गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज…!!!

शिवाजी महाराजांच्या ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ या बिरुदावरून कायमच वाद उत्पन्न झालेले दिसतात. अर्थात, हे वाद एकतर जातीयवादी नाहीतर राजकारणी केवळ त्यांच्या फायद्यासाठी उकरून काढत असतात हे उघड आहे. पण यामुळे, सर्वसामान्य माणसाला, ज्याला इतिहासात नेमकं काय दडलंय हे माहित नसतं तो अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणखी संभ्रमित होतो. याकरताच, शिवाजी महाराजांच्या ‘गोब्राह्मणप्रतिपालना’चे समकालीन आणि उत्तरकालीन पुरावे काय आहेत ते आपण पाहूया –

१) सगळ्यात पहिला पुरावा म्हणजे खुद्द शिवाजी महाराजांचे इ.स. १६४७-४८ मधील मोरेश्वर गोसाव्यांसंबंधी पुण्याच्या देशमुख आणि सरकारी कारकुनांना लिहिलेले एक पत्र. यात शिवाजी महाराज स्वतः म्हणतात, “महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती, गाईचा प्रतिपाळ केलिया बहुत पुण्य आहे”.
पत्राचा स्रोत : शिवचरित्रसाहित्य खंड ३, लेखांक ५३४

२) मोरेश्वर गोसाव्यांसंबंधी पुण्याच्या पुण्याच्या देशमुख आणि सरकारी कारकुनांना इ.स. १७४८-४९ मधील लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, “ब्राह्मणांकडून गुरांची पालं घेऊ नका, ती सरकारातून माफ केली आहेत”
पत्राचा स्रोत : शिवचरित्रसाहित्य खंड ३, लेखांक ५३७

३) शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेल्या कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहिलेल्या ‘शिवभारता’त महाराजांना स्पष्टपणे गाई आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा असं ठिकठिकाणी लिहिलेलं आढळेल. शिवभारताच्या पुढील श्लोकांमधून आपल्याला हे समजून येईल :

श्लोक :
देवद्विजगवां गोप्ता दुर्दान्तयवनान्तकः । प्रपन्नानां परित्राता प्रजानां प्रियकारकाः ।।१५।।
तस्यास्य चरितं ब्रह्मन्नेनकाध्यायगर्भितम् । भगवत्याः प्रसादेन भवता यत् प्रकाशितम् ।।१६।।

अर्थ : देव-ब्राह्मण आणि गाई यांचा त्राता, दुर्दम्य यवनांचा काळ, शरणागतांचा रक्षक, (जो) प्रजेचे प्रिय करणारा आहे अशा त्या शिवाजीराजांचे जे अनेकाध्यात्मक चरित्र आपण एकवीरा देवाच्या प्रसादाने प्रसिद्ध केले आहे.

श्लोक :
द्विजातीरीती तं श्रुत्वा जानानः शिवभूमीपः । अभ्येतमपि नो हन्तुमिच्छन्निजनयस्थितः ।।४८।।

अर्थ : तो (कृष्णाजी भास्कर) ब्राह्मण आहे असे ऐकून जाणत्या व नीतीने वागणाऱ्या शिवाजीराजाने त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही.

४) शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष अष्टप्रधान मंडळात असलेले रामचंद्रपंत अमात्य आपल्या “आज्ञापत्र” या अमूल्य ग्रंथात महाराजांविषयी लिहितात – “शहाण्णवकुळीचे मराठ्यांचा उध्दार केला. सिंहासनारूढ होऊन, छत्र धरून छत्रपती म्हणविलें. धर्मोद्धार करून देव-ब्राह्मण संस्थांनी स्थापून यजनयाजनादी षट्कर्मे वर्णविभागे चालविली”.

