दर्याराज कान्होजी आंग्रे…. “समुद्रावरील शिवाजी”

जेम्स डग्लस यांच्या “Book Of Bombay” पुस्तकातील हा उतारा वाचून सहज लक्षात येते की सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेल्या आरमाराचा दबदबा किती विलक्षण होता. इंग्रज, फ्रेंच, सिद्दी, मुघल एकेकटे किंवा एकमेकांच्या मदतीने वारंवार कान्होजींना शह देण्याच्या प्रयत्नात होते, आणि कान्होजी त्यांना प्रत्येक वेळी खडे चारत होते. कधी युद्ध करून कधी तह करून कान्होजीनी त्यांना कधीही संपूर्ण विजय मिळू दिला नाही. जेम्स डग्लस ह्यांचा हा उतारा वाचला की हे जलचर कान्होजींना किती वचकून होते हे दिसून येते. फक्त मराठी आरमाराशी लढण्यासाठी त्यांना वेगळी तरतूद करावी लागत असे या वाक्यात इंग्रजांची हतबलता किंवा व्यथा दिसते.

अनेक ठिकाणी कान्होजींच्या सैन्याला “शिवाजीचे सैन्य” संबोधल्याचे उल्लेख आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा तसा होताच….. पुढे छत्रपती शाहू महाराजांचे सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी तो दरारा दबदबा समुद्रावर पसरवला. कुठे समकालीन अस्सल पत्रांमध्ये उल्लेख नसला तरी काही जाणकार इतिहास संशोधक मंडळी त्यांना दर्यावारचा शिवाजी म्हणतात. कान्होजी आंग्रे ह्यांचा जीवन पट अभ्यासला तर त्यांना “दर्यावरचे शिवाजी” किंवा “समुद्रावरचे शिवाजी” म्हटले तर काहीही वावगं ठरणार नाही…..!!   Kanhoji

4 Responses to दर्याराज कान्होजी आंग्रे…. “समुद्रावरील शिवाजी”

  1. vijay warang says:

    kokani manus ani shivaji maharaj yanchya vishayee kahee mahiti asel tar nakki sanga vachayla avdel.

    Like

  2. gajanan says:

    इंग्रज कान्होजी अंग्रे यास समुद्री चाचे असे संबोधत असत. शाहू महाराजांच्या काळात कान्होजींनी विजयदुर्ग व आजूबाजूचा प्रदेश घेतला. एवढे करून थाबले नहित. त्यांनी एकदा एक अरबी घोडे असलेले जहाज हस्तगत केले आणि त्याच्या द्वारे स्वताची घोड दलाची तुकडीच तयार केली.
    २६ डिसेंबर १७१५ साली ब्रिटीश गव्हर्नर बून हा मुंबई ला आला. पश्चिम किनार्यावर कान्होजीला संपवण्याचा त्यांनी निश्चय केला. दोन वर्षाच्या आत त्यांनी मुंबई बंदरावर ९ लढाऊ जहाजे तयार केली. त्यांची नावे अनुक्रमे
    १) Britannia
    २) Victory
    ३) Defiance
    ४) Revenge
    ५) Fame
    ६) Hunter
    ७) Hawk
    ८) Eagle
    ९) Princess Amelia
    या सर्वांवर मिळून १४८ तोफा व १२५० लढाऊ खलाशी होते. या शिवाय जमिनीवरून लढण्यासाठी २५०० युरोपियन होते. १७ एप्रिल १७१७ ला ये जंगी आरमार विजयदुर्ग वर आक्रमण करण्यासाठी आले. परंतु कान्होजींच्या माऱ्यापुढे त्यांचे काहीही चालले नाही. २०० इंग्रज मेले. ३०० च्या वर जखमी झाले. या अपयशाने बून खचून गेला नाही त्याने अजून दीड वर्षाने अजून २ नवीन जहाजे बांधली आणि हल्ला केला. परंतु मागीन वेळे प्रमाणे याही वेळेला हे आरमार सपाटून मार खून मुंबई ला परत गेले.
    वरील दोन हल्ल्यानंतर कान्होजी अजून जास्त ताकतवान बनला. इंग्रजांनी या हल्ल्याचे प्रतिउत्तर देण्यासाठी इंग्लंड ला राजाकडे अजून जास्त सैन्याची मागणी केली. admiral माथ्युस च्या हाताखाली सप्टेंबर १७२१ ला नवीन आरमार मुंबई मध्ये दाखल झाले. मागीन वेळे प्रमाणे याही वेळेला नवीन आरमाराला सपाटून मार खावा लागला. कान्होजी जिवंत असे पर्यंत परकीयांना पश्चिम किनारपट्टीवर आपले अस्तित्व स्थिर करता आले नव्हते.
    कान्होजी नंतर त्याचा मुलगा संभाजी आंग्रे याने सुद्धा काही वर्ष आरमाराची परंपरा अबाधित ठेवली होती.

    Like

Leave a reply to vijay warang उत्तर रद्द करा.