खुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन

गज़िउद्दिनखान फिरोजजंग

गज़िउद्दिनखान फिरोजजंग

 

रामशेजच्या किल्ल्यावर चालून येणारा गाझीउद्दिन खान बहादूर हा मराठ्यांच्या इतिहासाला चांगलाच परिचित आहे. ह्यानेच दिल्लीला पूर्वी मदरसा सुरु केला होता. रामशेजला मराठ्यांकडून धोंडे खाऊन त्रस्त झालेला हा सरदार पुढे हैदराबाद, अथणी, बंगलोर, असा फिरत फिरत साताऱ्याला नामजद झाला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी त्याची छावणी होती. साताऱ्याचा किल्ला घेण्याकरता तो दिवसेंदिवस पुढे सरकत होता. ह्या दरम्यान एक घटना घडली जी तत्कालीन मुघल इतिहासकार ईश्वरदास नागर याने नमूद करून ठेवली आहे.

ईश्वरदास लिहितो –

एक दिवस गज़िउद्दिन आपल्या तंबू मध्ये पोशाख चढवून बसला होता. त्याच्या हातात आरसा होता. आपले सुंदर रुपडे तो न्याहाळत होता. त्याच्या आजू बाजूला त्याचे खुशमस्करे होते जे त्याची स्तुती करत होते. स्तुती करताना त्यातील एक जण अनावधानाने म्हणाला –

सरदार आपले सौंदर्य आणि आपला पराक्रम इतका उजवा आहे की आपणच खरे सिंहासनाची शोभा आहात. आपणच ते सजवायला हवे (त्यावर बसून). त्यावर खान फ़क़्त ईश्वरइच्छा असेल तर तसे होईल इतकेच हसत म्हणाला.

तिथे त्याची आई देखील होती. तिने सारवासाराव करण्यासाठी – सिंहासन केवळ तैमुर वंशासाठी आहे आणि आपण त्याचे सेवक आहोत तेव्हा असे विचार करू नये असे प्रगटपणे सांगितले.

तिथे उभे असलेल्या एका हरकाऱ्याने हे ऐकले आणि बादशह औरंगजेबाला कळवले. औरंगजेबाला राग आला होता पण तूर्त त्याने तो गिळला. काही महिने गेले. एके दिवशी गज़िउद्दिन आजारी पडला. त्याचे डोके भयंकर दुखत होते. त्याच्या ह्या डोकेदुखीची बातमी औरंगजेबाला समजली. औरंगजेबचा खास हकीम फात खान याला पाचारण करण्यात आले. बादशाहने त्याला निरोप दिला की –

आमच्यावतीने आपण जाऊन गज़िउद्दिनची ख्याली खुशाली विचारावी आणि त्याचा योग्य तो इलाज करावा. त्याचे रूप तसेच राहो याची काळजी घ्यावी.

हकीम जे समजायचे ते समजला आणि गज़िउद्दिनच्या छावणीत पोचला. ख्याली खुशाली विचारून त्याने गज़िउद्दिनला औषध दिले. औषधाने गुण काही येईना म्हणून गज़िउद्दिन पुन्हा हकीमाची मदत मागू लागला. अखेर हकीमाने आपला डाव साधला.

गज़िउद्दिनखान फिरोजजंग याची कबर

गज़िउद्दिनखान फिरोजजंग याची कबर

अत्यंत क्रूरतेने त्याने गज़िउद्दिनच्या कपाळातील सगळे रक्त शोषून काढले. हा एकाच आपल्या डोकेदुखीवर जालीम उपाय आहे असे सांगून त्याने आपले काम सुरु ठेवले. ह्या उद्योगात गज़िउद्दिनची दृष्टी गेली आणि तो कायमचा अंधळा झाला. त्याची तब्येत ढासळू लागली. हकीम त्वरेने तिथून निसटला आणि बादशाहकडे आला. झाला वृत्तांत त्याने औरंगजेबाला सांगितला. पुढे औरंगजेबाने हेर पाठवून बातमीची खात्री करवून घेतली. खात्री पटल्यावर त्याने शाहजादा आझम याला पाठवून गज़िउद्दिनची मुद्दाम विचारपूस करवली आणि त्याचा मुलगा चीन किलीज खान याची बापाच्या जागी नियुक्ती केली. पुढे अंधत्व आलेला गज़िउद्दिन रोगराईत मारला गेला.

औरंगजेब किती धूर्त आणि खुनशी होता हे असल्या अनेक बारीक सारीक उदाहरणातून इतिहासातून डोकावते.

अपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया

नमस्कार,

इतिहासातील अज्ञात माहिती लोकांसमोर आणण्याचा एक अभिनव प्रयत्न ! – अपरिचित इतिहास या युट्युब मालिकेत सादर आहे छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया.

भाग ६ : छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया

सतत ९ वर्ष मुघलांच्या आक्रमणाला तोंड देताना खुद्द शंभूराजांनी ज्या मोहिमात सहभाग घेतल्या त्यांच्या संक्षिप्त आढावा घेण्याचा हा आमचा एक प्रयत्न !

आपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का?
आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.
आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !

आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!

धन्यवाद.

राजाराम महाराज – ‘तुम्ही लोक मनावरी धरिता गनीम तो काय आहे’

१६९० हे वर्ष मोठे धामधुमीचे होते. औरंगजेब नावाचा महाशत्रू महाराष्ट्रावर चालून आला होता. आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या शतकांचा वारसा असलेल्या शाह्या तो एका घासत गिळंकृत करणार होता. अश्या पार्श्वभूमीवर राजाराम महाराज यांचे बाजी ‘सर्जेराव’ जेधे यांना लिहिलेले हे पत्र मोठे महत्वाचे आणि स्वराज्य सांभाळण्याच्यासाठी केलेल्या खटपटीचे द्योतक आहे. जेधे या दरम्यान बहुदा मुघलांचा पक्ष स्वीकारणार असावे असे राजाराम महाराजांना कळले असावे म्हणून त्यांची समजूत घालून त्यांना स्वराज्यात टिकवण्याची धडपड पत्रात केलेली दिसते. पत्रात आजच्या महाराष्ट्राचा पूर्वज ‘मऱ्हाट राज्य’ नावाने दिसतो. इतर मुख्य आलेल्या गोष्टी म्हणजे जेध्यांना महाराष्ट्र देशात राजकारण करावे (लोक आपल्या बाजूने मिळवावे) तसेच चाललेल्या हालचाली कळवाव्या कारण ‘तुम्ही लोक ह्या राज्याची पोटतिडीक धरिता’ असे राजाराम महाराज लिहितात. स्वराज्यावर आलेल्या संकटाच्या वेळी स्वामींच्या पायाशी एकनिष्ठ राहावे असे कळवतात. औरंगजेबा सारखा प्रबळ ‘गनीम’ राज्यावर आला असूनही राजाराम महाराजांना खात्री आहे की ‘तुम्ही (स्वराज्याचे मावळे) लोक मनावर धरिता तर गनीम तो काय आहे? त्या औरंगजेबाचा हिसाब न धरावा’. नेतोजी पालकरांना तसेच इतरही लोकांना औरंगजेबाने बाटवले ह्याचा स्पष्ट उल्लेख पत्रात आहे. अखेरीस ‘ईश्वर’ करितो ते फते (विजय) आपलाच आहे असा आत्मविश्वासही पत्रात दिसून येतो. अभ्यासकांनी जरूर अभ्यासावे असे हे महत्वाचे पत्र आहे.

मूळ संदर्भ – मराठ्यांच्या इतिहासाची साधने – खंड १५ (जुना) – लेखांक ३४७

राजाराम महाराज यांचे बाजी 'सर्जेराव' जेधे यांना लिहिलेले पत्र

राजाराम महाराज यांचे बाजी ‘सर्जेराव’ जेधे यांना लिहिलेले पत्र

शिवाजी राजे – तू पाहिल, तूझ्या बापने पहिल, तूझ्या बादशाहने पण पाहिल मी कोण आहे !

आग्र्याच्या दरबारात शिवाजी राजे त्या औरंग्यासमोर गर्जना करत रामसिंग यास म्हणाले ” …तू पाहिलेस, तुझ्या बापाने पहिले आणि तुझ्या बादशाहने ने पण पहिले आहे मी कोण आहे आणि काय करू शकतो. तरी देखील मला मुद्दाम मान-सन्मानातून वगळण्यात आले… अरे नको तुमची मनसब…!!! मला उभे करायचे होते तर माझ्या दर्जा नुसार उभे करायचे होते. माझा मृत्यूच जवळ आला आहे. तुम्हीच मला ठार मारून टाका नाहीतर मीच मला ठार करतो. माझे मस्तक कापून न्यायचे असेल तर खुशाल न्या पण मी बादशहाची हुजरी करण्यासाठी येणार नाही….”

image

%d bloggers like this: