शंभूछत्रपतींची संत तुकोबांच्या पुत्राला मोइन
ऑगस्ट 27, 2015 यावर आपले मत नोंदवा
शिवाजी राजांनी संत आणि धर्माचे ज्याप्रमाणे रक्षण आणि प्रतिपालन केले, तोच वारसा पुढे शंभू छत्रपतींनी चालवला.
तुकोबारायांचे चिरंजीव महादोबा यांना दिलेली ही वर्षासनाची मोइन ह्याचे उत्तम उदाहरण आहे. पत्र १९ ऑगस्ट १६८० रोजी दिलेले असून, मायना शिवराज्याभिषेकानंतर वापरण्यात आलेल्या पत्रांसारखाच आहे.
पत्रात देहू, तुकोबा गोसावी आणि त्यांचे पुत्र महादोबा गोसावी असे स्पष्ट उल्लेख आहेत.