खटासी पाहिजे खट

गोवेकर फिरंगी अत्यंत कडवे धर्मप्रसारक होते.
शिवाजी महाराजांनी गोवेकर फिरंग्यांना चांगलाच धडा शिकवला होता.
महाराजांनी काय केले ह्याचे वर्णन असणारी एक डाक इंग्रजांना आली जी त्यांनी त्यांच्या रेकॉर्ड मध्ये नमूद करून ठेवली.
तीच इथे प्रस्तुत करत आहोत. हे वाचून एक पक्के समजते की ज्याला ज्या भाषेत समजते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते.


मूळ नोंद –

गोव्याच्या व्हाइसरॉयने रोमन कॅथलिक धर्म वगळून इतर धर्माच्या माणसांना हाद्दपारीचा हुकूम काढल्यामुळे क्रुद्ध होऊन शिवाजीने गोव्यानजीक बारदेशच्या हद्दीवर स्वारी केली.
तेथील चार पाद्री लोकांनी स्वधर्मीयांव्यतिरिक्त इतरांचा प्राणनाश करण्याचा सल्ला दिला होता.
हे लक्षात ठेवून त्यांनी स्वतः शिवाजीचा हिंदू धर्म नाकारल्यामुळे शिवाजीने त्यांचा शिरच्छेद केला, त्यामुळे घाबरून जाऊन व्हाइसरॉय ने आपला क्रूर व कडक हुकूम परत घेतला.
शिवाजी ने आसपासच्या सर्व मुलखात जाळपोळ करून १५० लक्ष होनांची लूट केली.

गोव्यासंबंधी इंग्रजांना आलेली डाक

गोव्यासंबंधी इंग्रजांना आलेली डाक

संदर्भ – शि.प.सा.सं

http://www.marathahistory.com
http://www.youtube.com/marathahistory

 

फिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो

महाराजांनी स्वतःचे कर्तृत्व स्वतः लिहावे अशी पत्रे फार थोडी आहेत. त्यातले हे एक पत्र.
शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडे, सावंत, यांचे पारिपत्य कसे केले याची माहिती सदर पत्रावरून आपल्याला समजायला मदत होते.
याच पत्रात शिवाजी महाराजांनी आपण पोर्तुगीजांवर कसे वर्चस्व निर्माण केले हे देखील कथन करतात.
शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी प्रस्तुत पत्राचा चांगला उपयोग होऊ शकतो.

प्रस्तुत पत्रातील उल्लेखात फिरंगी म्हणजे पोर्तुगीज आणि टोपीकर म्हणजे इंग्रज.

sawant-ghorpade

अपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया

नमस्कार,

इतिहासातील अज्ञात माहिती लोकांसमोर आणण्याचा एक अभिनव प्रयत्न ! – अपरिचित इतिहास या युट्युब मालिकेत सादर आहे छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया.

भाग ६ : छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया

सतत ९ वर्ष मुघलांच्या आक्रमणाला तोंड देताना खुद्द शंभूराजांनी ज्या मोहिमात सहभाग घेतल्या त्यांच्या संक्षिप्त आढावा घेण्याचा हा आमचा एक प्रयत्न !

आपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का?
आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.
आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !

आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!

धन्यवाद.

Unexplored History – Episode 5 – 10 Battles led by Chhatrapati Sambhaji Maharaj

Dear Readers,

Thank you for the great response that was provided to our previous English video release.

Here is our Fifth video of the series based on Battles led by Chhatrapati Sambhaji Maharaj.

Again, If you haven’t subscribed to our YouTube channel, now is the best time to do so:)

Thanks & Stay Excited.

Pranav – Umesh – Vishal

शिवाजी राजे – दौलतखान यास कुचराई केल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकले

जंजीरेकर सिद्दी याच्या विरोधात न लढता दौलतखान परत आल्यामुळे शिवाजी राजांनी त्यास नोकरी वरुन काढून टाकले.

बरीच फेक्युलर आणि फुरोगामि मंडळी शिवाजी राजांच्या सैन्यात यवन खुप होते अशी दवंडी पीटत असतात त्यांनी जरा खालील पत्र डोळे उघडे ठेवून वाचावे.

image

मुळ इंग्लिश रिपोर्ट –

Daulat Khan Cashiered

Daulat Khan Cashiered

%d bloggers like this: