अभ्यास शिवभारताचा – ५ – “महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे”

” महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हाकारणे ” हे वाक्य समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांसाठी पत्रात लिहले. मनात एक सहज विचार आला महाराष्ट्र शब्द शिवकाळात अजून कुठे मिळतोय का ते पाहूया.योगायोगाने आज शिवकाळातील सर्वात विश्वसनीय मानले जाणारे साधन म्हणजे “शिवभारत” यातील चौथ्या अध्याया मधे महाराष्ट्र हा उल्लेख आज वाचताना मिळाला तो  देत आहे.

image

श्री शिवभारत

शिवभारत अथवा अनुपुरण अथवा सुर्यवंश नावाचा हा ग्रंथ शिवचरित्राच्या अभ्यासाकरिता अत्यंत महत्वपूर्ण आहे. रचयिता कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर हा शिवसमकालीन असून राजापूर येथे झालेल्या एका महत्वाच्या धर्मपरिषदेत गागाभट्टसह इतर प्रमुख पंडितात कविन्द्रांच्या नावाचा उल्लेख आहे. आग्रा भेटी दरम्यानही कवींद्र उपस्थित असल्याची नोंद आहे. ग्रंथात कालानुरूप शेवटची आलेली ऐतिहासिक नोंद म्हणजे सिद्दी जौहरचा मृत्यू म्हणजे आज उपलब्ध असलेला ग्रंथ हा त्या घटनेच्या आस पास पूर्ण झाला. पूर्ण म्हणताना अयोग्य ठरेल कारण ग्रंथ अपूर्ण आहे असे दिसते.  ३१ अध्याय पूर्ण असून ३२व्या अध्यायात ९ श्लोक आहेत. पुढील ग्रंथ पूर्ण झाला की अपूर्ण राहिला की रचनाकर्त्याचा जीवनकाळ संपला हे पुराव्या अभावे सांगणे अवघड आहे. तर असा हा सर्वोपयोगी ग्रंथ आज इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे. सर्वांकरिता सादर.

|| श्रीशिवभारत || – समकालीन – कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर

अभ्यास शिवभारताचा – ३ – शिवाजीराजांच्या बाल लीला

कवींद्र परमानंद गोविंद नेवासकरांनी शिवाजीराजांच्या बाल लीला अतिशय सुंदर शब्दबद्ध केल्या आहेत. शिवाजी राजे लहान पणी मातीची उंच शिखरे बनवून घेत असत आणि आपल्या सवंगड्याना म्हणत असत हे “हे गड माझे आहेत”. ह्या सारख्या अनेक बाल-लीला आहेत ज्या वाचून इतिहास प्रेमी रसिकांना सुमारे ३८० वर्षापूर्वीच्या बाळ लीलांचा अनुभव येईल.

शिवभारत - शिवरायांच्या बाल लीला

शिवभारत – शिवरायांच्या बाल लीला

अभ्यास शिवभारताचा – १ – ‘गोब्राम्हणप्रतिपालक’

शिवभारत हे शिवाजी महाराजांच्याच पदरी असणारया कवींद्र परमानंद गोवीन्द नेवासकर याने रचलेले महाकाव्य आहे.

। चरितं शिवराजस्य भरतस्येव भारतम ।

अशी समर्पक व्याख्या देत त्याने चरित्राला सुरुवात केली आहे, अर्थ काय तर जसे व्यासांनी “महाभारत” रचून भरत वंशाच्या राजांची कहाणी मांडली तशीच योजना मनी बांधून कविन्द्रांना शिवाजी महाराजांचे चरित्र “शिवभारत” रुपात लिहावयाचे होते. या सदरात आपण याच बहुमोल ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. रचना समकालीन असल्याने त्याचे महत्व अमोल आहे. या ग्रंथातील अनेक नोंदी, वर्णने आणि प्रसंग आपण या सदरात अभ्यासणार आहोत.

सुरुवात करूया एका वादग्रस्त विशेषणाने – “गोब्राम्हणप्रतिपालक”

आजकाल ब्राम्हणांना शिव्या देणे म्हणजे Fashion झाली आहे, त्यामुळेच गोब्राम्हणप्रतिपालक हे विशेषण शिवछत्रपतींना कुणी लावले जर काही विघ्न संतोषी लोक आगपाखड करतात. शिवाजी राजे हे शिवाजी राजे होते, ती तुमच्या आमच्या सारखी सामान्य व्यक्ती नव्हती. जनतेचा प्रतिपाळ करणारा तो एक प्रजापालक राजा होता. त्याच्या रयतेत सर्व सामील होते. ब्राम्हण एका गावात हाकलून देवून आणि ते गाव स्वराज्याच्या सीमेबाहेर ढकलून त्यांनी राज्य केलेले नाही. एरवी शिवभारत हा समकालीन आधार मानणारे स्वयंघोषित इतिहासकार आणि जिज्ञासू मात्र त्यातच असणारया ह्या विशेषणाकडे संपूर्ण दुर्लक्ष कसे करू शकतात ?

तर हा आहे स्पष्ट आणि समकालीन शिवाजी राजे यांचा गोब्राम्हणप्रतिपालक असलेला उल्लेख –

शिवभारत - गोब्राम्हणप्रतिपालक

शिवभारत – गोब्राम्हणप्रतिपालक

उल्लेख पहिल्या अध्यायात १५ व्या श्लोकात असून, काशीनिवासी श्रोते मंडळी हे कविन्द्रांना विनवणी करताना शिवाजीराजांना जी विशेषणे वापरतात त्याची इथे नोंद घ्यायची आहे. इथे ब्राम्हण या जातीचा उदो उदो नसून सत्य ते मांडण्याचा हेतू आहे ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी. कारण पुढे चुकल्यावर जिवाजी विनायकाला ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो? असा करडा सवाल करणारे सुद्धा हेच शिवछत्रपति होते. तेव्हा जातीच्या रकान्यात ह्या राजाला न अडकवता एखाद्या आई प्रमाणे प्रजेची काळजी, सांभाळ आणि वेळी कान-उघडणी करणारा व्यक्ती म्हणून पाहणे महत्वाचे आहे.

बहुत काय लिहिणे, तरी आपण सुज्ञ असा !

%d bloggers like this: