समस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर

वाचकहो नमस्कार,
ब्लॉगवर नियमितपणे आपण अनेक प्रश्न विचारात असता. त्या प्रश्नांना आम्ही जमेल तशी यथाशक्ती उत्तरे देतो. प्रश्नांचा ओघ वाढल्याने त्यासाठी स्वतंत्र सदर सुरु करत आहे ज्याने सर्व प्रश्न एका जागी एकसंध राहतील.

आपल्यालाही मराठ्यांच्या इतिहासासंबंधी काही प्रश्न आहेत का ? असल्यास या सदरात आपण ते विचारू शकाल.

– धन्यवाद –


श्री रवी जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाने सदर सुरु करतो.

श्री रवी जाधव यांचा प्रश्न –

संभाजी महाराज कधी तारापुर भागात आले होते का? मी तारापुर जवळच राहतो…किल्ल्या पासून दहा पावलांन वर आमची शाळा आहे.. रा. ही. सावे विद्यालय..
Itke vrsha tithe shikun amhi bhautek vela killya chya magchya bajune jaycho baghayla kai ahe te.. kadhi madhe jata nahi al amhala…te kahitari karara ne dilele ahe mhantat to killa purvi pasun ajun hi to killa jyana dila hota tyanchya dekh rekhi khali ahe..private property ch jhali as mhanav lagel karan to nehami bandach asto..mala nit mahiti nahi…pan lahana cha motha jhalo pan kadhi madhe kai ahe te baghta nahi ala mhanun… Mala asa prashna padlay ki sambhaji maharaj kadhi hya bhagat ale hote ka? Kelve-mahim,tarapur,daman, vasai hya Portuguesanchya bhagat? Chimaji appa ale hote pan sambhaji maharaj???

Mobile varun marathi type karayla khup vel lagat hota mhanun English madhech type karun bolo sorry…mi hach prashna Facebook var pan takla hota pan kahi uttar nahi milal mhanun ithe punha..

शंभूराजे आणि तारापूर

आपण उल्लेख केलेला परिसर उत्तर फिरंगाण आहे.

या भागात खुद्द संभाजी राजे आले होते का?

याचे उत्तर आहे होय ! – १५-४-१६८३ रोजी संभाजी महाराजांनी स्वतः १००० घोडदळ आणि २००० पायदळ घेऊन तारापूरवर हल्ला केला आणि किल्ल्याबाहेरील शहर जाळले. मराठ्यांच्या इतर तुकड्यांनी दमण पासून वसई पर्यंत काही छोट्या बंदरावर हल्ले केले. २ पोर्तुगीज पाद्री देखील कैद केले होते. तारापूरच्या पोर्तुगीज वखारीचा अधिकारी मॅन्युअल अल्वारेस याने मराठ्यांना प्रतिकार केला आणि गोव्यालाही वृत्त पाठवले. गोवेकरांनी मराठ्यांचा गोव्यातील वकील येसाजी गंभीरराव याला अटक केली. पुढे मराठ्यांनी पोर्तुगीझांना येणारे धान्य अडवले आणि रसद मारली ज्यामुळे त्यांनी माघार घेऊन येसाजीला सोडून दिले. पुढे हे संबंध वाईट होत गेले आणि १६८४ दरम्यान संभाजी राजांची मोहीम दक्षिण फिरंगाणात झाली.  ज्याला आज आपण गोवा मोहीम किंवा व्हडलें राजीक म्हणतो. संभाजी महाराजांच्या फक्त हालचाली वाचायच्या असल्यास श्री. शिवदे यांचे ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा या पुस्तकातील जोड प्रकरणातील कालपट हा धडा वाचावा. परंतु या मोहिमेत तारापूर काही मराठ्यांच्या ताब्यात आला नाही असे दिसते कारण मोहीम गोव्याच्या दिशेने फिरली आणि पुढे मुअज्जमच कोकणात उतरला. १६७० ते १७२८ पर्यंत तारापूर किल्ला आणि प्रदेश पोर्तुगेज अंमलाखाली होता हे निश्चित नोंदींवरून समजते. चिमाजी अप्पांनी हा प्रदेश पुढे स्वतंत्र केला. भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

%d bloggers like this: