गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…!!!

शिवाजी महाराजांच्या ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ या बिरुदावरून कायमच वाद उत्पन्न झालेले दिसतात. अर्थात, हे वाद एकतर जातीयवादी नाहीतर राजकारणी केवळ त्यांच्या फायद्यासाठी उकरून काढत असतात हे उघड आहे. पण यामुळे, सर्वसामान्य माणसाला, ज्याला इतिहासात नेमकं काय दडलंय हे माहित नसतं तो अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणखी संभ्रमित होतो. याकरताच, शिवाजी महाराजांच्या ‘गोब्राह्मणप्रतिपालना’चे समकालीन आणि उत्तरकालीन पुरावे काय आहेत ते आपण पाहूया –

१) सगळ्यात पहिला पुरावा म्हणजे खुद्द शिवाजी महाराजांचे इ.स. १६४७-४८ मधील मोरेश्वर गोसाव्यांसंबंधी पुण्याच्या देशमुख आणि सरकारी कारकुनांना लिहिलेले एक पत्र. यात शिवाजी महाराज स्वतः म्हणतात, “महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती, गाईचा प्रतिपाळ केलिया बहुत पुण्य आहे”.
पत्राचा स्रोत : शिवचरित्रसाहित्य खंड ३, लेखांक ५३४

२) मोरेश्वर गोसाव्यांसंबंधी पुण्याच्या पुण्याच्या देशमुख आणि सरकारी कारकुनांना इ.स. १७४८-४९ मधील लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, “ब्राह्मणांकडून गुरांची पालं घेऊ नका, ती सरकारातून माफ केली आहेत”
पत्राचा स्रोत : शिवचरित्रसाहित्य खंड ३, लेखांक ५३७

३) शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेल्या कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहिलेल्या ‘शिवभारता’त महाराजांना स्पष्टपणे गाई आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा असं ठिकठिकाणी लिहिलेलं आढळेल. शिवभारताच्या पुढील श्लोकांमधून आपल्याला हे समजून येईल :

श्लोक :
देवद्विजगवां गोप्ता दुर्दान्तयवनान्तकः । प्रपन्नानां परित्राता प्रजानां प्रियकारकाः ।।१५।।
तस्यास्य चरितं ब्रह्मन्नेनकाध्यायगर्भितम् । भगवत्याः प्रसादेन भवता यत् प्रकाशितम् ।।१६।।

अर्थ : देव-ब्राह्मण आणि गाई यांचा त्राता, दुर्दम्य यवनांचा काळ, शरणागतांचा रक्षक, (जो) प्रजेचे प्रिय करणारा आहे अशा त्या शिवाजीराजांचे जे अनेकाध्यात्मक चरित्र आपण एकवीरा देवाच्या प्रसादाने प्रसिद्ध केले आहे.

श्लोक :
द्विजातीरीती तं श्रुत्वा जानानः शिवभूमीपः । अभ्येतमपि नो हन्तुमिच्छन्निजनयस्थितः ।।४८।।

अर्थ : तो (कृष्णाजी भास्कर) ब्राह्मण आहे असे ऐकून जाणत्या व नीतीने वागणाऱ्या शिवाजीराजाने त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही.

४) शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष अष्टप्रधान मंडळात असलेले रामचंद्रपंत अमात्य आपल्या “आज्ञापत्र” या अमूल्य ग्रंथात महाराजांविषयी लिहितात – “शहाण्णवकुळीचे मराठ्यांचा उध्दार केला. सिंहासनारूढ होऊन, छत्र धरून छत्रपती म्हणविलें. धर्मोद्धार करून देव-ब्राह्मण संस्थांनी स्थापून यजनयाजनादी षट्कर्मे वर्णविभागे चालविली”.

५) दि. १५ सप्टेंबर १६७८ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासस्वामींना दिलेल्या सनदेत समर्थांनी महाराजांना दिलेल्या उपदेशात “देव-ब्राह्मणांची सेवा करूनु, प्रज्येची पीडा दूर करुनु पाळण रक्षण करावे” असं सांगितल्याचं आणि आपण त्यानुसारच वागत असल्याचं खुद्द महाराज उद्धृत करतात.
स्रोत : चाफळची सनद (मूळ अप्रकाशित)

६) समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं “निश्चयाचा महामेरू” हे जे सार्थ वर्णन केलं आहे त्यात ते महाराजांसंबंधी म्हणतात, “देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण । हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ।”.

७) शिवाजी महाराजांचा समकालीन असलेला आणि खुद्द महाराजांच्या भेटीने प्रभावित झालेला, तत्कालीन महाराष्ट्र पाहिलेला उत्तरेतला महाकवी भूषण महाराजांबद्दल म्हणतो :

“शिवाजी महाराज ब्राह्मणभोजन घालत होते” (शिवभूषण छंद ६४), “धर्माच्या वेळी ब्राह्मण पाहिले की कुबेराची पहाडासारखी सुवर्णसंपत्ती लुटून दान करण्याची उर्मी शिवाजीराजांच्या मनात उत्पन्न होते” (शिवभूषण छंद ३८९)

८) शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे बुधभुषणम् मध्ये क्षत्रियांची कर्तव्य सांगताना “गो-ब्राह्मण प्रतिपालन” हे एक कर्तव्य सांगतात. संभाजीराजे म्हणतात, “वेदांचे अध्ययन करून, यज्ञ करून, प्रजेचे पालन, गो-ब्राह्मणपालन करून जो मारला गेला किंवा संग्रामात धारातीर्थी पडला तो क्षत्रिय स्वर्गास जातो”. आता हे वर्णन संभाजीराजांनी कोणाला डोळ्यासमोर ठेऊन केलं असावं बरं ?
(संदर्भ : बुधभुषणम् – संपादक : कदम, अध्याय २रा, श्लोक ५५४)

९) सभासद मालोजीराजांना झालेल्या शंभुमहादेवाच्या दृष्टांताबद्दल चर्चा करताना म्हणतो, “तुझ्या वंशात आपण अवतार घेऊ ! देव ब्राह्मणांचे संरक्षण करून म्लेंच्छांचा क्षय करतो”. आता वास्तविक हे वर्णन मालोजीराजांचा पुत्र शहाजीराजांसंबंधी आहे. पण शहाजीराजे जर “गोब्राह्मणप्रतिपालक” आहेत तर शिवाजी महाराज नसतील का ?

या सगळ्यावरून आपल्याला एक गोष्ट ठामपणे सांगता येते कि महाराज “गोब्राह्मणप्रतिपालक” नक्कीच होते. बहुत काय लिहिणे ? आपण वाचक सुज्ञ आहातच. आमचे अगत्य असू द्यावे हि विज्ञापना..

© टीम : इतिहासाच्या पाऊलखुणा
(सादर लेखाचे सर्व हक्क राखीव आहेत)

खुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन

गज़िउद्दिनखान फिरोजजंग

गज़िउद्दिनखान फिरोजजंग

 

रामशेजच्या किल्ल्यावर चालून येणारा गाझीउद्दिन खान बहादूर हा मराठ्यांच्या इतिहासाला चांगलाच परिचित आहे. ह्यानेच दिल्लीला पूर्वी मदरसा सुरु केला होता. रामशेजला मराठ्यांकडून धोंडे खाऊन त्रस्त झालेला हा सरदार पुढे हैदराबाद, अथणी, बंगलोर, असा फिरत फिरत साताऱ्याला नामजद झाला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी त्याची छावणी होती. साताऱ्याचा किल्ला घेण्याकरता तो दिवसेंदिवस पुढे सरकत होता. ह्या दरम्यान एक घटना घडली जी तत्कालीन मुघल इतिहासकार ईश्वरदास नागर याने नमूद करून ठेवली आहे.

ईश्वरदास लिहितो –

एक दिवस गज़िउद्दिन आपल्या तंबू मध्ये पोशाख चढवून बसला होता. त्याच्या हातात आरसा होता. आपले सुंदर रुपडे तो न्याहाळत होता. त्याच्या आजू बाजूला त्याचे खुशमस्करे होते जे त्याची स्तुती करत होते. स्तुती करताना त्यातील एक जण अनावधानाने म्हणाला –

सरदार आपले सौंदर्य आणि आपला पराक्रम इतका उजवा आहे की आपणच खरे सिंहासनाची शोभा आहात. आपणच ते सजवायला हवे (त्यावर बसून). त्यावर खान फ़क़्त ईश्वरइच्छा असेल तर तसे होईल इतकेच हसत म्हणाला.

तिथे त्याची आई देखील होती. तिने सारवासाराव करण्यासाठी – सिंहासन केवळ तैमुर वंशासाठी आहे आणि आपण त्याचे सेवक आहोत तेव्हा असे विचार करू नये असे प्रगटपणे सांगितले.

तिथे उभे असलेल्या एका हरकाऱ्याने हे ऐकले आणि बादशह औरंगजेबाला कळवले. औरंगजेबाला राग आला होता पण तूर्त त्याने तो गिळला. काही महिने गेले. एके दिवशी गज़िउद्दिन आजारी पडला. त्याचे डोके भयंकर दुखत होते. त्याच्या ह्या डोकेदुखीची बातमी औरंगजेबाला समजली. औरंगजेबचा खास हकीम फात खान याला पाचारण करण्यात आले. बादशाहने त्याला निरोप दिला की –

आमच्यावतीने आपण जाऊन गज़िउद्दिनची ख्याली खुशाली विचारावी आणि त्याचा योग्य तो इलाज करावा. त्याचे रूप तसेच राहो याची काळजी घ्यावी.

हकीम जे समजायचे ते समजला आणि गज़िउद्दिनच्या छावणीत पोचला. ख्याली खुशाली विचारून त्याने गज़िउद्दिनला औषध दिले. औषधाने गुण काही येईना म्हणून गज़िउद्दिन पुन्हा हकीमाची मदत मागू लागला. अखेर हकीमाने आपला डाव साधला.

गज़िउद्दिनखान फिरोजजंग याची कबर

गज़िउद्दिनखान फिरोजजंग याची कबर

अत्यंत क्रूरतेने त्याने गज़िउद्दिनच्या कपाळातील सगळे रक्त शोषून काढले. हा एकाच आपल्या डोकेदुखीवर जालीम उपाय आहे असे सांगून त्याने आपले काम सुरु ठेवले. ह्या उद्योगात गज़िउद्दिनची दृष्टी गेली आणि तो कायमचा अंधळा झाला. त्याची तब्येत ढासळू लागली. हकीम त्वरेने तिथून निसटला आणि बादशाहकडे आला. झाला वृत्तांत त्याने औरंगजेबाला सांगितला. पुढे औरंगजेबाने हेर पाठवून बातमीची खात्री करवून घेतली. खात्री पटल्यावर त्याने शाहजादा आझम याला पाठवून गज़िउद्दिनची मुद्दाम विचारपूस करवली आणि त्याचा मुलगा चीन किलीज खान याची बापाच्या जागी नियुक्ती केली. पुढे अंधत्व आलेला गज़िउद्दिन रोगराईत मारला गेला.

औरंगजेब किती धूर्त आणि खुनशी होता हे असल्या अनेक बारीक सारीक उदाहरणातून इतिहासातून डोकावते.

अपरिचित इतिहास – भाग ६ – छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया

नमस्कार,

इतिहासातील अज्ञात माहिती लोकांसमोर आणण्याचा एक अभिनव प्रयत्न ! – अपरिचित इतिहास या युट्युब मालिकेत सादर आहे छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया.

भाग ६ : छत्रपती संभाजी महाराजांनी नेतृत्व केलेल्या १० लढाया

सतत ९ वर्ष मुघलांच्या आक्रमणाला तोंड देताना खुद्द शंभूराजांनी ज्या मोहिमात सहभाग घेतल्या त्यांच्या संक्षिप्त आढावा घेण्याचा हा आमचा एक प्रयत्न !

आपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का?
आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.
आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !

आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!

धन्यवाद.

Unexplored History – Episode 3 – Peshwas of the Maratha Kingdom

Dear Readers,

Thank you for the great response that was provided to our previous English video release.

Here is our Third video of the series based on Peshwas of the Maratha Kingdom.

Again, If you haven’t subscribed to our YouTube channel, now is the best time to do so:)

Thanks & Stay Excited.

Pranav – Umesh – Vishal

छत्रपती संभाजीराजे आणि गुढीपाडवा

महाराष्ट्रात सध्या जातीय अस्मिता फार टोकदार होऊ लागल्या आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल मिडीया साईट्स आणि अ‍ॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून पद्धतशीरपणे तरुणांची माथी भडकवण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. अशातच, ज्यांना सत्य काय माहित नसते अशांना या सगळ्या गोष्टी खर्‍या वाटू लागतात आणि जातिजातीत आणखी तेढ निर्माण होते.

अशापैकीच गुढीपाडवा जवळ आला की उठणारी आवई म्हणजे “छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हा मनुस्मृतीनुसार झाला, आणि राजांच्या हत्येच्या आनंदात ब्राह्मणांनी गुढ्या उभारण्यास सुरुवात केली. त्यामूळे गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण साजरा करू नये” ही !

अर्थात, गुढीपाडव्याचे उल्लेख शंभूराजांच्या मृत्यूपूर्वीच्या अनेक ऐतिहासिक कागदपत्रात असल्याने असल्या गैरप्रचाराला बळी पडण्यास काही कारण नाही. गुढीपाडव्याचे १६८९ पूर्वीचे उल्लेख आपण पाहूया-

१) शिवचरित्र साहित्य खंड १ या पुस्तकात पृ ५९ ते ६५ वर लेखांक ४१ म्हणून एक जुना महजर दिला आहे. महजर म्हणजे न्यायाधिशाचे अंतिम लिखित मत ! हा महजर मार्गशीर्ष शुद्ध १ विरोधीनाम संवत्सर शके १५७१ अथवा सुहूर सन खमसेन अलफ म्हणजेच दि. २४ नोव्हेंबर १६४९ रोजीचा असून सदर महजरात “गुढीयाचा पाडवा” असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे पाडव्याला गुढ्या उभारत असत हे स्पष्ट दिसते.

२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० (जुना खंड) या पुस्तकात पृ २३४ ते २३८ वर लेखांक १७६ म्हणून एक निवाडपत्र दिले आहे. सदर गृहस्थाला निवाड्यासाठी काही पुरावे म्हणून दाखवायला सांगितले असता त्याने दिलेल्या कागदपत्रातील संबंधीत मजकूर असा- “शके १५५२ मध्ये कार्तिक पौर्णिमा ग्रामस्थ कसबे वाई याणी ग्रहण काळी कडत जोसी क॥ (कसबे) मजकूर यास प्रतिवर्षी पासोडी येक व गहू व ‘गुढीयाचे पाडव्यास’ कुडव येक देऊ म्हणोन पत्र लेहूँ दिल्हे यास वर्षे तागायत १४८ होतात”. म्हणजे इ.स. १६३१-३२ मध्ये सुद्धा पाडव्याला गुढ्या उभारल्या जात असत हे येथे स्पष्ट होते.

३) श्री रामदासांची कविता खंड १ या पुस्तकात पृ ९६ वर समर्थ रामदासस्वामी श्रीराम रावणाचा वध करून पुन्हा महाराष्ट्रात आल्यावर महाराष्ट्रातील जनतेने ‘गुढ्या उभारल्या’ असे देतात- “ध्वजा त्या गुढ्या तोरणे उभविली ।”. अर्थात राम आल्यावर गुढ्या इत्यादी विषय बाजूला ठेवला तरी समर्थांची समाधी ही संभाजीराजांच्या मृत्युपूर्वी किमान ८ वर्षे असल्याने आणि त्याही पूर्वी समर्थांनी हे काव्य रचल्याने “गुढ्या” या महाराष्ट्राला नविन नव्हत्या हे दिसते.

४) शिवकालीन पत्रसारसंग्रह या पुस्तकात पृ ४७७ वर लेखांक १६२५ म्हणून एक नारायण शेणव्याचे मुंबईच्या गव्हर्नरला लिहीलेले चैत्र शुद्ध ८ शके १५९६ म्हणजेच दि. ४ एप्रिल १६७४ रोजीचे पत्र दिले आहे. यापत्रात नारायण शेणवी “निराजी पंडित पाडव्याकरीता आपल्या घरी आला” असा उल्लेख असून ऐन राज्याभिषेकाच्या दोन महिने आधी “पाडव्याचा सण” महत्वाचा होता असे दिसते.

एकूणच काय, हे सगळे स्पष्ट असताना आम्ही अजूनही अशा समाजात तेढ निर्माण करणार्‍या अफवांवर विश्वास ठेवायचा का ? किमान सुज्ञ लोकांस तरी हे सांगणे न लगे ! बहुत काय लिहीणे ? अगत्य असु द्यावे.

– लेखक (इतिहासाच्या पाऊलखुणा) आणि संचालक मंडळ (इतिहासाच्या पाऊलखुणा facebook group)

शिवाजी राजे – दोन वर्षे लष्कराचे पोट भरले आणि शेहजादा मित्र जोडला हे सामान्य नाही

आग्रा सुटकेनंतर संभाजी राजांना महाराजांनी पुन्हा मनसबदार म्हणून औरंगाबादला पाठवले. 2 वर्षानी संभाजी राजे पुन्हा आल्यावर शिवाजी महाराज म्हणतात ”  दोन वर्षे लष्कराचे पोट भरले आणि शेहजादा मित्र जोडला हे सामान्य नाही ”

image

संभाजी राजे – श्री रामदास स्वामी यांनी पूर्णावतार केला तेथे हनुमंताचे देवालय बांधने

श्री रामदास स्वामी यांचे देहावसान झाल्यानंतर संभाजी राजानी काशी रंगनाथ देशाधिकारी यास पत्र लिहून कळवले ” श्री रामदास स्वामी सज्जनगडी होते त्यांनी पूर्णावतार केला त्या स्थानी श्री हनुमंत देवालय करविले आणि चाफळ च्या रथोछायाकरिता कर्णाटकातुन मूर्ति आणिल्या”

भोसले घरण्याचे आणि सज्जनगड चे संबंध किती दृढ़ होते हे यावरून स्पष्ट होते आणि असे असंख्य पुरावे आपल्याला मिळतात. पण काही समाजकंटक याला वेगळेच रूप देऊ पाहात आहेत याला कोणीही बळी पडू नये म्हणून हा लेखन प्रपंच.

image

संभाजी राजे – मुसलमान अगर हर कोणाचा उपद्रव न लागे

श्री रामदास स्वामी यानी चाफळ येथे सुरु केलेल्या राम नवमी उत्सवास कोणाचा ही त्रास होता कामा नये यासाठी संभाजी राजांनी 28 ऑक्टो 1682 रोजी तेथील अधिकार्यास सक्त ताकीदीचे पत्र लिहले आहे.

सदर पत्रात संभाजी राजे म्हणतात ” यात्रेच्या वेळी मुसलमान अगर हर कोणाचा उपद्रव न लागे यैसे करुन श्री गोसावी यांचे स्थल आहे ”

वाचनार्यानी आता स्वाताच वाचून ठरवावे सदर पत्र खाली दिलेच आहे. नाहीतर  डावे-उजवे, फेक्युलर, फुरोगामि आजकाल शिवाजी राजे आणि संभाजी राजे यांना नको ती लेबल लावतच सूटलेत.

image

संभाजी महाराज – आता हे हिंदू राज्य झाले आहे

गोव्यातील हडकोळण प्रांतातील अंत्रुज येथील शिलालेखात एक वाक्य आले आहे. हा शिलालेख संभाजी राजांनी करवुन घेतला होता. यातील एक वाक्य संभाजी राजांची हिंदू धर्मा विषयी ची धारणा काय होती हे स्पष्ट करणारे आहे.

मुसलमानी अमल असताना त्या प्रांतात कर घेतला जात होता. संभाजी राजे यानी फोंडयाचा अधिकारी धर्माजी नागनाथ यास 22 मार्च 1688 रोजी कळवले आता हे ” हिंदूराज्य ” झाले आहे त्यामुळे येथील सगळे कर आता त्वरित बंद करावेत.

अरे बापरे संभाजी राजांनी हिंदू हा शब्द वापरलाय किती घोर अन्याय केला आहे त्यांनी आतच्या फेक्युलर आणि फुरोगामि म्हणवून घेणार्यांवर. घोर अन्याय घोर अन्याय

image

संभाजी महाराज – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ?

संभाजी राजे – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ?

संभाजी राजांनी मिर्झा राजा जयसिंग याच्या मुलास म्हणजे रामसिंगास जे पत्र लिहले त्यातच हे वरील दिलेले वाक्य आहे. यात आपण सर्व हिंदू राजांनी एकत्र येऊन दिल्लीपति बादशाह च्या विरुद्ध लढ़ा दिला पाहिजे असे संभाजी राजे सांगत आहेत. संभाजी राजांची स्वताच्या धर्माबद्दल जी काही धारणा आहे ती शब्दा शब्दातुन व्यक्त होते. यात संभाजी राजे म्हणतात –
” आपण हिंदू काय दुबळे, तत्वहीन झालो आहोत ? आपल्या देवालायांची मोड़ तोड़ झाली तरी स्वधर्म रक्षण करण्यास असमर्थ आहोत,धर्माचरण शुन्य आहोत अशी त्या यवन बादशाहची समजूत झाली आहे. अश्या वेळी आपण एक होऊन त्या यवनाला तुरुंगात डांबले पाहिजे. देवालय स्थापन करुन धर्माचे रक्षण केले पाहिजे ”

पचेल का हे आताच्या फेक्युलर लोकांना ? की ह्याला पण खोटा इतिहास बोलणार ? कारण यात हिंदू हा शब्द आला आहे.

Sambhaji Raje

 

%d bloggers like this: