
मी उमेश आम्हा तिघांच्या वतीने तुम्हा वाचकांच ब्लॉग वर स्वागत करतो. लेखांतून काही चुका अढळल्यास पुराव्यानिशी जरूर कळवा त्या वेळोवेळी सूचनांप्रमाणे तपासणी करून, दुरुस्त केल्या जातील.
आपले विनीत
उमेश, प्रणव, विशाल
तुम्हा तिघांचे खुप खुप धन्यवाद उत्तम ब्लॉग आहे. निःपक्षपाती आणि ससंदर्भ लेखन. हे शिवकार्य असेच अखंड आपल्या हातून होत राहावे ही मनापासून इच्छा.
LikeLike
धन्यवाद राजेंद्रजी ! असेच भेट देत जा. लोभ असावा.
LikeLike
Hi friends,
mankoji dahatonde ani bahirji naik hya lokan baddal kahi vistarpurvak mahiti vachanasathi uplabdh hoil ka??? Plese hovu shaklyas share kara vachnyas aanand hoil……… 🙂
LikeLike
माणकोजी दहातोंडे यांच्या विषयी थोडक्यात माहिती आमच्या सरनौबत या लेखात दिली आहे. बहिर्जी नाईक या नावाच्या एका पेक्षा अधिक व्यक्ती असाव्यात असे अभ्यासाअंती वाटते. जासूद बहिर्जी नाईक ह्यांचे आडनाव बहुदा जाधव असावे असे काही उल्लेख मिळतात व ते जिजाऊसाहेबांच्या माहेरून म्हणजे सिंदखेडहून आले होते अशीही एक उत्तर कालीन नोंद आहे. सुरत प्रकरणात त्यांनी महत्वाची हेरगिरी करून मूल्यवान माहिती महाराजांना पुरविली इतकीच माहिती काय ती उपलब्ध आहे. बहिर्जी नाईक इंगळे नामक एक पन्हाळ्याचे किल्लेदारही होते जे शंभूकाळात पन्हाळ्याचे किल्लेदार होते तसेच त्यांचेही काही राज्यकारभारातले तुरळक उल्लेख मिळतात. बहिर्जी नाईक घोरपडे म्हणूनही एक राजाराम काळात सरदार होते जे पुढे भूपाळगडावर मारले गेले अशी एक कथा आहे ज्याला समकालीन पुरावा सापडत नाही. इतरही एक-दोन बहिर्जी नाईक आहेत. नेमका काल किंवा घटना अभ्यासत असल्यास शोध घेता येईल. भेट दिल्याबद्दल धन्यवाद गणेशजी 🙂
LikeLike
प्रतिकिया दिल्या बद्दल खूप खूप आभार… तुमचा संपूर्ण ब्लोग मी वाचला आहे. अत्यंत छान असे वाचण्यास मिळाले म्हणून तुमचे परत एकदा आभार. तुमच्याकडे विनंती होती कि मी मला माणकोजी दहातोंडे यांना देण्यात आलेल्या शिक्षेबद्दल माहित करून घ्यायचे आहे तर त्याबद्दल तुमच्याकडे काही माहिती असल्यास पोस्ट करावी… आपला मित्र आणि शुभेच्छुक गणेश गोरुले…
LikeLike
नमस्कार गणेशजी
आपल्याला आमचा ब्लॉग वाचून आनंद जाहला हे वाचून बरे वाटले…..
धन्यवाद….
LikeLike
गणेशजी, आपण वा.सी. बेंद्रे प्रकाशित महाराष्ट्रेतिहासाची साधने – भाग २. लेखांक क्रमांक ४२० पहा. आपल्याला हवे असलेले उत्तर मिळेल. 🙂 धन्यवाद.
LikeLike
मी इतिहासाची साधने या फेसबुक ग्रुपवरील सदस्य आहे ..
वेळोवेळी तुमच्या पोस्ट मी वाचतो ..
त्यातुनच तुमचा ब्लाॅग वाचायला मिळाला ..
इतिहासाची अजुन माहिती संदर्भासहित मिळाल्यामुळे आनंद होत असुन माहितीचा साठा वाढत आहे ..
तसेच पुरावे असल्यामुळे अभ्यासु वृत्ती जागृत होण्यास मदत होत आहे..
LikeLike
नमस्कार अक्षय जी
आमचा ब्लॉग वाचून आपल्या इतिहासाच्या ससंदर्भ माहितीचा तुमचा साठा वाढत आहे आणि अभ्यासू वृत्ती जागृत होण्यास मदत होत आहे हे वाचून अत्यानंद जाहला. कारण अशी अभ्यासू वृत्ती असलेले वाचक/अभ्यासक यांची संख्या फार कमी होत चालली आहे (दुर्दैवाने). कोणताही संदर्भ नसताना, काहीही अभ्यास नसताना,मोडी येत नसताना….मनाला वाटेल तसा जातीद्वेष पेरणारा… काय वाटेल तो चुकीचा इतिहास पसरवला जात आहे आणि तरुण पिढी त्याला बळी पडताना दिसत आहे. हे चित्र उद्विग्न करणारं आहे. असो. आमच्या ब्लॉग मुळे आपल्या ज्ञानात भर पडत आहे हे ऐकून बर वाटल..
मनःपूर्वक धन्यवाद….
LikeLike
नमस्कार तुमच्याविषयी माहिती थोडी उशिरा वाचली त्या बद्दल खरच खंत आहे. पण महाराजांचा इतिहास वाचताना आपण सगळे तहान भूक विसरता तसा मी पण सगळ विसरून जातो स्वताला विसरण्यात पण एक मोठी गंमत असते आणि अश्या विषयवार जर स्वताला कोण विसरत असेल तर या वेळी त्याने मनाने महारजांच्या जवळ जायचा प्रयत्न नक्की करावा जीवाला आनंद प्राप्त होतो. असो तुमचे वाचन आणि लिखाण अप्रतिम आहे या बद्दल तिळमात्र शंका नाही आपण इतिहास लिहू शकतो हे कदाचित शक्य नाही पण आपण इतिहासातील सत्य गोष्टी लोकांसमोर आणू शकतो या पेक्षा काय ते भाग्य… जे तुम्हाला लाभले आणि ही सारी कदाचित श्रींची इच्छा असावी तुमच्या सारख्या त्या अनेक मावळ्यांना आणि तुम्हालाही जाहीर कुर्निसात आमचा …. जय शिवराय , जय भवानी ..
LikeLike
वारंग साहेब…..
आपली post वाचून आनंद झाला…..कुर्निसात कशाला…..आम्हाला कौतुकाची थाप पुरेशी असते…… ती तुमच्या कडून आम्हाला मिळाली…..आमचा सन्मान झाला….असं मी समजतो…..
आम्हा तिघांकडून तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद……..
LikeLike
hello
i have just discovered your blog. and i am very happy that i did so. i also love Maratha history. the info. that you are giving is priceless. i have some questions, but i will be putting them to you by and by. at present i intend to go through all your blogs. thank you.
regards and all the success to all your plans.
LikeLike
नमस्कार अरुणा जी
आपल्या शुभेच्छांबद्दल आणि blog ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
आपले जे काही प्रश्न शंका असतील त्या नक्की विचारा. आम्ही अभ्यास करून त्यांना साधार उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न निश्चितच करू.
उमेश विशाल प्रणव.
LikeLike
श्री उमेश, प्रणव व विशाल,
सस्नेह शिवस्मरण. मदारी मेहतरविषयीच्या लेखामुळे ब्लॉगपर्यन्त पोचलो. तिघांचे परिश्रम, त्यामागची भावना आणि लिखाण सगळं काही खूप कौतुकास्पद आहे.
शिवरायांच्या चरित्राबद्दल मदारी मेहतरप्रमाणेच आणखी अनेक सर्वस्वी काल्पनिक गोष्टी ’इतिहास’ म्हणून सांगितल्या जाताना पाहिल्या आहेत. योगायोगाने आत्ताच चार दिवसांपूर्वी पुण्याच्या श्री राजेन्द्र जोग यांची फेसबुकवरची पोस्ट वाचली. (हे जोग म्हणजे रायगड रोपवेच्या कंपनीचे मालक !!) पुण्यातील प्रसिद्ध इतिहासतज्ञ श्री गजाभाऊ मेहेंदळे यांच्याकडून त्यांनी अशा अनेक किंवदंतींबद्दल स्पष्टीकरण विचारलं असता श्री मेहेंदळे यांनी दिलेली सविस्तर उत्तरे त्या पोस्टमध्ये आहेत. त्यात ते लिहितात… Today I came across a WhatsApp message stating that Shivaji Maharaj was not in oppose to Musalman. Though I appreciate the efforts of the writer to bring in harmony between two religions, I do not accept the methodology of falsifying the history to achieve so. I had requested very renowned historian on Shivaji Mr. Gajanan Bhaskar Mehendale to enlighten us on the misconceptions being spread by using the public media. Please find below his explanation (in English) under each statements (in Marathi) which is being spread. त्याखाली त्यांनी श्री मेहेंदळे यांनी दिलेली उत्तरे लिहिली आहेत…..
लिंक देत आहे….. https://www.facebook.com/rajendra.jog/posts/10201785401307661
आपण अधिक माहितीसाठी श्री राजेन्द्र जोग व त्यांच्यामार्फत श्री गजाभाऊ मेहेंदळे यांना भेटून सविस्तर चर्चा करू शकता.
शेष भगवत्कृपा.
शुभैषी,
स्वामीजी
आपल्या माहितीकरिता लिंक देत आहे…..
LikeLike
नमस्कार स्वामीजी…..
ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
LikeLike
तुमचे लेख फार सुंदर आणि अप्रतिम आहेत, आम्हाला माहित आहे तुम्ही हे सगळं आपला प्रपंच सांभाळून करीत आहात आणि म्हणूनच पुढील लेखांसाठी आमच्यासारख्या वाचकांना वाट पहावी लागणार आहे,तरीही लवकरात लवकर आम्हाला अजून लेख वाचायला मिळतील अशी अशा करतो, याला आमचा स्वार्थ किंवा हव्यासहि म्हणू शकता पण याला कारणीभूत म्हणजे तुमचे हे सुंदर लेखनच आणि तुमचा कौतुकास्पद प्रकल्प आहे.
आई भवानी तुम्हाला उदंड यश आणि बळ देवो !!!
LikeLike
खुपच आभ्यासपुर्ण माहीती…keep it up…अभिनंदन
LikeLike
मनःपूर्वक धन्यवाद प्रमोदजी.
LikeLike
Very Good Mitrano………
LikeLike
Thanks A lot Pramodji….
LikeLike
blog vachun khupach chhn vatle .Trimurtiche aabhar.
vandniy chatrapati sambhaji raje yancha janma 14/05/1657 kille purandar yethe zala .aani mala khup abhiman vatat aahe ki asha dharmveer shurveer mazya mahan rajacha aani maza janm divas ekach aahe maza janm 14/05/1983 aahe aani mi aavrjun vadhu budruk yethe bhet dili aahe.mala sarv ghtana vachlyavar khup vait vatle.
karan samaj ha itaka khlchya tharala jau shakto ki kon aapla aani kon parka hyatle antar visarto aani satta aani satta hach ek agenda ka mukya hetu manala jato.
aso sarvana ekach sagu ichito ki je kahi aaj maharastrat aani sampurn deshatun jya padhatine marathyachya itihas lapawala jat aahe te khupach chintajank aahe.
aapan sarvani milun rajyncha itihas aaplya yenarya pidya an pidyanpryant pohachwaycha vasa uchalnar tevhach khrya arthne chatrpatina aapla manacha mujra tharel.
Kahi muslim sanghtana majhya rajyanchya pratimechahi virodh kart aahet aaplyach mahrashrtatlya shikshanatun hi itihasacha vipryas kela jat aahe he bhavishyat khup vait vadale nimar honyache sanket aahet . Dhanywad………
LikeLike
नमस्कार सतीश वाघ जी.
सर्वप्रथम एक सांगू इच्छितो कि तुम्ही खरच भाग्यवान आहात. तुमचा जन्म दिवस आणि छत्रपती शंभू राजे यांचा जन्म दिवस एकाच दिवशी असतो. ही तुमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे.
आणखी एक सांगू इच्छितो वाघ साहेब…. तुम्ही संपूर्ण देशाबद्दल बोलत आहात कि संपूर्ण देशात आपला मराठी फौजांचा गौरवशाली इतिहास लपवण्याचा प्रयत्न होत आहे परंतु आपणास हे जाणून धक्का बसेल कि संपूर्ण देशात तर सोडाच…….. पण ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातही आपला इतिहास लपवण्याचा किंबहुना त्याचं विद्रुपीकरण करून लोकांसमोर मांडण्याचा घाट काही जातीयवादी लोक घालत आहेत. ठराविक जातीला Target करून त्यांच्या बद्दल विकृत लिखाण करून इतिहासातून काही ठराविक जातीच्या लोकांचे कर्तृत्व दुय्यम ठरवून त्यांना इतिहासातून काढून टाकून एक वेगळाच, भलताच इतिहास लोकांसमोर मांडायचा डाव ही मंडळी खेळत आहेत. त्याला अनेक लोक बळी पडत आहेत. त्यांचा गैरसमज होत आहे. चुकीचा इतिहासच खरा आहे… असं त्या सामान्य लोकांना वाटत आहे…… अशा घातकी पातकी संघटनांपासून समाज मुक्त होईल तो छत्रपती शिवाजी राजांचा खरा गौरव असेल. शाळेच्या पाठ्यपुस्तकातून असलेला गाळीव इतिहास हे ह्या विकृतीकारणाच मूर्तिमंत उदाहरण आहे.
आम्ही आमच्या परीने समाज जागृतीचा प्रयत्न करीत आहोत. आपल्यासारख्या सुजाण तसेच सच्च्या इतिहास प्रेमींची आम्हास साथही लाभत आहे.
बहुत काय लिहिणे…..
blog ला भेट दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आपले
उमेश विशाल प्रणव.
LikeLike
मित्रांनो, सर्वप्रथम या चांगल्या कामासाठी खूप सार्या शुभेच्छा आणि अशी अनमोल माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार.
एक विनंती आहे मी मराठवाड्यातील माजलगाव येथील रहिवाशी असून बीड जिल्ह्यातील धारूर येथे असणार्या किल्याबाबत शंभूराज्यांशी संबंधित कथा ऐकिवात आहेत परंतू योग्य साधनां अभावी हे कुतूहल अद्याप गूढ आहे पण मराठवाडा स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत निझाम राज्यात होता तेंव्हा हिंदवी स्वराज्य आणि मराठवाडा या बाबत संदर्भ आणि माहिती देणारा एखादा सविस्तर लेख लिहू शकाल तर खूप बरे होईल.
तेव्हडेच राझाकारांविरोधात लढणाऱ्या माझ्या आजोबांच्या इतिहासाला (जो कालच्या ओघात आणि अनवधानाने पुरावारहित झाला आहे ) जोड मिळेल आणि स्वराज्यात नसल्याचे शल्य कमी होईल.
LikeLike
sundar lekhan ani satya janunghenyachi utkantha diste.
mi dekhil maghya gharanyacha etihas shodhat ahe (Dhumal-Deshmukh) tarf velwand -khore maval.kahi mahiti asalyas jarur sanga.
LikeLike
नमस्कार हेमंतजी.
आम्हास आपल्या घराण्याची माहिती इतिहास पाहण्यात अथवा वाचनात आला तर नक्की कळवू.
परंतु आपल्या घराण्याचा इतिहास योग्य मार्गांनी योग्य साधनांचा वापर करून आपण शोधावा या साठी आई भवानी आपणास बळ देवो आणि आपल्या प्रयत्नांना यश देवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना.
स्वतःच्या घराण्याचा इतिहास अस्सल मोडी कागद/रुमाल संदर्भ ग्रंथ स्वतः वाचून तपासून शोधण्यात एक वेगळाच आनंद आहे. तुम्ही तो आनंद घ्या. आम्हासही आपल्या घराण्याचा इतिहास जाणून घेण्यास आवडेल तेही साक्षात तुमच्या कडून. वाट पाहत आहोत.
धन्यवाद.
LikeLike
hello pranav dada
Great work ……BEST OF LUCK….
LikeLike
Thanks Mahesh, Keep Visiting Our Blog. All the best for your studies.
LikeLike
Blog Mahitipurna aani Vishwas Thevava Aasa Aahe.
Rajaram maharaj Rajakal aani Thorale Bajirao ya madhalya Varshat konach Smrajya Hot. kahi kalu shakel ?
LikeLike
नमस्कार शांताराम जी blog ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
Rajaram maharaj Rajakal aani Thorale Bajirao ya madhalya Varshat konach Smrajya Hot. kahi kalu shakel ?
उत्तर:- राजाराम महाराज हे छत्रपती होते. पण थोरले बाजीराव हे छत्रपती शाहू महाराज (धर्मवीर छत्रपती संभाजी राजीयांचे पुत्र) यांचे पेशवे अर्थात पंतप्रधान होते.
राजाराम महाराज २० मार्च १७०० साली वारले.याच वर्षी थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म आहे. १८ ऑगस्ट १७००. थोरले बाजीराव पेशवे १७२० साली पेशवे झाले.
राजाराम महाराज यांचा कार्यकाळ १६८९ (संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर चा काळ) ते १७०० असा होता. या कालखंडात राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार तामिळनाडू येथील जिंजी येथून चालविला.
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्युनंतर पुढील ७ वर्षे म्हणजे १७०० ते १७०७ ताराराणी साहेब यांनी सूत्रे हातात घेतली आणि मराठी राज्य शर्थीने चालवले.
त्यानंतर १७०७ साली शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आले. ते आपल्या मुलखात आल्यानंतर त्यांच्यात आणि ताराराणी साहेब यांच्यात वारसा हक्काचा कलह निर्माण झाला. पुढे यांच्यात लढाई होऊन वारणेचा तह झाला. यात स्वराज्य दोन भागात विभागले गेले.
त्यांनंतर संभाजी पुत्र शाहू दिनांक १२ जानेवारी १७०८ रोजी छत्रपती झाले. त्यापुढे १७ नोव्हेंबर १७१३ रोजी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. आणि त्यांनी येसूबाई यांची मुघलांच्या कैदेतून सुटका करून आणली. यसुबाई मोघलांच्या कैदेत २९ वर्ष ८ महिने आणि १९ दिवस होत्या.
थोरले बाजीराव जेव्हा पेशवे झाले तेव्हा त्यांचे छत्रपती शाहू महाराजच होते.
खालील प्रमाणे मराठी साम्राज्याचे छत्रपती झाले.
१६७४ ते १६८० छत्रपती शिवाजी महाराज
१६८१ ते १६८९ छत्रपती संभाजी महाराज
१६८९ ते १७०० राजाराम महाराज
१७०० ते १७०७ ताराराणी साहेब
१७०८ ते १७५० छत्रपती शाहू महाराज. ( पंतप्रधान अर्थात पेशवे म्हणून १७१३ ते १७२० बाळाजी विश्वनाथ भट पेशवे. १७२० ते १७४० थोरले बाजीराव पेशवे काळ )
LikeLike
Aapla Abhari aahe. Uttar dyala ushir zala .Kshama Asavi. Kharokar Chan mahiti sangitlit.
LikeLike
hi gyes…. first of all many congrates that u r doing a historical job…. i have no word to express my feeling……my name is uday sankhe, my book on shivaji maharaj and his rajniti, yudhaniti and verious aspects which shivaji maharaj did all for rayat is comming next few yrs…i have visited pratapghad 21st time since 1997 and onwords if u expect some information u alyays well come to saiudaysankhe@rediffmail.com…… keep it up gyes…
LikeLike
धन्यवाद उदयजी. आपल्या पुस्तकास आमच्या शुभेच्छा. आपण पुस्तक लिहिले आहे म्हणजे आपल्याकडेही संदर्भ ग्रंथांची खाण असणार. प्रतापगडाचा १८६० पूर्वीचा एखादा नकाशा असल्यास आमच्याशी तो जरूर शेअर करावा. आम्हाला अभ्यासाकरिता त्याची सध्या अवश्यकता आहे. प्रोत्साहनाकरिता धन्यवाद.लोभ असावा.
LikeLike
खरच आज पर्यंत मी पाहीलेल्या ब्लॉग मधील हा सर्वात अभ्यास पुर्ण लिखाण असलेला अप्रतिम ब्लॉग आहे , इतक अभ्यास पुर्ण लिखान करणा-या व या साठी अथक प्रयत्न करणा-या मा.उमेश , प्रणव व विशाल यांचे मी मनापासुन आभार मानतो , तुम्ही असच वरचे वर लिहीत जाव , इतिहासातील अनेक मुक पात्र तुमची वाट पाहत आहेत , व तुमच्या नवनव नवीन लेखांची आम्ही………..
LikeLike
धन्यवाद विवेक. इतिहासातील सत्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याच्या आम्ही नेहमीच प्रयत्नात राहू. असेच भेट देत राहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवत राहा. लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा.
LikeLike
atishay sundar upkram ahe…..aaplya karyas maharaj udand shakti pradan karo aani satya prakashman hovo hi jagdamba charni prathana.
LikeLike
पराग जी सच्च्या शुद्ध भावनेने अभ्यास करणाऱ्यांच्या पाठीशी जगदंबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद सदैव असतील…..
शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. blog ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सारख्या वाचकांच्या आणि आप्त मित्रांच्या शुभेच्छा आणि प्रार्थना आम्हास नक्कीच बळ देतील…
पुन्हा एकदा धन्यवाद.
LikeLike
उमेश जोशी, प्रणव महाजन, विशाल खुळे.तुमचे आभार कसे मानावेत ते कळत नाही कारण आजच्या काळात खरा इतिहास तर सोडाच पण उपलब्ध इतिहासाचे वाभाडे काढण्याचे काम छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेवून ब्रिगेड वाले करत आहेत त्याचवेळे आपण केलेला हा प्रयत्न खरच कौतुकास्पद आहे. आम्ही सुधा छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सरदार गोदाजी जगताप यांचेच वंशज आहो
LikeLike
अजयजी,
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपले म्हणणे अगदी योग्य आहे. आपल्या पूर्वजांनी अपार मेहनत घेवून स्वराज्यस्थापानेस मदत केली त्याची किंमत न ओळखता उलट त्यांच्या आत्म्यांना क्लेश पोचवण्याचे काम ही लोकं करत आहेत. शिवभारतातील सुभानमंगळच्या लढाईतील गोदाजींचा पराक्रम वाचताना आजही रक्त सळसळते. अंगात स्फुरण चढते. लोकांपर्यंत हा पराक्रमी इतिहास पोचावा म्हणून जमेल तितका आमच्या वतीने खारीचा वाटा..अमुचे अगत्य असो द्यावे.
LikeLike
राजमान्य राजश्री
विशाल , प्रणव ,उमेश
आपण बाजी प्रभू आणि बांदल यांच्या इतिहासावार झगमगीत प्रकाश टाकण्याचे पवित्र काम केले त्याबद्दल आपला आभार .
आता पर्यंत बांदल घराण्याचा एवढा इतिहास कुणीच मांडला नव्हता ,
तुमच्या इतिहास जाणून घ्यायच्या जीद्धीला आमचा मुजरा तुम्हाला बांदल घराणे आणि स्वराज्याशी साम्मंधित माझ्या घराण्याकडील सर्व माहिती मी उपलब्ध करून देऊ शकतो ,
कृपया आपला फोन नॉ मिळावा
karan raje बांदल
LikeLike
करण राजे बांदल यांस,
आपली प्रतिक्रिया वाचून अतीव आनंद जाहला…….आपल्यासारख्यांचे कौतुक मिळाले कि लिहिण्याचा हुरूप वाढतो,उत्साह दुणावतो………. आम्ही आपणास padmadurg@gmail.com या आमच्या Email ID वरून संपर्क साधू…. तेव्हा भ्रमणध्वनी क्रमांक (mob no.) नक्कीच देऊ.
धन्यवाद….
LikeLike
khupach chaan upkram aahe……. mala pan tumha tigha sobat gad kille phirayala aawadel………. all d best.
LikeLike
Dhanywad Sanjay !
LikeLike
नमस्कार उमेश,
काही महिन्यांपूर्वी (कदाचित वर्षही झाले असेल) आपण बेडेकर सरांकडे भेटलो होतो. तेव्हा मी http://www.marathaempire.in ह्या संकेतस्थळाच्या पहिल्या पर्वाचे काम करत होतो. त्यानंतर काही भेटीचा योग आला नाही.
सध्या मी दुसऱ्या पर्वाचे काम सुरू केले आहे. त्याव्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी ह्या संकेतस्थळावर करता येण्यासारख्या आहेत. आपल्यासारखे समविचारी लोक एकत्र आले तर काही गोष्टी निश्चितच कमी वेळात करता येतील.
ह्या संकेतस्थळाचे काम मी कुठल्याही आर्थिक लाभाकरता करत नाही आणि यापुढेही कधी तसे करण्याचा मानस नाही.
कळावे,
रोहित सहस्रबुद्धे
LikeLike
नमस्कार रोहित,
आपले संकेतस्थळ पहिले अतिशय उत्तम झाले आहे.
आम्ही (मी, प्रणव, विशाल) देखील आपल्याच विचारांचे आहोत, सामाविचारांची माणस एकत्र येऊन काम करू लागली तर ते काम निश्चितच कमी वेळेत आणि आणखी चांगल्या प्रकारे करता येते, आमची मैत्री आणि असे विचार यातूनच हा ब्लॉग सुरु झाला आहे,
आपणास कोणत्याही स्वरूपाची मदत किंवा सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत.
त्या संदर्भात आपण प्रणव महाजन यांना जरूर संपर्क साधावा कारण या सर्वात आवश्यक असणाऱ्या तांत्रिक बाबींची माहिती माझ्या आणि विशाल पेक्षा त्यांना अधिक आहे,आमच काम इतिहासाचा अभ्यास करून लेख लिहिण आणि लोकांपर्यंत सत्य इतिहास पोहोचवण हे आहे, पण प्रणव इतिहासाच्या सखोल अभ्यासा इतकेच सर्व तांत्रिक बाबींचे जाणकार आहेत, आमचा इ-मेल id padmadurg@gmail.com आहे.
LikeLike
मला एक प्रश्न पडला आहे.हिंदी च`नल्स वर दाखविल्या जाणा-या ऐतिहासिक मालिकांना बघून माझ्या सारख्या इतिहासात फार कमी जाण असणा-या व्यक्तिला पण त्यात चित्रित केलेले प्रसंग खटकतात आणि इतिहासाशी प्रतारणा होत आहे असे वाटते.तरी आपण एक संशोधक आहात या नात्याने त्यावर योग्यरित्या बंदी घालावी त्यायोगे जनसामान्यां पर्यंत चुकीची माहिती पोहचणार नाही असे नाहीं का वाटत आपल्याला?अर्थात आपण खूप व्यस्त असता हे आपले काम बघून कळतेच आहे.तरी चुकीचे बघून लोकांची मानसिकता ना बिघडू देणे हा ही खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचाच एक भाग आहे,असे मला वाटते.
LikeLike
नमस्कार वैशाली ,
प्रथम आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि इतिहासाबद्दल दाखविलेल्या कळवलीबद्दल आपले आभार मानायला हवे. आज एकंदरच इतिहासाबद्दल आणि त्यातही भारतीय इतिहासाबद्दल जनमानसात उदासीनता दिसते. इतिहासाचा उपयोग म्हणण्यापेक्षा दुरुपयोगच अधिक होत आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. सध्या वारंवार जेव्हा महापुरुषांना जातीयवादाच्या चौकटीत बसवले जाते तेव्हा त्यांचे चिरतरुण आत्मे इतिहासाच्या खिडकीतून आपल्या या वंशजांकडे पाहून म्हणत असतील “याची साठी केला होता का अट्टाहास ?”
कल्हणाने राजतरिंगीणी उपोद्घातात लिहिले आहे “राग लोभ विरहित तटस्थपणे इतिहास कथन करावा” जे माहित नाही, त्याला माहित नाही असेच म्हणावे. पण याचे आपण खरच पालन करतोय का ?
TV सीरीयल्स बद्दल म्हणाल (केवळ हिंदीच नव्हे तर मराठी आणि इंग्रजीही) तर त्यातही हेच दिसतेय लेखक किंवा दिग्दर्शक आपल्या मनात एक इमेज तयार करतो की हे पात्र आपल्याला असे दाखवायचे आहे आणि त्याप्रमाणे सरळ इतिहासाची तमा न बाळगता त्या पात्राला वाट्टेल ते करायला लावतो. आमचे प्रयत्न म्हणाल तर काही दिवसापूर्वी एका नूतन नामांकित वाहिनी वर सुरु असलेल्या एका अत्यंत लोकप्रिय मालिकेदरम्यान आम्ही लेखकांशी चर्चा केली होती की….असलेल्या सबळ पुराव्यांवर होईल तेवढेच कथानक आणि तितकीच मालिका दाखवावी परंतु यावर जे उत्तर मिळाले ते असे – प्रथम त्यांनी सांगितले की मालिका ही मनोरंजनाचा भाग आहे त्यातून कुणीही इतिहास शिकण्याचा प्रयत्न करावा हे आमचे (Producer) उद्दिष्टच नाही ! बघणारयांचे मनोरंजन व्हावे इतकीच अपेक्षा…आणि त्यांचा हा रसिक वर्ग वाढला म्हणजे (अर्थातच TRP वाढला) जाहिरातींचे दर वाढले आणि त्या अनुषंगाने त्यांचा नफा !! …आणि अखेर हा त्यांचा व्यवसाय आहे तो नफ्यासाठीच. तेव्हा स्वतःचे स्वार्थ न साधता समाजकार्य म्हणून जेव्हा इतिहास दाखवला तेव्हाच कदाचित इतिहासातील सत्याचे दर्शन घडेल असे वाटते. लोकांचे म्हणाल तर वरील गणित आपण पाहिलेच! जोवर लोक हे बघणार तोपर्यंत हे चक्र सुरुच राहणार यावर उपाय म्हणजे अश्या मालिका न बघणे पण जर इतिहास बघणार असल्यास तरच, मनोरंजन बघणार असल्यास जरूर पहा, अखेर TV त्यासाठीच विकत घेतलाय हो की नाही ? (सारांश : TV मालिका, सिनेमा, कादंबरी यामध्ये इतिहास शोधू नका, सापडत नाही. निराशा होते. त्यांचे उद्दिष्ट्य केवळ मनोरंजन कधी दृक-श्राव्यातून तर कधी भाषाशैली आणि साहित्यातून !!! )
LikeLike
आदरणीय उमेश जोशी, प्रणव महाजन, विशाल खुळे. सर.. मला तुमचा ब्लॉग खरच खूप आवडला. तुम्ही हा अमूल्य ठेवा आमच्या परेंत पोचवलात त्या बद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप खूप आभार… माझी एक शंका आहे ”
कानपिचक्या – सेक्युलर शिवाजी महाराज !” या भागात काही ठिकाणी ““यवनांच्या सहकार्या शिवाय संपूर्ण स्वराज्य मिळणे असंभव आहे”” आणि “या यवनांच्या मदतीने नविन उभ्या राहणार्या सेक्युलर स्वराज्याला काही स्वकियांनी विरोध केला.” या दोन वाक्यात
यवनांच्या
च्या जागी कादाचीत “जवानाच्या” असं लिहायचं होतं का? कि तो ऐतिहासिक शब्द आहे???
