सध्या आत्म-निर्भरतेचे वारे वाहू लागलेत. संपूर्ण देशात स्वयं सिद्धता आणि स्वदेशी वरून वाद-प्रतिवाद सुरु झालेत. हे सगळे सुरू असताना, स्वराज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील स्वदेशी मालाचा पुरस्कार केला होता हे तुम्हाला ठाऊक आहे का? अपरिचित इतिहास या मालिकेत आज पाहूया स्वराज्याच्या मीठाची गोष्ट.