अभ्यास शिवभारताचा – ४ – कारतलबखानाला अभयदान का ?

शिवाभारातातील बारीक सारीक नोंदी फार रहस्यपूर्ण आहेत. वाचता वाचता नकळत महत्वाची टिप्पणी नजरेआड होते. कारतलबखानाला शिवाजीराजांनी उंबरखंडात चांगलाच कोंडला. त्याने शरणागती पत्करत आपला वकील शिवाजीराजांकडे पाठवला. त्या वकिलाने जी विनवणी केली ती शिवभारतात दिली आहे. तो बचाव करवून घेताना कारतलबखानावर शहाजीराजांचा लोभ आहे याचा स्पष्ट उल्लेख करतो. वाचून विस्मय होतो की प्रतापराव गुजरांनी बेहलोल खानाला सोडल्याने शिवाजी राजांनी त्यांना करडा सवाल केला ‘सला काय निमित्य केलात?’ परंतु इथे शिवाजी राजांनी दया दाखवत कारतलबखानाला मात्र सोडून दिले. शाहजीराजांचे नाव घेऊन राजकारण केल्यामुळे त्याला सोडले असावे का? हा एक बुचकळ्यात टाकणारा प्रश्न निर्माण होतो.

शाहजीराजांचा मजवर मोह - मला जाऊ द्यावे

शाहजीराजांचा मजवर मोह – मला जाऊ द्यावे

शिवरायांचे अभयदान

शिवरायांचे अभयदान

4 Responses to अभ्यास शिवभारताचा – ४ – कारतलबखानाला अभयदान का ?

  1. Ankit Dhamane says:

    Aapla ekunch abyas chan ahe. Barik najrene Aapn baryacha goshti amcyaparyant pohchavtat tybaddal ABHINANDAN. Aapla jo prashn ahe tyach uttar ase ki , Shivaji naharaj he Pragat sanskrutiche ek pratinidhi hote ani te parakrmi hote pan krurkarma navhate , mhanun shakya astanahi tyani kartalabkhanala v tya fojela angvarchya kapadyani sodun dile. Ankhi ek mhanje tyanchya sobat ek mahila sardar hoti Mahurchi- Raybagan, ani strila tar raje matesaman manat.
    Aaplyala adhik changale spashtikaranasathi ek pusatk suchvato- ” VEDH MAHAMANVACH- Dr. Shrinivas Samant- Deshmukh Publication ” Jarur vacha , surekh vishleshan kelel ahe.
    Dhanyvad.

    Like

    • आपले नेहमीच स्वागत आहे. आपले मुद्दे भावनिक आहेत पण काही नोंदी सांगतो त्या पहा –
      १. मुघलांना सोडताना त्यांच्या अंगावरचे कपडे देखील आपले लोक काढून घेत असत असे उल्लेख आहेत कारण ते पुढे हेरगिरी / वेषांतर करायला उपयोगी पडत असत.
      २. स्त्रियांना मातेसमान वागणूक हा मुद्दा उत्तम आणि भावनिक जरूर आहे पण इतिहास पाहता सगळ्याच ठिकाणी तसे दिसत नाही. पोर्तुगीज आणि महाराजांचा तह वाचा. अस्सल पत्र उपलब्ध आणि प्रकाशित आहे. त्यात ‘मर्द, औरत व कचे-बचे’ असे सगळेच धरून आणले असा स्पष्ट उल्लेख आहे. तेव्हा युद्धभूमीवर भावनिकता गुंडाळून ठेवणे भाग पडते.
      ३. आपण सुचवलेले पुस्तक चांगले आहे. आम्ही ते वाचले आहे पण त्यात भावनिक लिखाण भरपूर आहे. त्या ऐवजी आपण श्री मेहेंदळे यांचे श्री राजा शिव छत्रपति किंवा श्री विजय देशमुख यांचे शककर्ते शिवराय जरूर वाचा. मुद्देसूद आणि ससंदर्भ व सप्रमाण मांडणी आहे.

      Like

  2. शशिकांत ओक says:

    मला करतलब खानाची फार माहिती नाही. बहलोल खानाला का सोडलेत? असे महाराज विचारताना सेनापतीला हुकुमाची तामील न करण्यातील गाफीलपणा किंवा आणखी काही अन्य कारणे असतील.
    या उलट करतलब खानाला सोडणेहा महाराजांच्या स्वत:च्या अखत्यारीतील निर्णय आहे.
    दुसरे असे की करतलब यांचे वय, हुद्दा आणि मानमरातब याचा विचार करून तो जर अदिल शाहीला कटकट करणाऱ्या सरदारांच्यापैकी असेल तर त्याला सोडून दिले तर मान ही वाढतो व वडिलांच्या मैत्रीचा आब राखून दबदबा ही वाढतो. असा प्रयत्न असू शकतो.

    Like

    • कदाचित तसा विचार असेलही पण ही भूमिका जरा कोडेच आहे. फ़क़्त एक दुरुस्ती आपल्या वाक्यात, कारतलबखान मुघल सरदार आहे आणि शाहजी राजे आदिलशाही सरदार. तसे असूनही त्यांचे संबंध मात्र असू शकतात. धन्यवाद !

      Like

आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा -