खुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन

गज़िउद्दिनखान फिरोजजंग

गज़िउद्दिनखान फिरोजजंग

 

रामशेजच्या किल्ल्यावर चालून येणारा गाझीउद्दिन खान बहादूर हा मराठ्यांच्या इतिहासाला चांगलाच परिचित आहे. ह्यानेच दिल्लीला पूर्वी मदरसा सुरु केला होता. रामशेजला मराठ्यांकडून धोंडे खाऊन त्रस्त झालेला हा सरदार पुढे हैदराबाद, अथणी, बंगलोर, असा फिरत फिरत साताऱ्याला नामजद झाला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी त्याची छावणी होती. साताऱ्याचा किल्ला घेण्याकरता तो दिवसेंदिवस पुढे सरकत होता. ह्या दरम्यान एक घटना घडली जी तत्कालीन मुघल इतिहासकार ईश्वरदास नागर याने नमूद करून ठेवली आहे.

ईश्वरदास लिहितो –

एक दिवस गज़िउद्दिन आपल्या तंबू मध्ये पोशाख चढवून बसला होता. त्याच्या हातात आरसा होता. आपले सुंदर रुपडे तो न्याहाळत होता. त्याच्या आजू बाजूला त्याचे खुशमस्करे होते जे त्याची स्तुती करत होते. स्तुती करताना त्यातील एक जण अनावधानाने म्हणाला –

सरदार आपले सौंदर्य आणि आपला पराक्रम इतका उजवा आहे की आपणच खरे सिंहासनाची शोभा आहात. आपणच ते सजवायला हवे (त्यावर बसून). त्यावर खान फ़क़्त ईश्वरइच्छा असेल तर तसे होईल इतकेच हसत म्हणाला.

तिथे त्याची आई देखील होती. तिने सारवासाराव करण्यासाठी – सिंहासन केवळ तैमुर वंशासाठी आहे आणि आपण त्याचे सेवक आहोत तेव्हा असे विचार करू नये असे प्रगटपणे सांगितले.

तिथे उभे असलेल्या एका हरकाऱ्याने हे ऐकले आणि बादशह औरंगजेबाला कळवले. औरंगजेबाला राग आला होता पण तूर्त त्याने तो गिळला. काही महिने गेले. एके दिवशी गज़िउद्दिन आजारी पडला. त्याचे डोके भयंकर दुखत होते. त्याच्या ह्या डोकेदुखीची बातमी औरंगजेबाला समजली. औरंगजेबचा खास हकीम फात खान याला पाचारण करण्यात आले. बादशाहने त्याला निरोप दिला की –

आमच्यावतीने आपण जाऊन गज़िउद्दिनची ख्याली खुशाली विचारावी आणि त्याचा योग्य तो इलाज करावा. त्याचे रूप तसेच राहो याची काळजी घ्यावी.

हकीम जे समजायचे ते समजला आणि गज़िउद्दिनच्या छावणीत पोचला. ख्याली खुशाली विचारून त्याने गज़िउद्दिनला औषध दिले. औषधाने गुण काही येईना म्हणून गज़िउद्दिन पुन्हा हकीमाची मदत मागू लागला. अखेर हकीमाने आपला डाव साधला.

गज़िउद्दिनखान फिरोजजंग याची कबर

गज़िउद्दिनखान फिरोजजंग याची कबर

अत्यंत क्रूरतेने त्याने गज़िउद्दिनच्या कपाळातील सगळे रक्त शोषून काढले. हा एकाच आपल्या डोकेदुखीवर जालीम उपाय आहे असे सांगून त्याने आपले काम सुरु ठेवले. ह्या उद्योगात गज़िउद्दिनची दृष्टी गेली आणि तो कायमचा अंधळा झाला. त्याची तब्येत ढासळू लागली. हकीम त्वरेने तिथून निसटला आणि बादशाहकडे आला. झाला वृत्तांत त्याने औरंगजेबाला सांगितला. पुढे औरंगजेबाने हेर पाठवून बातमीची खात्री करवून घेतली. खात्री पटल्यावर त्याने शाहजादा आझम याला पाठवून गज़िउद्दिनची मुद्दाम विचारपूस करवली आणि त्याचा मुलगा चीन किलीज खान याची बापाच्या जागी नियुक्ती केली. पुढे अंधत्व आलेला गज़िउद्दिन रोगराईत मारला गेला.

औरंगजेब किती धूर्त आणि खुनशी होता हे असल्या अनेक बारीक सारीक उदाहरणातून इतिहासातून डोकावते.

7 Responses to खुनशी औरंगजेब आणि गज़िउद्दिन

  1. Omkar Raparti says:

    I watch your Historic videos on YouTube channel. It is admirable.
    But I would request to you to make Animation Videos on Strategic War plans of Shivaji Maharaj while facing warlike situations. PLEASE PLEASE.

    Like

  2. Onkar chougule says:

    दादा जय शिवराय
    संभाजी महाराज्यंच्या मृत्यू बद्दल चुकीचा संदेश फिरत आहे
    तरी आपण त्यावर संदर्भा सहित उजेडात आणावे
    आपला ब्लॉग वाचक
    ओंकार चौगुले ……

    Like

  3. shashioak says:

    नमस्कार, प्रणव वर एक चित्र आहे. ते गाझीच्या मजार चे आहे असे मानले तर गाझी जो अंधळा, सत्ताहीन व रोगराई ग्रस्त होता त्याच्याकडे मृत्यू नंतर इतकी संपत्ती आणि सत्ता कशी?

    Like

  4. गजानन बंडे says:

    वरील लिखाणाला पुरावा काय ?

    Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: