संभाजी महाराज – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ?

संभाजी राजे – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ?

संभाजी राजांनी मिर्झा राजा जयसिंग याच्या मुलास म्हणजे रामसिंगास जे पत्र लिहले त्यातच हे वरील दिलेले वाक्य आहे. यात आपण सर्व हिंदू राजांनी एकत्र येऊन दिल्लीपति बादशाह च्या विरुद्ध लढ़ा दिला पाहिजे असे संभाजी राजे सांगत आहेत. संभाजी राजांची स्वताच्या धर्माबद्दल जी काही धारणा आहे ती शब्दा शब्दातुन व्यक्त होते. यात संभाजी राजे म्हणतात –
” आपण हिंदू काय दुबळे, तत्वहीन झालो आहोत ? आपल्या देवालायांची मोड़ तोड़ झाली तरी स्वधर्म रक्षण करण्यास असमर्थ आहोत,धर्माचरण शुन्य आहोत अशी त्या यवन बादशाहची समजूत झाली आहे. अश्या वेळी आपण एक होऊन त्या यवनाला तुरुंगात डांबले पाहिजे. देवालय स्थापन करुन धर्माचे रक्षण केले पाहिजे ”

पचेल का हे आताच्या फेक्युलर लोकांना ? की ह्याला पण खोटा इतिहास बोलणार ? कारण यात हिंदू हा शब्द आला आहे.

Sambhaji Raje

 

6 Responses to संभाजी महाराज – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ?

  1. अमृतेश सराफ says:

    मला संभाजी महाराजांविषयी विशेष आवड निर्माण झाली आहे.संभाजी महाराजांविषयी
    १) छत्रपती संभाजी महाराज – वा.सी.बेंद्रे
    २)शिवपुत्र संभाजी – डॉक्टर कमला गोखले
    हे उत्तम ग्रंथ आहेत. ह्यापैकी सर्वोत्तम ग्रंथ कोणता ?
    ग्रंथ हा शुद्ध इतिहास हवा ; कथा ,कादंबरी नको. तसेच भाषाही वाचनीय हवी.( हे ग्रंथ मुंबईत कुठे मिळतील याची कल्पना आहे का ? असल्यास कृपया त्या बाबत माहिती द्यावी )
    आपल्या ब्लाॅगचा चाहता,
    अमृतेश सराफ.

    Like

    • Umesh Joshi says:

      नमस्कार अमृतेश सराफ साहेब…
      वा.सी.बेंद्रे तसेच डॉ.कमल गोखले हे अतिशय गाढे अभ्यासक होते. त्यामुळे त्यांच्या दोन ग्रंथांमधील सर्वोत्तम ग्रंथ कोणता?? हे सांगणे केवळ अशक्य….. दोन्ही उत्तम संदर्भ ग्रंथ आहेत. मुंबईत उपलब्ध आहेत. आपणास संभाजी महाराजांविषयी आवड निर्माण झाली आहे हे कौतुकास्पद आहे…..संभाजी महाराजांवरच्या अनेक कादंबऱ्या उपलब्ध आहेत….परंतु खऱ्या इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर नक्कीच संदर्भ ग्रंथ अभ्यासलेले उत्तम……. वरील दोन ग्रंथांबरोबरच डॉ.सदाशिव शिवदे यांचा छत्रपती संभाजी राजेंवर लिहिलेला “ज्वलज्वलंतेजस संभाजी” हा संदर्भ ग्रंथ जरूर वाचा….अतिशय वाचनीय संदर्भ ग्रंथ आहे. संभाजी महाराजांवरील उपलब्ध ग्रंथामधला एक अतिशय उत्कृष्ठ ग्रंथ आहे हा. हा देखील मुंबईत उपलब्ध आहे.
      ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

      Like

  2. shashioak says:

    वरील पत्र बोलके आहे. त्यातील संदर्भ दिनांक, पत्रव्यवहारामागील घटनाक्रम, रामसिंहाचे उत्तर, आदि कथन सादर केले जावे ही विनंती.

    Like

    • Umesh Joshi says:

      नमस्कार…
      डॉ सदाशिव शिवदे यांचे “ज्वलज्वलनतेजस संभाजी राजे” हे पुस्तक आणि डॉ.कमल गोखले यांचे “शिवपुत्र संभाजी” ही दोन पुस्तके संभाजी राजांबद्दल अस्सल ससंदर्भ माहिती देणारी Best उत्तम पुस्तके आहेत. आपण जरूर वाचावीत साहेब… आपल्या जवळजवळ सर्व शंकांचं निरसन या पुस्तकातून आपणास मिळेलच….
      धन्यवाद….

      Like

      • shashioak says:

        नमस्कार, उमेश जी,
        वेळ मिळाला की जरूर वाचेन.
        वरील धागा थोडक्यात घटना संदर्भांसह वाचायला आवडले असते.

        Like

      • Umesh Joshi says:

        नमस्कार
        वरील घटनेचं संदर्भासहित माहिती लवकरच आपणास उपलब्ध करून देऊ.
        धन्यवाद.

        Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -