शहाजीराजांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नात जिजाबाईंनीही अतिशय मोलाची साथ दिली होती. आपल्या अनुभवसिद्ध पत्नीच्या हाती आपल्या तेजस्वी पुत्राला सोपवून शहाजीराजांनी आपल्या स्वतंत्रराज्याची कल्पना आपल्या पुत्रा करवी साकार करून घेतली. राजमाता जिजाऊ ह्यांचा कारभार, त्यांची पत्रे हयातून होणारे व्यक्तिमत्त्वाचे दर्शन ह्यावर आपला आजचा व्हिडिओ. नक्की पहा.
Jijamata’s letter to officers in YerwadaSeal of JijamataLetter to Vithoji HaibatravLetter of Shivaji Maharaj Overturning a decision which was based on Jijamata’s letterJijamata warning Mukund Deshkulkarni referring to Chiranjeev – Possibly Shivaji Maharaj
१६८९ साली मुघलांनी रायगड घेतला. त्या नंतर रायगडावर किल्लेदार कोण होते? औरंगजेबाने २००० सैनिक रायगडावर पाठवले त्यातले किती नेमके पोचले? जाणून घेऊया मंथनच्या आजच्या भागात.
लाल महाल आणि शनिवार वाडा या दोन्ही वास्तू मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. आज अपरिचित इतिहास या मालिकेत जाणून घेऊया शनिवार वाडा आणि लाल महाल या विषयीच्या उपलब्ध नोंदी.
इतिहासाचा अभ्यास हा पत्रांवरून करावा. ही समकालीन पत्रे म्हणजे इतिहासाचा आरसा. पत्रावरून अभ्यास करताना बरीचशी अपरिचित माहिती समोर येते.
रोहीड खोऱ्याचे सर्जेराव जेधे यांना लिहिलेल्या या पत्रातून छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचा राजा किंवा जाणता राजा हे रूप प्रकर्षाने जाणवते. शत्रू मुळे आपली रयत धोक्यात आहे हे ओळखून महाराजांनी लिहिलेले हे पत्र आहे.
सध्या आत्म-निर्भरतेचे वारे वाहू लागलेत. संपूर्ण देशात स्वयं सिद्धता आणि स्वदेशी वरून वाद-प्रतिवाद सुरु झालेत. हे सगळे सुरू असताना, स्वराज्याची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील स्वदेशी मालाचा पुरस्कार केला होता हे तुम्हाला ठाऊक आहे का? अपरिचित इतिहास या मालिकेत आज पाहूया स्वराज्याच्या मीठाची गोष्ट.
थोडकी उंची, ताठ बांधेसूद शरीर, चपळ, स्मित हास्य, भेदक नजर, त्यांच्या इतर सोबत्यांपेक्षा गौर वर्ण – हे वर्णन कुणाचे आहे ठाऊक आहे? हे वर्णन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे. सादर आहे अपरिचित इतिहास – भाग 28 – शिवरायांचे आठवावे रूप. शिवाजी महाराज कसे दिसायचे ह्याचा समकालीन नोंदी, चित्र हयातून आम्ही घेतलेला मागोवा.