LikeLike
aaitihasik shabda ahe.”yavan”, “mlencha” mhanje islami shakti. kinwa shatru.
LikeLike
यवन म्हणजे म्लेंच्छ….. शत्रू.
LikeLike
Very Good Articles…..
LikeLike
Thanks for the compliment, Parag.
LikeLike
khupach chaan mahiti ahe….
LikeLike
उमेशजी,
नमस्कार आपल्या उत्तराने समाधान वाटले. मध्य युगिन इतिहासाच्या बद्दल आपल्या सर्वांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे.
माझ्याडून आपल्या कामात काही मदत करता आली तर मी ती आनंदाने करीन.
LikeLike
ओक साहेब आम्हास आमच्या कामात कोणतीही मदत लागली तर आम्ही नक्कीच आपल्याला सांगू. धन्यवाद.
LikeLike
नमस्कार,
दोन्ही लेख वाचले, आवडले.सध्या अनेक शिवगड प्रेमी एकत्र येऊन किल्यांना मुळरुपात आणण्यासाठी झटत आहेत. श्री. कौस्तुभ बुटाला त्यातील प्रमुख आहेत.
प्रतापगड शिवरायांनी बांधला असे म्हटले जाते. १६५६ साली तो बांधायला चालू केला असे मानले तर त्यानंतर २-३ वर्षांच्या अल्पकाळात तो इतका प्रचंड मजबूत किल्ला स्थापत्यशास्त्राप्रमाणे बांधला असे म्हणणे अत्यंत अवघड वाटते. किल्ला बांधून राहायला किंवा वापरायला मिळेल इतका आधीच्या खूप पुर्वीच्या काळापासून उपयोगात होता याबाबत विचारणा अशी की तो आधीपासून तयार होता असे उल्लेख आहेत का. त्याला महाराजांनी आपल्यासोईप्रमाणे आणखी महाल आणि आधीच्या पडझड झालेल्या गढ्यांना चिरेबंदी केली असावी. आपले मत कळवावे.
LikeLike
ओक साहेब नमस्कार, शिवकाळात जे जे किल्ले होते त्यातले बरेच किल्ले आधीपासून अस्तित्वात होते (शिलाहारकालीन भोज राजाच्या कालखंडातले ते किल्ले होते असा मानल जातं. अंदाजे ८ व्या शतकापासून १३ व्या शतकातला काल.) कालांतराने त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल, ते ओस पडले,त्याची डागडुजी करून ते हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांनी समाविष्ट केले.शिवाजी महाराजांनी ते किल्ले अतिशाय बेलाग बुलंद करून घेतले. शिवाय सिंधुदुर्ग, प्रतापगड, पद्मदुर्ग असे काही दुर्गम किल्ले स्वतः बांधले.
LikeLike
nice writeup buddy! vachun aanand zala …
LikeLike
आमुचे अगत्य असो द्यावे !
LikeLike
Itihasala Manjur Nastat Sango Sangi Wadala Vangi,Jaise Ghadli Taisechi Aaklave.Taisechi Aaple Lihine Jhahale.
Aanek Dandavat,
Dilip Jadhav(Yashavantrao)
LikeLike