अपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु
जून 24, 2020 १ प्रतिक्रिया
शनिवार वाडा म्हणजे पुण्याचा मानबिंदू. पुण्याचे एके काळचे वैभव. शनिवारवाड्याने अनेक ऊन पावसाळे पाहिले. अनेक स्थित्यंतरे आणि चढ उतार अनुभवले. ह्या विडियो मध्ये आपण शनिवार वड्यातील अवशेष ह्यांचा जुन्या नोंदी द्वारे अभ्यास करण्याच्या आणि जुन्या संशोधकांनी केलेली स्थल निश्चिती दाखवण्याचा प्रायत्न करणार आहोत. थोरले बाजीराव पेशवे, राघोबा दादा, सदाशिवराव भाऊ, थोरले माधवराव हे वाड्यात नेमके कुठे राहायचे? दप्तरखाने, दिवाणखाने आणि रंगमहाल नेमके कुठे होते? हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.