५) दि. १५ सप्टेंबर १६७८ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासस्वामींना दिलेल्या सनदेत समर्थांनी महाराजांना दिलेल्या उपदेशात “देव-ब्राह्मणांची सेवा करूनु, प्रज्येची पीडा दूर करुनु पाळण रक्षण करावे” असं सांगितल्याचं आणि आपण त्यानुसारच वागत असल्याचं खुद्द महाराज उद्धृत करतात.
स्रोत : चाफळची सनद (मूळ अप्रकाशित)

६) समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं “निश्चयाचा महामेरू” हे जे सार्थ वर्णन केलं आहे त्यात ते महाराजांसंबंधी म्हणतात, “देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण । हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ।”.

७) शिवाजी महाराजांचा समकालीन असलेला आणि खुद्द महाराजांच्या भेटीने प्रभावित झालेला, तत्कालीन महाराष्ट्र पाहिलेला उत्तरेतला महाकवी भूषण महाराजांबद्दल म्हणतो :

“शिवाजी महाराज ब्राह्मणभोजन घालत होते” (शिवभूषण छंद ६४), “धर्माच्या वेळी ब्राह्मण पाहिले की कुबेराची पहाडासारखी सुवर्णसंपत्ती लुटून दान करण्याची उर्मी शिवाजीराजांच्या मनात उत्पन्न होते” (शिवभूषण छंद ३८९)

८) शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे बुधभुषणम् मध्ये क्षत्रियांची कर्तव्य सांगताना “गो-ब्राह्मण प्रतिपालन” हे एक कर्तव्य सांगतात. संभाजीराजे म्हणतात, “वेदांचे अध्ययन करून, यज्ञ करून, प्रजेचे पालन, गो-ब्राह्मणपालन करून जो मारला गेला किंवा संग्रामात धारातीर्थी पडला तो क्षत्रिय स्वर्गास जातो”. आता हे वर्णन संभाजीराजांनी कोणाला डोळ्यासमोर ठेऊन केलं असावं बरं ?
(संदर्भ : बुधभुषणम् – संपादक : कदम, अध्याय २रा, श्लोक ५५४)

९) सभासद मालोजीराजांना झालेल्या शंभुमहादेवाच्या दृष्टांताबद्दल चर्चा करताना म्हणतो, “तुझ्या वंशात आपण अवतार घेऊ ! देव ब्राह्मणांचे संरक्षण करून म्लेंच्छांचा क्षय करतो”. आता वास्तविक हे वर्णन मालोजीराजांचा पुत्र शहाजीराजांसंबंधी आहे. पण शहाजीराजे जर “गोब्राह्मणप्रतिपालक” आहेत तर शिवाजी महाराज नसतील का ?

या सगळ्यावरून आपल्याला एक गोष्ट ठामपणे सांगता येते कि महाराज “गोब्राह्मणप्रतिपालक” नक्कीच होते. बहुत काय लिहिणे ? आपण वाचक सुज्ञ आहातच. आमचे अगत्य असू द्यावे हि विज्ञापना..

© टीम : इतिहासाच्या पाऊलखुणा
(सादर लेखाचे सर्व हक्क राखीव आहेत)

खटासी पाहिजे खट

गोवेकर फिरंगी अत्यंत कडवे धर्मप्रसारक होते.
शिवाजी महाराजांनी गोवेकर फिरंग्यांना चांगलाच धडा शिकवला होता.
महाराजांनी काय केले ह्याचे वर्णन असणारी एक डाक इंग्रजांना आली जी त्यांनी त्यांच्या रेकॉर्ड मध्ये नमूद करून ठेवली.
तीच इथे प्रस्तुत करत आहोत. हे वाचून एक पक्के समजते की ज्याला ज्या भाषेत समजते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते.


मूळ नोंद –

गोव्याच्या व्हाइसरॉयने रोमन कॅथलिक धर्म वगळून इतर धर्माच्या माणसांना हाद्दपारीचा हुकूम काढल्यामुळे क्रुद्ध होऊन शिवाजीने गोव्यानजीक बारदेशच्या हद्दीवर स्वारी केली.
तेथील चार पाद्री लोकांनी स्वधर्मीयांव्यतिरिक्त इतरांचा प्राणनाश करण्याचा सल्ला दिला होता.
हे लक्षात ठेवून त्यांनी स्वतः शिवाजीचा हिंदू धर्म नाकारल्यामुळे शिवाजीने त्यांचा शिरच्छेद केला, त्यामुळे घाबरून जाऊन व्हाइसरॉय ने आपला क्रूर व कडक हुकूम परत घेतला.
शिवाजी ने आसपासच्या सर्व मुलखात जाळपोळ करून १५० लक्ष होनांची लूट केली.

गोव्यासंबंधी इंग्रजांना आलेली डाक

गोव्यासंबंधी इंग्रजांना आलेली डाक

संदर्भ – शि.प.सा.सं

http://www.marathahistory.com
http://www.youtube.com/marathahistory

 

‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण

%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%b0

विद्याचरण पुरंदरे यांनी अनुवाद केलेले ‘समरधुरंधर‘ हे राफ्टर पब्लिकेशन्सचे १४ वे पुस्तक इतिहासप्रेमी वाचक व अभ्यासकांच्या चरणी अर्पण. २९ जानेवारी २०१७ रोजी पुणे येथे ‘पत्रकार भवन’ येथे प्रकाशन सोहळा पार पडला. या प्रसंगी डॉ सचिन जोशी, डॉ सदाशिव शिवदे, श्रीमती वासंती निनाद बेडेकर आणि पांडुरंग बलकवडे हे मान्यवर उपस्थित होते. तसेच मुल इंग्रजी पुस्तकाचे लेखक डॉ केदार फाळके हे देखील उपस्थित होते. या प्रसंगी सर्वांनी उपस्थित रसिकांना मार्गदर्शन केले तसेच ‘राफ्टर पब्लिकेशन्स’ च्या या पुस्तकाचे भरपूर कौतुकही केले. पुस्तक प्रमुख पुस्तक विक्रेते तथा online उपलब्ध आहे.

पुस्तक online खरेदी करण्याकरिता खालील link वर click करा

Amazon – http://amzn.to/2jwHqCb

Sahyadri Books – http://bit.ly/2kX1l9T

Book Ganga – http://www.bookganga.com/R/7H14C

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे वतनाविषयी धोरण

छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यातील वतानाबद्दल भूमिका खूप ठाम होती. ज्याचा हक्क सिद्ध होईल त्यालाच तो हक्क मिळाला पाहिजे ही महाराजांची नेहमीच भूमिका होती.
असाच एक निवडा करताना शिवाजी महाराज म्हणतात “स्वामी धाकुटपणा पासून या देशात आहेत. मिरासदार कोण व गैर मिरासदार कोण हे जाणताती व माणसाचे माणूस ओळखतात”.
महाराज स्वतः जातीने निवाड्यात कसे लक्ष घालत हे या पत्रावरून सिद्ध होते.

शिवाजी राजांचे वतन विषयक पत्र

शिवाजी राजांचे वतन विषयक पत्र

Unexplored History – Episode 3 – Peshwas of the Maratha Kingdom

Dear Readers,

Thank you for the great response that was provided to our previous English video release.

Here is our Third video of the series based on Peshwas of the Maratha Kingdom.

Again, If you haven’t subscribed to our YouTube channel, now is the best time to do so:)

Thanks & Stay Excited.

Pranav – Umesh – Vishal

शिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र

शिवाजी राजांचा सगळ्यात उत्तम गुण कुठला? तर ते लोकनेते होते. प्रत्येक माणसाला त्यांनी आपलेसे करून त्याच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले. शिवाजी महाराज आणि बारा मावळाचे देशमुख कान्होजी जेधे यांचे संबंध किती दृढ होते हे खालील पत्र वाचल्या नंतर समजून येते. यात शिवाजी महाराज म्हणतात “पहिले पासून तुम्हा आम्हात घरोबा आहे” सदर पत्र हे कान्होजी जेधे आजारी आसल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना पाठवले होते.

शिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र

शिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र

अपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र

नमस्कार,

छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे होते, रयतेचे राजे होते. गरीब शेतकऱ्यांना, रयतेला सैनिकांकडून जराही त्रास होऊ नये यासाठी शिवाजी महाराज किती दक्ष होते हे या पत्रातून दिसते. हे पत्र शके १५९३, वैशाख पौर्णिमा, इंग्रजी तारीख १९ मे १६७३ रोजी लिहिले गेले आहे. महाराजांनी लोककल्याणासाठी हे राज्य स्थापन केले होते, त्यामध्ये लोकांची, रयतेची, आपल्या स्वजनांची किती आस्थेने काळजी महाराज घेत असत हे या पत्रातून दिसते.

 

आपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का?
आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.
आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !

आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!

धन्यवाद.

अपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज

इतिहास प्रेमी रसिकहो !

नमस्कार,

YouTube वरील आमच्या Channel च्या माध्यमातून आम्ही नवीन पिढीसमोर इतिहास नव्याने मांडण्याचा प्रयत्न करतोय.
प्रस्तुत आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे अज्ञात १० पैलू.

आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !

आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!

धन्यवाद.

यस्याश्वा तस्य राज्यं ।

यस्याश्वा तस्य राज्यं ।

यस्याश्वा तस्य राज्यं ।

मध्ययुगीन इतिहासात घोड्यांना अनन्य साधारण महत्व होते. घोड्यांची निगा राखणे, उत्तम जातिवंत घोडी खरेदी करणे हा रोजच्या राजकारणातील एक अविभाज्य घटक होता. खुद्द शिवाजी राजे आपल्या घोड्यांच्या पागेत जाऊन रोज एक श्लोक म्हणत असत असे ९१ कलमी बखरीत नोंद केलेले आहे. –

यस्याश्वा तस्य राज्यं ।
यस्याश्वा तस्य मेदिनी ।
यस्याश्वा तस्य सौख्यं ।
यस्याश्वा तस्य सामराज्यं ।।

एकदा सरसेनापती हंबीरराव यांनी कनकगिरीच्या पाळेगाराकडून  काही शिंगर विकत घेतली होती. वळीवाच्या पावसात ती भिजली. महाराजांना ही बातमी समजताच त्यांनी मुजुमदार अनाजी मलकरे आणि हंबीरराव यांची चांगलीच फजिती केली होती. मुजुमदारांना १२५ होन जमा करायला सांगितले आणि पुढे याच शिंगरांची काळजी घ्यावी आणि त्यावर पागेचा डाग द्यावा म्हणून त्यांनी हुकूमही केला होता.

पानिपतच्या लढाईपूर्वी तमासा नावाच्या संसर्गजन्य रोगाने १० हजार घोडी मृत्युमुखी पडली होती. आजच्या प्रस्तुत नोंदी ह्या पेशवे काळातील यादी असून त्यातून घोड्यांच्या तसेच इतर जनावरांच्या आजारावर कसा इलाज केला जात असे याचे उल्लेख आहेत. उंट माती खाऊ लागल्यास काय करावे, गाई, घोड्याचे पाय मोडल्यास त्याचा इलाज, म्हशीच्या शिंगांचा औषधी उपयोग अश्या अनेक चमत्कारिक नोंदी तुळशीबागवाले दफ्तरात सापडल्या.

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

राजकीय इतिहासाच्या चर्चेत या व्यावहारिक नोंदी इतिहासात कुठेतरी हरवून जातात. त्याच लोकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न.

अभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे”

” महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे ” हे वाक्य समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांसाठी पत्रात लिहले. मनात एक सहज विचार आला महाराष्ट्र शब्द शिवकाळात अजून कुठे मिळतोय का ते पाहूया.योगायोगाने आज शिवकाळातील सर्वात विश्वसनीय मानले जाणारे साधन म्हणजे “शिवभारत” यातील चौथ्या अध्याया मधे महाराष्ट्र हा उल्लेख आज वाचताना मिळाला तो  देत आहे.

image

%d bloggers like this: