गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…!!!

शिवाजी महाराजांच्या ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ या बिरुदावरून कायमच वाद उत्पन्न झालेले दिसतात. अर्थात, हे वाद एकतर जातीयवादी नाहीतर राजकारणी केवळ त्यांच्या फायद्यासाठी उकरून काढत असतात हे उघड आहे. पण यामुळे, सर्वसामान्य माणसाला, ज्याला इतिहासात नेमकं काय दडलंय हे माहित नसतं तो अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणखी संभ्रमित होतो. याकरताच, शिवाजी महाराजांच्या ‘गोब्राह्मणप्रतिपालना’चे समकालीन आणि उत्तरकालीन पुरावे काय आहेत ते आपण पाहूया –

१) सगळ्यात पहिला पुरावा म्हणजे खुद्द शिवाजी महाराजांचे इ.स. १६४७-४८ मधील मोरेश्वर गोसाव्यांसंबंधी पुण्याच्या देशमुख आणि सरकारी कारकुनांना लिहिलेले एक पत्र. यात शिवाजी महाराज स्वतः म्हणतात, “महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती, गाईचा प्रतिपाळ केलिया बहुत पुण्य आहे”.
पत्राचा स्रोत : शिवचरित्रसाहित्य खंड ३, लेखांक ५३४

२) मोरेश्वर गोसाव्यांसंबंधी पुण्याच्या पुण्याच्या देशमुख आणि सरकारी कारकुनांना इ.स. १७४८-४९ मधील लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, “ब्राह्मणांकडून गुरांची पालं घेऊ नका, ती सरकारातून माफ केली आहेत”
पत्राचा स्रोत : शिवचरित्रसाहित्य खंड ३, लेखांक ५३७

३) शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेल्या कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहिलेल्या ‘शिवभारता’त महाराजांना स्पष्टपणे गाई आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा असं ठिकठिकाणी लिहिलेलं आढळेल. शिवभारताच्या पुढील श्लोकांमधून आपल्याला हे समजून येईल :

श्लोक :
देवद्विजगवां गोप्ता दुर्दान्तयवनान्तकः । प्रपन्नानां परित्राता प्रजानां प्रियकारकाः ।।१५।।
तस्यास्य चरितं ब्रह्मन्नेनकाध्यायगर्भितम् । भगवत्याः प्रसादेन भवता यत् प्रकाशितम् ।।१६।।

अर्थ : देव-ब्राह्मण आणि गाई यांचा त्राता, दुर्दम्य यवनांचा काळ, शरणागतांचा रक्षक, (जो) प्रजेचे प्रिय करणारा आहे अशा त्या शिवाजीराजांचे जे अनेकाध्यात्मक चरित्र आपण एकवीरा देवाच्या प्रसादाने प्रसिद्ध केले आहे.

श्लोक :
द्विजातीरीती तं श्रुत्वा जानानः शिवभूमीपः । अभ्येतमपि नो हन्तुमिच्छन्निजनयस्थितः ।।४८।।

अर्थ : तो (कृष्णाजी भास्कर) ब्राह्मण आहे असे ऐकून जाणत्या व नीतीने वागणाऱ्या शिवाजीराजाने त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही.

४) शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष अष्टप्रधान मंडळात असलेले रामचंद्रपंत अमात्य आपल्या “आज्ञापत्र” या अमूल्य ग्रंथात महाराजांविषयी लिहितात – “शहाण्णवकुळीचे मराठ्यांचा उध्दार केला. सिंहासनारूढ होऊन, छत्र धरून छत्रपती म्हणविलें. धर्मोद्धार करून देव-ब्राह्मण संस्थांनी स्थापून यजनयाजनादी षट्कर्मे वर्णविभागे चालविली”.

५) दि. १५ सप्टेंबर १६७८ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासस्वामींना दिलेल्या सनदेत समर्थांनी महाराजांना दिलेल्या उपदेशात “देव-ब्राह्मणांची सेवा करूनु, प्रज्येची पीडा दूर करुनु पाळण रक्षण करावे” असं सांगितल्याचं आणि आपण त्यानुसारच वागत असल्याचं खुद्द महाराज उद्धृत करतात.
स्रोत : चाफळची सनद (मूळ अप्रकाशित)

६) समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं “निश्चयाचा महामेरू” हे जे सार्थ वर्णन केलं आहे त्यात ते महाराजांसंबंधी म्हणतात, “देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण । हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ।”.

७) शिवाजी महाराजांचा समकालीन असलेला आणि खुद्द महाराजांच्या भेटीने प्रभावित झालेला, तत्कालीन महाराष्ट्र पाहिलेला उत्तरेतला महाकवी भूषण महाराजांबद्दल म्हणतो :

“शिवाजी महाराज ब्राह्मणभोजन घालत होते” (शिवभूषण छंद ६४), “धर्माच्या वेळी ब्राह्मण पाहिले की कुबेराची पहाडासारखी सुवर्णसंपत्ती लुटून दान करण्याची उर्मी शिवाजीराजांच्या मनात उत्पन्न होते” (शिवभूषण छंद ३८९)

८) शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे बुधभुषणम् मध्ये क्षत्रियांची कर्तव्य सांगताना “गो-ब्राह्मण प्रतिपालन” हे एक कर्तव्य सांगतात. संभाजीराजे म्हणतात, “वेदांचे अध्ययन करून, यज्ञ करून, प्रजेचे पालन, गो-ब्राह्मणपालन करून जो मारला गेला किंवा संग्रामात धारातीर्थी पडला तो क्षत्रिय स्वर्गास जातो”. आता हे वर्णन संभाजीराजांनी कोणाला डोळ्यासमोर ठेऊन केलं असावं बरं ?
(संदर्भ : बुधभुषणम् – संपादक : कदम, अध्याय २रा, श्लोक ५५४)

९) सभासद मालोजीराजांना झालेल्या शंभुमहादेवाच्या दृष्टांताबद्दल चर्चा करताना म्हणतो, “तुझ्या वंशात आपण अवतार घेऊ ! देव ब्राह्मणांचे संरक्षण करून म्लेंच्छांचा क्षय करतो”. आता वास्तविक हे वर्णन मालोजीराजांचा पुत्र शहाजीराजांसंबंधी आहे. पण शहाजीराजे जर “गोब्राह्मणप्रतिपालक” आहेत तर शिवाजी महाराज नसतील का ?

या सगळ्यावरून आपल्याला एक गोष्ट ठामपणे सांगता येते कि महाराज “गोब्राह्मणप्रतिपालक” नक्कीच होते. बहुत काय लिहिणे ? आपण वाचक सुज्ञ आहातच. आमचे अगत्य असू द्यावे हि विज्ञापना..

© टीम : इतिहासाच्या पाऊलखुणा
(सादर लेखाचे सर्व हक्क राखीव आहेत)

फिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो

महाराजांनी स्वतःचे कर्तृत्व स्वतः लिहावे अशी पत्रे फार थोडी आहेत. त्यातले हे एक पत्र.
शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडे, सावंत, यांचे पारिपत्य कसे केले याची माहिती सदर पत्रावरून आपल्याला समजायला मदत होते.
याच पत्रात शिवाजी महाराजांनी आपण पोर्तुगीजांवर कसे वर्चस्व निर्माण केले हे देखील कथन करतात.
शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी प्रस्तुत पत्राचा चांगला उपयोग होऊ शकतो.

प्रस्तुत पत्रातील उल्लेखात फिरंगी म्हणजे पोर्तुगीज आणि टोपीकर म्हणजे इंग्रज.

sawant-ghorpade

गोविंदपंत बुंदेले – ‘आम्ही कान धरली शेळी आहो’

गोविंदपंत बुंदेले (मूळ आडनाव खेर) हे मराठ्यांचे उत्तरेतील एक मातबर सरदार होते. छत्रसालाकडून मिळालेल्या बुंदेलखंडातील राज्यावर सुमारे १७३३ दरम्यान त्यांची नियुक्ती झाली असावी. प्रस्तुत पत्र हे एका वेगळ्या अर्थाने इतिहासावर प्रकाश टाकणारे आहे. जातीवरून शिव्यांची लाखोली वाहणारे स्वयंघोषित इतिहासप्रेमी आज ब्राम्हण समाजाला टार्गेट करतात. पेशव्यांनी स्वराज्य बुडवले, मराठा सरदारांना ‘बामण’ पेशवाईत चांगले वागवले गेले नाही असे बिनबुडाचे आरोप करत हिंडतात. हे पत्र २३ सप्टेंबर १६५५ रोजी गोविंदपंत बुन्देल्यांनी नानासाहेब पेशव्यांना लिहिले आहे. उत्तरेतील हकीगत सांगणारे हे पत्र स्पष्ट आणि बोलके आहे. अभ्यासकांनी पत्र निट वाचावे. एका बोलक्या वाक्यात पत्राचा सारांश सांगायचा म्हणजे – “…बख्र-उल्ला खान नावाचा पातशाहीत नामी सरदार होता, त्याला परम संकटात जाऊन, परम उपाय करून (बुंदेले यांनी) बुडवला.… (खंत व्यक्त करताना गोविंदपंत लिहितात) मराठा सरदार हे कर्म करिता तर जमिनीवर न माता (मराठा सरदारांपैकी कुणी हे कार्य केले असते तर त्याला स्वामींनी आभाळात ठेवले असते /  खूप गौरव केला असता) आम्ही स्वामींचे ब्राम्हण आमची शिफारस कोण करणार? (गोंविंदपंत ब्राम्हण म्हणून त्यांच्या पराक्रमाकडे कानाडोळा झाला असे ते लिहितात / त्यांनी कुरा कोडा नावाचे अलाहबाद नजीकचे प्रांत हस्तगत केले होते) “. पुढे अब्दालीच्या तुकडीकडून हेच गोविंदपंत बुंदेले पानिपत संग्रामापूर्वी मारले गेले. अधिक काय लिहावे.

मूळ पत्र संदर्भ – मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३ (जुना) – लेखांक १३७

गोविंदपंत बुंदेले यांचे नानासाहेब पेशवे यांना लिहिलेले पत्र

गोविंदपंत बुंदेले यांचे पत्र

 

 

 

शिवाजी महाराज – “हिंदू सेनाधिपति”

हेन्री रेविंगटन चे शिवाजी महाराजांना हिंदू सेनाधिपती म्हणून संबोधणारे पत्र

गेल्या 150 वर्षांमधे शिवाजी महाराज हे कसे आपल्या विचारांचे होते हे सांगण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला आहे. यात अमुक समाजाचा शिवाजी, तमुक समाजाचा शिवाजी झाले ! अलीकडच्या काळात तर डावे-उजवे सर्वच विचारधारांचे लिहून झाले आहे.

पण शिवाजी राजांचा संबध हिंदू या शब्दाशी जोडला गेला तर जणू काय खुप मोठे संकट येणार आहे असा आविर्भाव तथाकथित फुरोगामि, फेक्युलर आणतात. पण सत्य हे सत्यच असते, अश्या सर्व फेक्युलर-फुरोगामि लोकांनी खालील पत्रातील उल्लेख वाचावा.

इस्ट इंडिया कंपनीचा भारतातील प्रतिनिधी आणि राजापूरच्या वखारीचा प्रमुख ‘हेनरी रेव्हिंगटन’ याने १३ फेब्रु १६६० या दिवशी शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे, त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो
– “General of the Hindoo forces” (हे हिंदू सेनाधिपती शिवाजीराजा), म्हणजेच त्याकाळी  देखील इंग्रजांची धारणा होती की शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत !

जे त्या इंग्रजाना समजले ते आताच्या फुरोगामि आणि फेक्युलर लोकांना समजत नाही !! दुर्दैव !  दुसरे काय ?

 

water marks3

%d bloggers like this: