अभ्यास शिवभारताचा – ४ – कारतलबखानाला अभयदान का ?

शिवाभारातातील बारीक सारीक नोंदी फार रहस्यपूर्ण आहेत. वाचता वाचता नकळत महत्वाची टिप्पणी नजरेआड होते. कारतलबखानाला शिवाजीराजांनी उंबरखंडात चांगलाच कोंडला. त्याने शरणागती पत्करत आपला वकील शिवाजीराजांकडे पाठवला. त्या वकिलाने जी विनवणी केली ती शिवभारतात दिली आहे. तो बचाव करवून घेताना कारतलबखानावर शहाजीराजांचा लोभ आहे याचा स्पष्ट उल्लेख करतो. वाचून विस्मय होतो की प्रतापराव गुजरांनी बेहलोल खानाला सोडल्याने शिवाजी राजांनी त्यांना करडा सवाल केला ‘सला काय निमित्य केलात?’ परंतु इथे शिवाजी राजांनी दया दाखवत कारतलबखानाला मात्र सोडून दिले. शाहजीराजांचे नाव घेऊन राजकारण केल्यामुळे त्याला सोडले असावे का? हा एक बुचकळ्यात टाकणारा प्रश्न निर्माण होतो.

शाहजीराजांचा मजवर मोह - मला जाऊ द्यावे

शाहजीराजांचा मजवर मोह – मला जाऊ द्यावे

शिवरायांचे अभयदान

शिवरायांचे अभयदान