खरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली

खरे जंत्री - संपूर्ण शिवकालीन शकावली

खरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली

ऐतिहासिक घटनांचे कालमान ठरवण्याकडे सगळ्याच अभ्यासकांचे लक्ष लागलेले असते. अश्या वेळी पूर्वीचे कागद वाचताना त्यातून चंद्र, वार, शुहूर, फसली, हिजरी सन व त्याचे शालिवाहन किंवा राज्याभिषेक शकात रुपांतर तसेच तिथी किंवा इसवी सनातील तारखा यांचा मेळ लावणे हे वेळखाऊ काम आहे. कै. श्री. ग. स. खरे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळात तयार केलेली ही शकावली म्हणजे शिवकाळाची शक-तारीख-वार यांची जंत्री आहे. प्रंचंड कष्ट घेऊन तयार करण्यात आलेली ही शकावली शके १५५१ ते १६४९ (इ.स. १६२९-१७२८) पर्यंतच्या कालगणने करिता अत्यंत उपयोगी आहे. शिवकालीन प्रसंगांचा कालनिर्णय करण्यास हे एक उत्तम साधन आहे. अशीच शकावली पेशवे काळावर बनवणे ही देखील आता काळाची गरज आहे.

सदर शकावली आज इंटरनेटवर उपलब्ध आहे.

जंत्री मिळवण्याचा दुवा : खरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली 

जेधे शकावली

जेधे शकावली ही श्री सर्जेराव उर्फ दाजीसाहेब जेधे यांच्याकडून लोकमान्य टिळकांना मिळाली होती. त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळात श्री पटवर्धन यांना भेटून त्यातील मित्या तपासून घेतल्या. शकावली उभ्या अरुंद पोर्तुगीज कागदावर लिहिली गेली आहे. २२ पूर्ण आणि तेविसावे अपूर्ण पान मुळ प्रतीत पाहायला मिळते. औरंजेबाच्या जन्मापासून ते मोगलांनी चंदी उर्फ जिंजी ताब्यात घेण्यापर्यंतच्या नोंदी शकावलीत आढळतात. लेखनाच्या शैलीवरून टिळकांनी शकावलीची प्रत पूर्व पेशवाईत तयार झाली असावी असा अंदाज केला होता. इतिहासाचार्य राजवाडे यांनी मराठांच्या इतिहासाची साधने खंड १८ (जुना) मध्ये लेखांक ५ म्हणून छापलेल्या शकावलीच्या नोंदी आणि प्रस्तुत शकावलीच्या नोंदी जुळतात. शकावलीने उजेडात आणलेल्या अनेक महत्वाच्या गोष्टींपैकी शिवजन्माची मिती, अफजल वधा संबंधी अधिक माहिती आणि पोवाड्याचे शेवटचे चरण, नेतोजी पालकर यांचे धर्मांतर आणि शुद्धी या महत्वाच्या म्हणाव्या लागतील. भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रसिद्ध केलेल्या शिवचरित्रप्रदीप या पुस्तकात शकावली समाविष्ट केली होती. सदर पुस्तक डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया च्या विद्यमाने आज इंटरनेटवर उपलब्ध आहे.

Download Link : जेधे शकावली

श्री शिवभारत

शिवभारत अथवा अनुपुरण अथवा सुर्यवंश नावाचा हा ग्रंथ शिवचरित्राच्या अभ्यासाकरिता अत्यंत महत्वपूर्ण आहे. रचयिता कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर हा शिवसमकालीन असून राजापूर येथे झालेल्या एका महत्वाच्या धर्मपरिषदेत गागाभट्टसह इतर प्रमुख पंडितात कविन्द्रांच्या नावाचा उल्लेख आहे. आग्रा भेटी दरम्यानही कवींद्र उपस्थित असल्याची नोंद आहे. ग्रंथात कालानुरूप शेवटची आलेली ऐतिहासिक नोंद म्हणजे सिद्दी जौहरचा मृत्यू म्हणजे आज उपलब्ध असलेला ग्रंथ हा त्या घटनेच्या आस पास पूर्ण झाला. पूर्ण म्हणताना अयोग्य ठरेल कारण ग्रंथ अपूर्ण आहे असे दिसते.  ३१ अध्याय पूर्ण असून ३२व्या अध्यायात ९ श्लोक आहेत. पुढील ग्रंथ पूर्ण झाला की अपूर्ण राहिला की रचनाकर्त्याचा जीवनकाळ संपला हे पुराव्या अभावे सांगणे अवघड आहे. तर असा हा सर्वोपयोगी ग्रंथ आज इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे. सर्वांकरिता सादर.

|| श्रीशिवभारत || – समकालीन – कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर

%d bloggers like this: