फिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो

महाराजांनी स्वतःचे कर्तृत्व स्वतः लिहावे अशी पत्रे फार थोडी आहेत. त्यातले हे एक पत्र.
शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडे, सावंत, यांचे पारिपत्य कसे केले याची माहिती सदर पत्रावरून आपल्याला समजायला मदत होते.
याच पत्रात शिवाजी महाराजांनी आपण पोर्तुगीजांवर कसे वर्चस्व निर्माण केले हे देखील कथन करतात.
शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी प्रस्तुत पत्राचा चांगला उपयोग होऊ शकतो.

प्रस्तुत पत्रातील उल्लेखात फिरंगी म्हणजे पोर्तुगीज आणि टोपीकर म्हणजे इंग्रज.

sawant-ghorpade

राजाराम महाराज – ‘तुम्ही लोक मनावरी धरिता गनीम तो काय आहे’

१६९० हे वर्ष मोठे धामधुमीचे होते. औरंगजेब नावाचा महाशत्रू महाराष्ट्रावर चालून आला होता. आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या शतकांचा वारसा असलेल्या शाह्या तो एका घासत गिळंकृत करणार होता. अश्या पार्श्वभूमीवर राजाराम महाराज यांचे बाजी ‘सर्जेराव’ जेधे यांना लिहिलेले हे पत्र मोठे महत्वाचे आणि स्वराज्य सांभाळण्याच्यासाठी केलेल्या खटपटीचे द्योतक आहे. जेधे या दरम्यान बहुदा मुघलांचा पक्ष स्वीकारणार असावे असे राजाराम महाराजांना कळले असावे म्हणून त्यांची समजूत घालून त्यांना स्वराज्यात टिकवण्याची धडपड पत्रात केलेली दिसते. पत्रात आजच्या महाराष्ट्राचा पूर्वज ‘मऱ्हाट राज्य’ नावाने दिसतो. इतर मुख्य आलेल्या गोष्टी म्हणजे जेध्यांना महाराष्ट्र देशात राजकारण करावे (लोक आपल्या बाजूने मिळवावे) तसेच चाललेल्या हालचाली कळवाव्या कारण ‘तुम्ही लोक ह्या राज्याची पोटतिडीक धरिता’ असे राजाराम महाराज लिहितात. स्वराज्यावर आलेल्या संकटाच्या वेळी स्वामींच्या पायाशी एकनिष्ठ राहावे असे कळवतात. औरंगजेबा सारखा प्रबळ ‘गनीम’ राज्यावर आला असूनही राजाराम महाराजांना खात्री आहे की ‘तुम्ही (स्वराज्याचे मावळे) लोक मनावर धरिता तर गनीम तो काय आहे? त्या औरंगजेबाचा हिसाब न धरावा’. नेतोजी पालकरांना तसेच इतरही लोकांना औरंगजेबाने बाटवले ह्याचा स्पष्ट उल्लेख पत्रात आहे. अखेरीस ‘ईश्वर’ करितो ते फते (विजय) आपलाच आहे असा आत्मविश्वासही पत्रात दिसून येतो. अभ्यासकांनी जरूर अभ्यासावे असे हे महत्वाचे पत्र आहे.

मूळ संदर्भ – मराठ्यांच्या इतिहासाची साधने – खंड १५ (जुना) – लेखांक ३४७

राजाराम महाराज यांचे बाजी 'सर्जेराव' जेधे यांना लिहिलेले पत्र

राजाराम महाराज यांचे बाजी ‘सर्जेराव’ जेधे यांना लिहिलेले पत्र

गरुड भरारी…!!!

प्रताप सूर्य थोरले बाजीराव पेशवे ह्यांनी पालखेड मोहिमेवर असताना केलेला प्रवास पहिला तर मन थक्क होतं. दळणवळणाची आजच्यासारखी साधने उपलब्ध नसताना, आजच्या सारखे express highway नसताना, केवळ आपल्या नजरबाजांवर, हेरांवर पूर्ण विश्वास ठेऊन भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून मोहिमा आखण म्हणजे ह्या वीरांच्या युद्धकौशल्याची परिसीमाच म्हणायची…!

केवळ जीवाभावाच्या साथीदारांवर पूर्ण विश्वास ठेऊन मोठमोठ्या लढाया मारणारे बाजीराव पेशवे ह्यांनी  पालखेडच्या  लढाईत निजामाला पाठलागावर ठेऊन, झुकांड्या देऊन पालखेड ला गाठून सपशेल पराभूत केले. सच्चा शिपायाला जात नसते, आपल्या राजाच्या चरणी निष्ठा आणि आपल्या राज्यावर वक्र दृष्टी टाकणाऱ्या शत्रूला रणांगणात धूळ चारणे या दोनच गोष्टी त्यांना माहित असतात. “मराठ्यांच्या स्वाऱ्यांचे मुक्काम” या पुस्तकातील पालखेड युद्धा दरम्यानच्या मराठी फौजेच्या घोड दौडीच्या या नोंदी बघितल्या कि  थोरल्या बाजीराव पेशवे (राया, राऊ ) यांचा पराक्रम जातीत तोलणाऱ्या “विचारजंतांची” कीव येते.

Rau

%d bloggers like this: