शिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र
जानेवारी 24, 2017 यावर आपले मत नोंदवा
मध्ययुगीन इतिहासात आपण अनेकदा पाहतो ते सरदारांचे एका सत्तेकडून दुसऱ्या सत्तेकडे जाणे. बहुतांश वेळा या सत्ता एकमेकांच्या विरोधात असत पण आज प्रस्तुत करत असलेले हे पत्र त्या अर्थाने वेगळे आहे. शिवाजी महाराजांचे सरदार सर्जेराव जेधे आणि सर्जेराव जेधे यांच्या पदरी असणारे त्यांचे लोक अशी उभी राज्य मांडणी असताना जेध्यांची माणसं त्यांच्या कडून थेट महाराजांकडे येत असावी आणि म्हणून सर्जेरावांनी महाराजांना पत्र लिहिले असावे. त्या पत्राचे हे उत्तर शिवाजी महाराजांनी दिले आहे. सदर पत्रात फुटून आलेल्या लोकांना नोकरीवर ठेवणार नाही असे आश्वासन महाराजांनी दिलेले आहे. या वरून हे समजते की नोकरी बदलणे म्हणजे प्रत्येक वेळी पक्ष किंवा स्वामी बदलणे असे नसून एकाच सत्तेखाली अथवा स्वामीत्वा खाली देखील लोक चाकरी बदलत होते.

सर्जेराव जेधे यांना पत्र