खुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन

गज़िउद्दिनखान फिरोजजंग

गज़िउद्दिनखान फिरोजजंग

 

रामशेजच्या किल्ल्यावर चालून येणारा गाझीउद्दिन खान बहादूर हा मराठ्यांच्या इतिहासाला चांगलाच परिचित आहे. ह्यानेच दिल्लीला पूर्वी मदरसा सुरु केला होता. रामशेजला मराठ्यांकडून धोंडे खाऊन त्रस्त झालेला हा सरदार पुढे हैदराबाद, अथणी, बंगलोर, असा फिरत फिरत साताऱ्याला नामजद झाला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी त्याची छावणी होती. साताऱ्याचा किल्ला घेण्याकरता तो दिवसेंदिवस पुढे सरकत होता. ह्या दरम्यान एक घटना घडली जी तत्कालीन मुघल इतिहासकार ईश्वरदास नागर याने नमूद करून ठेवली आहे.

ईश्वरदास लिहितो –

एक दिवस गज़िउद्दिन आपल्या तंबू मध्ये पोशाख चढवून बसला होता. त्याच्या हातात आरसा होता. आपले सुंदर रुपडे तो न्याहाळत होता. त्याच्या आजू बाजूला त्याचे खुशमस्करे होते जे त्याची स्तुती करत होते. स्तुती करताना त्यातील एक जण अनावधानाने म्हणाला –

सरदार आपले सौंदर्य आणि आपला पराक्रम इतका उजवा आहे की आपणच खरे सिंहासनाची शोभा आहात. आपणच ते सजवायला हवे (त्यावर बसून). त्यावर खान फ़क़्त ईश्वरइच्छा असेल तर तसे होईल इतकेच हसत म्हणाला.

तिथे त्याची आई देखील होती. तिने सारवासाराव करण्यासाठी – सिंहासन केवळ तैमुर वंशासाठी आहे आणि आपण त्याचे सेवक आहोत तेव्हा असे विचार करू नये असे प्रगटपणे सांगितले.

तिथे उभे असलेल्या एका हरकाऱ्याने हे ऐकले आणि बादशह औरंगजेबाला कळवले. औरंगजेबाला राग आला होता पण तूर्त त्याने तो गिळला. काही महिने गेले. एके दिवशी गज़िउद्दिन आजारी पडला. त्याचे डोके भयंकर दुखत होते. त्याच्या ह्या डोकेदुखीची बातमी औरंगजेबाला समजली. औरंगजेबचा खास हकीम फात खान याला पाचारण करण्यात आले. बादशाहने त्याला निरोप दिला की –

आमच्यावतीने आपण जाऊन गज़िउद्दिनची ख्याली खुशाली विचारावी आणि त्याचा योग्य तो इलाज करावा. त्याचे रूप तसेच राहो याची काळजी घ्यावी.

हकीम जे समजायचे ते समजला आणि गज़िउद्दिनच्या छावणीत पोचला. ख्याली खुशाली विचारून त्याने गज़िउद्दिनला औषध दिले. औषधाने गुण काही येईना म्हणून गज़िउद्दिन पुन्हा हकीमाची मदत मागू लागला. अखेर हकीमाने आपला डाव साधला.

गज़िउद्दिनखान फिरोजजंग याची कबर

गज़िउद्दिनखान फिरोजजंग याची कबर

अत्यंत क्रूरतेने त्याने गज़िउद्दिनच्या कपाळातील सगळे रक्त शोषून काढले. हा एकाच आपल्या डोकेदुखीवर जालीम उपाय आहे असे सांगून त्याने आपले काम सुरु ठेवले. ह्या उद्योगात गज़िउद्दिनची दृष्टी गेली आणि तो कायमचा अंधळा झाला. त्याची तब्येत ढासळू लागली. हकीम त्वरेने तिथून निसटला आणि बादशाहकडे आला. झाला वृत्तांत त्याने औरंगजेबाला सांगितला. पुढे औरंगजेबाने हेर पाठवून बातमीची खात्री करवून घेतली. खात्री पटल्यावर त्याने शाहजादा आझम याला पाठवून गज़िउद्दिनची मुद्दाम विचारपूस करवली आणि त्याचा मुलगा चीन किलीज खान याची बापाच्या जागी नियुक्ती केली. पुढे अंधत्व आलेला गज़िउद्दिन रोगराईत मारला गेला.

औरंगजेब किती धूर्त आणि खुनशी होता हे असल्या अनेक बारीक सारीक उदाहरणातून इतिहासातून डोकावते.

अपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया

नमस्कार,

इतिहासातील अज्ञात माहिती लोकांसमोर आणण्याचा एक अभिनव प्रयत्न ! – अपरिचित इतिहास या युट्युब मालिकेत सादर आहे छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया.

भाग ६ : छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया

सतत ९ वर्ष मुघलांच्या आक्रमणाला तोंड देताना खुद्द शंभूराजांनी ज्या मोहिमात सहभाग घेतल्या त्यांच्या संक्षिप्त आढावा घेण्याचा हा आमचा एक प्रयत्न !

आपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का?
आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.
आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !

आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!

धन्यवाद.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण

छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यातील वतानाबद्दल भूमिका खूप ठाम होती. ज्याचा हक्क सिद्ध होईल त्यालाच तो हक्क मिळाला पाहिजे ही महाराजांची नेहमीच भूमिका होती.
असाच एक निवडा करताना शिवाजी महाराज म्हणतात “स्वामी धाकुटपणा पासून या देशात आहेत. मिरासदार कोण व गैर मिरासदार कोण हे जाणताती व माणसाचे माणूस ओळखतात”.
महाराज स्वतः जातीने निवाड्यात कसे लक्ष घालत हे या पत्रावरून सिद्ध होते.

शिवाजी राजांचे वतन विषयक पत्र

शिवाजी राजांचे वतन विषयक पत्र

शिवभूषण निनादराव बेडेकर यांची भाषणे

|| शिवदशक ||

छत्रपती शिवाजी महाराज व शिवकालावर आधारित शिवभूषण श्री. निनादराव बेडेकर यांची लोकप्रिय भाषणे. 

१. श्रीशिवछत्रपती आणि सह्याद्री

२. श्रीशिवछत्रपती आणि समुद्र व आरमार

३. श्रीशिवछत्रपती आणि कवि राज भूषण 

४. श्रीशिवछत्रपती आणि त्यांचा पत्रव्यवहार 

५. श्रीशिवछत्रपती आणि रणसंग्राम

६. श्रीशिवछत्रपती आणि स्वधर्म

७. श्रीशिवछत्रपती आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य / Timeless Management Techniques of Shivaji the Great

८. श्रीशिवचरित्राचे महत्व

९. श्रीशिवछत्रपती आणि महाराष्ट्र धर्म

१०. श्रीशिवछत्रपती आणि भगवान श्रीकृष्ण

सदर भाषणे ही रत्नागिरी, तळेगाव, डोंबिवली, प्रतापगड, पुणे अश्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी झाली असून, खुद्द निनादरावांकडून गेल्या काही वर्षात मिळवण्यात आली होती.

शिवप्रेमी रसिकांकरिता, एकत्रितपणे उपलब्ध केलेली ही भाषणे म्हणजे एक ऐतिहासिक पर्वणी आहे.

– निनाद रावांच्या स्मृतीस वंदन करून इतिहास प्रेमींच्या सोयीकरिता सादर समर्पित –

गुरुपोर्णिमा २०१५

शिवाजी महाराज – रामचंद्रपंत अमात्यांच्या आज्ञापत्रातील वर्णन – स्वराज्य म्हणजे काय ?

“अवनीमंडळ निरयावनी करावे, यावनाक्रांत राज्य आक्रमावे, हा निघोड चित्ताभिप्राय प्रकट करून पूर्व पश्चिम दक्षिण या प्रांती जे जे यवनस्तोमे बद्धमूल जाहली होती त्यावर सेना समुदाय प्रेरून मारून काढिले.
आपल्या बुद्धिवैभव व पराक्रमे कोणाची गणना न धरिता, कोणावरी चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणास आणिले, कोणावरी छापे घातले, कोणामध्ये परस्परे कलह लाऊन दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेरीयात सिरोन मारामारी केली, कोणासी एकांगी करून पराभविले, कोणासी स्नेह केले, कोणाचे दर्शनास आपणहून गेले, कोणास आपले दर्शनास आणिले, कोणास परस्परे दगे करवले, जे कोणी इतर प्रयत्ने ना कळे त्यांचे देशात जबरदस्तीने स्थळे बांधून पराक्रमे करून आकळीले.
जलादुर्गाश्रयीत होते त्यास नूतन जलदुर्गेच निर्माण करून पराभविले. दुर्गत स्थळी नौका मार्गे प्रवेशले.
ऐसे ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकळावा तो तो शत्रू त्या त्या उपाये पादाक्रांत करून साल्हेरी अहिवंतापासून चंजी कावेरीतीरापर्यंत निष्कंटक राज्य, शतावधी कोट किल्ले, तैसीच जलदुर्गे व कित्येक विषम स्थळे हस्तगत केली.
चाळीस हजार पागा साठ-सत्तर हजार शिलेदार, दोन लक्ष पदाती, कोट्यावधी खजिना, तैसेच उत्तम जवाहीर सकल वस्तुजात संपादिले.
९६ कुळीचे मराठीयांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होवून छत्र धरून छत्रपती म्हणविले, धर्मोद्धार करून देव ब्राह्मण संस्थानी स्थापून यजन याजानादी षटकर्मे वर्णविभागे चालवली.
तस्कारादी अन्यायी यांचे नाव राज्यात नाहीसे केले. देश-दुर्गादी सैन्याचे बंद नवेच निर्माण करून एक रूप अव्याहत शासन चालवले, केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली.की ज्यावर अवरंगजेबासारखा महाशत्रू चालोन आला असता त्यास स्वप्रतापसागरी निमग्न केला. दिगंत विख्यात कीर्ती संपादली …  ते हे राज्य

संभाजी महाराज – आता हे हिंदू राज्य झाले आहे

गोव्यातील हडकोळण प्रांतातील अंत्रुज येथील शिलालेखात एक वाक्य आले आहे. हा शिलालेख संभाजी राजांनी करवुन घेतला होता. यातील एक वाक्य संभाजी राजांची हिंदू धर्मा विषयी ची धारणा काय होती हे स्पष्ट करणारे आहे.

मुसलमानी अमल असताना त्या प्रांतात कर घेतला जात होता. संभाजी राजे यानी फोंडयाचा अधिकारी धर्माजी नागनाथ यास 22 मार्च 1688 रोजी कळवले आता हे ” हिंदूराज्य ” झाले आहे त्यामुळे येथील सगळे कर आता त्वरित बंद करावेत.

अरे बापरे संभाजी राजांनी हिंदू हा शब्द वापरलाय किती घोर अन्याय केला आहे त्यांनी आतच्या फेक्युलर आणि फुरोगामि म्हणवून घेणार्यांवर. घोर अन्याय घोर अन्याय

image

संभाजी महाराज – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ?

संभाजी राजे – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ?

संभाजी राजांनी मिर्झा राजा जयसिंग याच्या मुलास म्हणजे रामसिंगास जे पत्र लिहले त्यातच हे वरील दिलेले वाक्य आहे. यात आपण सर्व हिंदू राजांनी एकत्र येऊन दिल्लीपति बादशाह च्या विरुद्ध लढ़ा दिला पाहिजे असे संभाजी राजे सांगत आहेत. संभाजी राजांची स्वताच्या धर्माबद्दल जी काही धारणा आहे ती शब्दा शब्दातुन व्यक्त होते. यात संभाजी राजे म्हणतात –
” आपण हिंदू काय दुबळे, तत्वहीन झालो आहोत ? आपल्या देवालायांची मोड़ तोड़ झाली तरी स्वधर्म रक्षण करण्यास असमर्थ आहोत,धर्माचरण शुन्य आहोत अशी त्या यवन बादशाहची समजूत झाली आहे. अश्या वेळी आपण एक होऊन त्या यवनाला तुरुंगात डांबले पाहिजे. देवालय स्थापन करुन धर्माचे रक्षण केले पाहिजे ”

पचेल का हे आताच्या फेक्युलर लोकांना ? की ह्याला पण खोटा इतिहास बोलणार ? कारण यात हिंदू हा शब्द आला आहे.

Sambhaji Raje

 

अभ्यास शिवभारताचा – १ – ‘गोब्राम्हणप्रतिपालक’

शिवभारत हे शिवाजी महाराजांच्याच पदरी असणारया कवींद्र परमानंद गोवीन्द नेवासकर याने रचलेले महाकाव्य आहे.

। चरितं शिवराजस्य भरतस्येव भारतम ।

अशी समर्पक व्याख्या देत त्याने चरित्राला सुरुवात केली आहे, अर्थ काय तर जसे व्यासांनी “महाभारत” रचून भरत वंशाच्या राजांची कहाणी मांडली तशीच योजना मनी बांधून कविन्द्रांना शिवाजी महाराजांचे चरित्र “शिवभारत” रुपात लिहावयाचे होते. या सदरात आपण याच बहुमोल ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. रचना समकालीन असल्याने त्याचे महत्व अमोल आहे. या ग्रंथातील अनेक नोंदी, वर्णने आणि प्रसंग आपण या सदरात अभ्यासणार आहोत.

सुरुवात करूया एका वादग्रस्त विशेषणाने – “गोब्राम्हणप्रतिपालक”

आजकाल ब्राम्हणांना शिव्या देणे म्हणजे Fashion झाली आहे, त्यामुळेच गोब्राम्हणप्रतिपालक हे विशेषण शिवछत्रपतींना कुणी लावले जर काही विघ्न संतोषी लोक आगपाखड करतात. शिवाजी राजे हे शिवाजी राजे होते, ती तुमच्या आमच्या सारखी सामान्य व्यक्ती नव्हती. जनतेचा प्रतिपाळ करणारा तो एक प्रजापालक राजा होता. त्याच्या रयतेत सर्व सामील होते. ब्राम्हण एका गावात हाकलून देवून आणि ते गाव स्वराज्याच्या सीमेबाहेर ढकलून त्यांनी राज्य केलेले नाही. एरवी शिवभारत हा समकालीन आधार मानणारे स्वयंघोषित इतिहासकार आणि जिज्ञासू मात्र त्यातच असणारया ह्या विशेषणाकडे संपूर्ण दुर्लक्ष कसे करू शकतात ?

तर हा आहे स्पष्ट आणि समकालीन शिवाजी राजे यांचा गोब्राम्हणप्रतिपालक असलेला उल्लेख –

शिवभारत - गोब्राम्हणप्रतिपालक

शिवभारत – गोब्राम्हणप्रतिपालक

उल्लेख पहिल्या अध्यायात १५ व्या श्लोकात असून, काशीनिवासी श्रोते मंडळी हे कविन्द्रांना विनवणी करताना शिवाजीराजांना जी विशेषणे वापरतात त्याची इथे नोंद घ्यायची आहे. इथे ब्राम्हण या जातीचा उदो उदो नसून सत्य ते मांडण्याचा हेतू आहे ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी. कारण पुढे चुकल्यावर जिवाजी विनायकाला ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो? असा करडा सवाल करणारे सुद्धा हेच शिवछत्रपति होते. तेव्हा जातीच्या रकान्यात ह्या राजाला न अडकवता एखाद्या आई प्रमाणे प्रजेची काळजी, सांभाळ आणि वेळी कान-उघडणी करणारा व्यक्ती म्हणून पाहणे महत्वाचे आहे.

बहुत काय लिहिणे, तरी आपण सुज्ञ असा !

शिवाजी महाराज- हिंदू आणि तुरकांचा मिलाप कधी झाला आहे काय ?

शिवाजी महाराज – हिंदुंचा आणि तुरकांचा मिलाप कधी झाला आहे काय ?

वरील वाक्य हे शिवाजी महाराज आणि बुंदेल खंडाचा राजा छत्रसाल बुंदेला यांच्या भेटिच्या दरम्यानचे आहे.

छत्रसाल बुंदेला हा ज्यावेळी शिवाजी राजांना भेटण्यास आला त्यावेळी त्यांच्यात जे संभाषण झाले ते छत्रसाला कड़े आश्रित असणारा ‘लालकवी ‘ याचे मूळ नाव गोरेलाल याने टीपुन ठेवले होते. छत्रसाल याच्या आज्ञेवरुन लालकवी ने छत्रप्रकाश नावाचा ग्रंथ लिहला यात हे संभाषण आले आहे.

हे सांगण्याचा मूळ मुद्दा असा वरील वाक्य नीट वाचले की समजून येते,शिवाजी महाराजांची स्वराज्या प्रति धारणा नक्की काय होती शिवाय याच आशयाचे एक पत्र त्यांनी व्यंकोजी राजांना पण पाठवलेले उपलब्ध आहे. नाहीतर आजकाल नको नको ती लेबल शिवाजी राजांना लावन्याचे कार्यक्रम सरास सुरु आहेतच.

water marks

 

शंभूछत्रपतींची संत तुकोबांच्या पुत्राला मोइन

शिवाजी राजांनी संत आणि धर्माचे ज्याप्रमाणे रक्षण आणि प्रतिपालन केले, तोच वारसा पुढे शंभू छत्रपतींनी चालवला.
तुकोबारायांचे चिरंजीव महादोबा यांना दिलेली ही वर्षासनाची मोइन ह्याचे उत्तम उदाहरण आहे.  पत्र १९ ऑगस्ट १६८० रोजी दिलेले असून, मायना शिवराज्याभिषेकानंतर वापरण्यात आलेल्या पत्रांसारखाच आहे.
पत्रात देहू, तुकोबा गोसावी आणि त्यांचे पुत्र महादोबा गोसावी असे स्पष्ट उल्लेख आहेत.

water marks 2

 

%d bloggers like this: