फेब्रुवारी 18, 2016
by Pranav
जेधे शकावली ही श्री सर्जेराव उर्फ दाजीसाहेब जेधे यांच्याकडून लोकमान्य टिळकांना मिळाली होती. त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळात श्री पटवर्धन यांना भेटून त्यातील मित्या तपासून घेतल्या. शकावली उभ्या अरुंद पोर्तुगीज कागदावर लिहिली गेली आहे. २२ पूर्ण आणि तेविसावे अपूर्ण पान मुळ प्रतीत पाहायला मिळते. औरंजेबाच्या जन्मापासून ते मोगलांनी चंदी उर्फ जिंजी ताब्यात घेण्यापर्यंतच्या नोंदी शकावलीत आढळतात. लेखनाच्या शैलीवरून टिळकांनी शकावलीची प्रत पूर्व पेशवाईत तयार झाली असावी असा अंदाज केला होता. इतिहासाचार्य राजवाडे यांनी मराठांच्या इतिहासाची साधने खंड १८ (जुना) मध्ये लेखांक ५ म्हणून छापलेल्या शकावलीच्या नोंदी आणि प्रस्तुत शकावलीच्या नोंदी जुळतात. शकावलीने उजेडात आणलेल्या अनेक महत्वाच्या गोष्टींपैकी शिवजन्माची मिती, अफजल वधा संबंधी अधिक माहिती आणि पोवाड्याचे शेवटचे चरण, नेतोजी पालकर यांचे धर्मांतर आणि शुद्धी या महत्वाच्या म्हणाव्या लागतील. भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रसिद्ध केलेल्या शिवचरित्रप्रदीप या पुस्तकात शकावली समाविष्ट केली होती. सदर पुस्तक डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया च्या विद्यमाने आज इंटरनेटवर उपलब्ध आहे.
Download Link : जेधे शकावली
Like this:
Like Loading...