ऑगस्ट 26, 2015
by विशाल खुळे
हेन्री रेविंगटन चे शिवाजी महाराजांना हिंदू सेनाधिपती म्हणून संबोधणारे पत्र
गेल्या 150 वर्षांमधे शिवाजी महाराज हे कसे आपल्या विचारांचे होते हे सांगण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला आहे. यात अमुक समाजाचा शिवाजी, तमुक समाजाचा शिवाजी झाले ! अलीकडच्या काळात तर डावे-उजवे सर्वच विचारधारांचे लिहून झाले आहे.
पण शिवाजी राजांचा संबध हिंदू या शब्दाशी जोडला गेला तर जणू काय खुप मोठे संकट येणार आहे असा आविर्भाव तथाकथित फुरोगामि, फेक्युलर आणतात. पण सत्य हे सत्यच असते, अश्या सर्व फेक्युलर-फुरोगामि लोकांनी खालील पत्रातील उल्लेख वाचावा.
इस्ट इंडिया कंपनीचा भारतातील प्रतिनिधी आणि राजापूरच्या वखारीचा प्रमुख ‘हेनरी रेव्हिंगटन’ याने १३ फेब्रु १६६० या दिवशी शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे, त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो
– “General of the Hindoo forces” (हे हिंदू सेनाधिपती शिवाजीराजा), म्हणजेच त्याकाळी देखील इंग्रजांची धारणा होती की शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत !
जे त्या इंग्रजाना समजले ते आताच्या फुरोगामि आणि फेक्युलर लोकांना समजत नाही !! दुर्दैव ! दुसरे काय ?

Like this:
Like Loading...