गडाच्या माचीवर ….


|| श्रीगजवदनवरद ||

नमस्कार वाचकहो ,

इतिहास … म्हणजे पाचवा वेद , ज्ञानाचा अखंड स्रोत !

महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला नेहमीच खुणावत आलाय त्यात मध्ययुग म्हणजे ‘स्व’त्वाच्या जाणीवेची आणि मग पराक्रमाची एक उत्तुंग ध्वजा, अश्या या गौरवशाली इतिहासातील सत्य उकलण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न .

इतिहासातील एखाद्या घटनेबद्दल बद्दल शंका अथवा त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याची जिज्ञासा ही प्रत्येक इतिहासप्रेमीला असते. त्यातूनच त्याला सत्याचा मागोवा घेण्याचा ध्यास लागतो. या प्रवासादरम्यान अभ्यासक अधिकाधिक माहिती मिळवू लागतो, पुरावे तपासू लागतो. त्यात त्याला पुराव्यांचे महत्व आणि प्रकार कळतात. त्यातला समकालीन, अस्सल आणि निष्पक्ष (एकतर्फी नसणारा) पुरावा मिळाला की अभ्यासकाची जिज्ञासा शांत होते. कारण त्याला हवे असलेले उत्तर आता मिळालेले असते. आमचाही प्रवास असाच सुरु झाला होता आणि अव्याहत सुरु आहे. तेव्हा पुराव्यांना अपार महत्व आहे. ते मिळवण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी हवी. इतिहास संशोधन ही फार मोठी गोष्ट आहे. उचलला टाक आणि खरडले मत इतके ते सोपे नाही. इतिहास संशोधन हे तर फार दूर पण ज्यांना इतिहासाचा नुसता अभ्यास करण्याची प्रामाणिक इच्छा असेल त्यांनी प्रा. ग. ह. खरे लिखित संशोधकाचा मित्र आणि श्री. वा. सी. बेंद्रे लिखित ‘साधन चिकित्सा‘ ही पुस्तके प्रथम वाचावी आणि अभ्यासाचा श्री गणेश करावा. 

हा लेखन प्रपंच मांडण्यामागचा हेतू, कारण आणि कळकळ इतकीच की एखादी घटना सत्य मानायला आपल्याकडे पुरावा / संदर्भ / साधने / Contemporary Evidences काय आहेत हे समजावे. त्यांचे महत्व समजावे आणि त्यातून सत्य समोर यावे. 

अनेक वाचक जेव्हा एखाद्या कादंबरीला सत्य समजून  वाद घालू लागतात तेव्हा अगोदर त्यांना समजवावेसे वाटते, आणि तरीही भावनांच्या आहारी जाऊन जर कुणी पुरावे डावलू लागले तर कीव येते कारण आता अभ्यासकाचा इतिहासातील सत्य जाणण्याचा हेतू कुठेतरी खूप मागे राहून गेलेला असतो. 

आपले उदंड प्रेम आणि प्रतिसाद लाभत आहे याबद्दल आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

नम्र निवेदन –

  • ह्या ब्लॉगवर नोंदीत असणाऱ्या १७५२ पूर्वीच्या सर्व इंग्रजी तारखा ह्या जुलियन कॅलेंडर (जुन्या पद्धती) प्रमाणे  आहेत. जिथे ग्रेगोरीअन कॅलेंडर प्रमाणे तारीख अपेक्षित आहे तिथे तसे खास लिहिले जाईल. १७५२ नंतरच्या घटनांसाठी दिलेल्या तारखा ग्रेगोरिअन (नविन पद्धती) प्रमाणे आहेत. शक नोंदी राज्याभिषेक शक किंवा विशेष उल्लेख नसल्यास शालिवाहन शकातील आहेत.
  • ब्लॉगला भेट द्या, वाचा, ज्ञान वाढवा, आपल्या प्रतिक्रिया द्या, इतरांना सांगा, RSS Feeds घ्या परंतु कुठलाही लेख उतरवून घेण्यास अथवा इतर कुठेही पुनर्प्रकाशित करण्यास लेखकांची पूर्व लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. संकेत स्थळावरील सर्व साहित्य, लेख, छायाचित्रे, नकाशे, मोडी पत्रे, लिप्यंतरे ह्यांचे हक्क राखीव आहेत. केवळ आमचा नामोनिर्देश करून ते वापरू नयेत. लेखक / प्रकाशकांच्या परवानगी शिवाय ते वापरता येणार नाहीत. तसे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई आपल्यावर होऊ शकते.
  • लेखांमधील चित्रे, नकाशे व फोटो ह्यांचे संपूर्ण हक्क राखीव आहेत – इतिहास अभ्यासक, चित्रकार व फोटोग्राफर ह्यांचे ते आहेत व मैत्रीखातर त्यांनी ते आम्हाला वापरण्याची अनुमती दिली आहे.
  • लेखातील माहिती संदर्भात कोणतीही शंका किंवा कोणतीही सूचना असेल, तर त्या लेखाच्या लेखकाशी कृपया खालील e-mail id वर संपर्क साधावा.
  • संपर्क : padmadurg@gmail.com

बहुत काय लिहिणे ?   तरी आपण सुज्ञ आहात.

गूढ, रम्य इतिहासातील आपल्या प्रवासास अनेकविध शुभेच्छा. आपण देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल पुनःश्च आभार !!

दुरितांचे तिमिर जावो | विश्व ‘स्वधर्मसूर्ये’ पाहो | जो जे वांच्छील तो ते लाहो | प्राणिजात ||

अमुचे अगत्य असो द्यावे !

 – सेवेसी विज्ञापना    –


 

इतिहासावर आधारित आमची पुस्तके राफ्टर पब्लिकेशन्सने  नुकतीच प्रकाशित केली. ही पुस्तके मुखपृष्ठावर क्लिक करून online मागवू शकाल.

इतिहासाच्या पाऊलखुणा - भाग १
इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग १
इतिहासाच्या पाऊलखुणा - भाग २
इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग २

 

© Unauthorized use and/or duplication of any material on this blog / website without a prior written permission from this site’s author and/or owner is punishable under the copyright law.

Excerpts and links may be used, provided that full and clear credit is given to the concerned Author at- https://youtube.com/MarathaHistory, https://raigad.wordpress.com and http://www.marathahistory.com with appropriate and specific direction to the original content.