गरुड भरारी…!!!

प्रताप सूर्य थोरले बाजीराव पेशवे ह्यांनी पालखेड मोहिमेवर असताना केलेला प्रवास पहिला तर मन थक्क होतं. दळणवळणाची आजच्यासारखी साधने उपलब्ध नसताना, आजच्या सारखे express highway नसताना, केवळ आपल्या नजरबाजांवर, हेरांवर पूर्ण विश्वास ठेऊन भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून मोहिमा आखण म्हणजे ह्या वीरांच्या युद्धकौशल्याची परिसीमाच म्हणायची…!

केवळ जीवाभावाच्या साथीदारांवर पूर्ण विश्वास ठेऊन मोठमोठ्या लढाया मारणारे बाजीराव पेशवे ह्यांनी  पालखेडच्या  लढाईत निजामाला पाठलागावर ठेऊन, झुकांड्या देऊन पालखेड ला गाठून सपशेल पराभूत केले. सच्चा शिपायाला जात नसते, आपल्या राजाच्या चरणी निष्ठा आणि आपल्या राज्यावर वक्र दृष्टी टाकणाऱ्या शत्रूला रणांगणात धूळ चारणे या दोनच गोष्टी त्यांना माहित असतात. “मराठ्यांच्या स्वाऱ्यांचे मुक्काम” या पुस्तकातील पालखेड युद्धा दरम्यानच्या मराठी फौजेच्या घोड दौडीच्या या नोंदी बघितल्या कि  थोरल्या बाजीराव पेशवे (राया, राऊ ) यांचा पराक्रम जातीत तोलणाऱ्या “विचारजंतांची” कीव येते.

Rau

2 Responses to गरुड भरारी…!!!

  1. shashioak says:

    नमस्कार फारच रंजक माहिती दिली आहे.
    आजकाल गूगल वरील नकाशावर निदान सध्या त्याच नावाने ज्ञात काही गाव, शहरे यांच्या संदर्भात घोडदौडीचा मार्ग दर्शवता येऊ शकतो. तसा प्रयत्न केला जावा ही विनंती.
    या बाबतीत माझे सहकार्य कसे काय करता येईल यावर प्रकाश टाकावा. मी पुण्यात राहातो. सध्या अमेरिकेत दौऱ्यावर आहे.

    Like

    • Umesh Joshi says:

      नमस्कार….
      धन्यवाद…..ह्याच ब्लॉग वरील “यशाची मुहूर्तमेढ रणक्षेत्र पालखेड” हा लेख वाचवा. त्या मध्ये आपण म्हणत आहात तसा नकाशा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात त्याहूनही चांगलं नकाशा नक्की करता येईल. आपली कल्पना उत्तम आहे. मी मुंबई मध्ये असतो परंतु अनेकदा पुणे येथे येणे होते. आपण पुण्यात आलात कि नक्की कळवा. जरूर भेटायला येऊ. आपले मार्गदर्शन लाभले तर आम्हासही आनंद होईल….
      धन्यवाद.

      Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -