क्या कोई शातिर राज्यकर्ता? कोई सफल शासक? या एक धर्मांध जुल्मी क्रूरकर्मा बादशाह? जिसने अपने ज़िदके कारण पुरे मुगलिया सल्तनत को दावपे लगाया और उसके पतन के लिए कारण बना | ये है बादशाह औरंगज़ेब की कहानी!
आपल्या २० वर्षांच्या वादळी कारकिर्दीत थोरल्या बाजीराव साहेबांनी काही अचाट धैर्य केली. त्यातील एक होते थेट दिल्लीवर चढाई करणे. १७३७ साली सादतखानावर केलेली ही चढाई इतिहास प्रसिद्ध आहे. ह्या स्वारी बद्दल थेट राउंनीच अप्पांना पत्र लिहून कळवले होते. हे पत्र त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्वपूर्ण ठरावे असेच आहे. पत्रातील एक वाक्य तर कायम स्मरणात रहावे असे आहे, त्यावरून त्या काळातील राजकारणावर भरपूर प्रकाश पडतो – “दिल्ली महास्थळ, अमर्याद केल्यास राजकारणाचा दोर तुटतो”.
इतिहास प्रेमींच्या अभ्यासाकरिता सदर पत्र संपूर्ण उपलब्ध करत आहोत. पत्र जरा लांबलचक आहे परंतु अत्यंत महत्वाचे आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे मुद्दाम अधोरेखित केले आहेत. वाचकांनी हे पत्र जरुर वाचावे.
शिवाजी महाराज स्वराज्यातील लोकांच्या संरक्षणासाठी किती दक्ष असत हे खालील पत्रावरून दिसून येते.
मुघलांच्या हालचाली महाराजांचे हेर त्यांना टाकोटाक देत असत असे या पत्रावरून समजते.
सदर पत्र शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना लिहलेले आहे. यात महाराजांची वाक्य बरेच काही सांगून जातात.
कामास हैगै न करणे, कामास एक घडीचा दिरंगा न करणे, आपल्या जागी तुम्ही हुशार असणे.
इतिहासातील अज्ञात माहिती लोकांसमोर आणण्याचा एक अभिनव प्रयत्न ! – अपरिचित इतिहास या युट्युब मालिकेत सादर आहे छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया.
भाग ६ : छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया
सतत ९ वर्ष मुघलांच्या आक्रमणाला तोंड देताना खुद्द शंभूराजांनी ज्या मोहिमात सहभाग घेतल्या त्यांच्या संक्षिप्त आढावा घेण्याचा हा आमचा एक प्रयत्न !
आपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का?
आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.
आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !